Chandrashekhar Bawankule : महायुतीत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत अटळ; चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती, म्हणाले...
Chandrashekhar Bawankule : राज्यात काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील. तर ज्या -ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल त्या जागांची घोषणा महायुतीकडून केली जाईल अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: पाच वर्षांपूर्वी उमेदवारी नाकारण्यात आलेले चंद्रशेखर बावनकुळे आज प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्याच स्वाक्षरीचा बी फॉर्म घेत आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. दरम्यान, यावर बोलताना फार कमी कार्यकर्त्यांच्या जीवनात असा प्रसंग येतो, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे. पाच वर्षांपूर्वी राजकीय जीवनात एक कठीण प्रसंग आला होता, जेव्हा पक्षाने उमेदवारी नाकारली होती, मात्र, त्याच्यातून बरेच काही शिकून आम्ही पुढे गेले आहोत, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांनी दिली आहे.
राजकीय जीवनात असे प्रसंग येतात. मात्र संयम ठेवलं पाहिजे, असेच आवाहन सर्व भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना करेल असेही चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले. तसेच राज्यात काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील हे बावनकुळे यांनी मान्य केले आहे.
दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल- चंद्रशेखर बावनकुळे
महायुतीचा जागावाटप अत्यंत चांगल्या पद्धतीने झाले असून आज दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल, असा दावाही बावनकुळे यांनी केला. मात्र राज्यात काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील हे बावनकुळे यांनी मान्य केले आहे. ज्या -ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल त्या जागांची घोषणा महायुतीकडून केली जाईल अशी माहिती ही त्यांनी दिली. लवकरच महायुतीचा संयुक्त जाहीरनामा सर्वांसमोर येईल आणि त्यानंतर महायुतीच्या संयुक्त सभा ही सुरू होतील, असेही बावनकुळे म्हणाले.
भाजपमध्ये बंडखोरी करणारे नेते
अमरावती - भाजपचे जेष्ठ नेते तथा माजीमंत्री जगदीश गुप्ता आज बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार....
बडनेरा - 1) भाजपचे नेते तुषार भारतीय महायुती विरोधात आज बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार..
2) प्रिती बंड यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात उमेदवारी दाखल केली..
तिवसा - भाजपचे रविराज देशमुख महायुती विरोधात आज बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार...
अचलपूर - भाजपचे प्रमोद सिंह गडरेल महायुती विरोधात आज बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार..
दर्यापूर - 1) काँग्रेसचे गुणवंत देवपारे महाविकास आघाडी विरोधात आज बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार..
2) भाजपचे माजी आमदार रमेश बुंदीले महायुती विरोधात बंडखोरी करत युवा स्वाभिमान पार्टी कडून आपली उमेदवारी अर्ज दाखल केला...
मेळघाट - भाजपचे प्रभूदास भिलावेकर महायुती विरोधात आज बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार.
हे ही वाचा