एक्स्प्लोर

भाजपच्या गोटातून महत्त्वाची बातमी; विधानसभेला भाजपला 110 ते 115 जागा मिळण्याचा अंदाज, बड्या नेत्याचं असेसमेंट

भाजपच्या एका बड्या नेत्याने विधानसभेत किती आमदार निवडून येणार याचा आकडाच सांगितला.

 मुंबई :  राज्यात विधानसभा  निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यातील  सर्वच पक्ष निवडणुकीच्या प्रचाराच्या कामात गुंतले आहेत.  लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजपाची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील पराभवामधून धडा घेत भाजपाकडून विधानसभा निवडणुकीसाठी सावधपणे पाऊल टाकलं जात आहे. आतापर्यंत भाजपने 152 जणांना उमेदवारी दिली आहे. अद्याप काही जागांचा तिढा आहेच. या  दरम्यान भाजपच्या एका बड्या नेत्याने विधानसभेत किती आमदार निवडून येणार याचा आकडाच सांगितला. भाजपला 110 ते 115 जागा मिळणार असल्याचा मोठा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. 

मोहित कंबोज यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर या संदर्भात एक पोस्ट केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत  भाजप 110 ते 115  जागा जिंकणार असल्याचा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे.  23  नोव्हेंबर रोजी भाजप कार्यालयात पुन्हा दिवाळी साजरी होणार आहे. निवडणुकीआधीच मोहित कंबोज यांनी दावा केल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. 152  जागांपैकी भाजप 110 ते 1110 जागा जिंकणार असल्याचा दावा केला आहे.  

महायुतीचा फॉर्म्युला अजूनही निश्चित नाही. आतापर्यंत 288 पैकी 282 जागांवरचे उमेदवार जाहीर झाले आहेत. भाजप 146,शिवसेना 78,राष्ट्रवादीचे 51 उमेदवार जाहीर झाले. महायुतीत चार मित्र पक्षांच्या वाट्याला 7  जागा दिल्या. महायुतीच्या 7 जागांवर अजून उमेदवारांची घोषणा नाही. महायुतीचे उमरेड,मालेगाव मध्य,मीरा भायंदर,शिवडीचे उमेदवार बाकी आहेत.  महायुतीचे मानखुर्द-शिवाजीनगर,बीड आणि माढ्याचे उमेदवार बाकी आहेत. महायुतीत मित्रपक्षांना 7 जागा जाहीर झाल्या आहेत.  रिपाइं,जनसुराज्यला 2-2  जागा राजश्री शाहू आघाडी,युवा स्वाभिमानी आणि रासपला प्रत्येकी एकेक जागा  दिल्या आहेत.  

15 ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली

राज्यात 15 ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली. 29  उमेदवारी अर्ज दाखल अंतिम तारीख होती. तर आज 30 ऑक्टोबर 2024 रोजी अर्जांची छाननी झाली. 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. 20 नोव्हेंबर रोजी मतदान आणि 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होईल.

हे ही वाचा :

Ravi Raja resigns: विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का,निष्ठावंत नेत्याचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 630AM  Headlines 630 AM 13 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सWorking HOur Special Report :  90  तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Embed widget