एक्स्प्लोर

Ajit Pawar interview: बारामतीची लढाई, 2024 चा मुख्यमंत्री ते शरद पवारांसोबत एकत्र येणार का? अजित पवारांची ABP माझाच्या मुलाखतीत रोखठोक उत्तर

Ajit Pawar interview: अजित पवारांनी दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टीवर सविस्तर भाष्य केलं आहे.

Ajit Pawar interview: राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, सर्व नेते, उमेदवार पक्ष विजयासाठी मोठे प्रयत्न करत आहे, या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांची एबीपी माझाने मुलाखत घेतली. यावेळी अजित पवारांनी अनेक गोष्टीवर भाष्य केलं. बारामतीची लढाई, महाराष्ट्राचा कल, 2024 चा मुख्यमंत्री, शरद पवारांसोबत (Sharad Pawar) एकत्र येणार का?, निवडणुकीच्या काळात सुरू असलेलं बॅग चेकींग आणि तापलेलं राजकारण, तीनही पक्षांच्या भूमिकेत तफावत, लोकसभा पराभवातून काय शिकले, लोकसभेत पराभव का झाला, बारामतीचा निवडणूक निकाल कसा असेल यावर सविस्तर भाष्य केलं आहे.

विधानसभेत जनतेचा कौल काय?

मी जे बघतो आहे. त्यामध्ये माहोल बनतोय...175 पेक्षा जास्त जागा येणार याबद्दल मला शंका नाही. महायुतीचं सरकार येणार बारामतीमधे लोकसभेला असलेल्या माहोल पेक्षा वेगळा माहोल आहे. लोकसभेच्या वेळी लोकांनी ठरवलं असावं की अजित पवार कामाचा माणूस असला तरी आपण साहेबांच्या सोबत जायचं आणि ताईंना मतदान केलं. लोक बोलत होते लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असं समोरचे प्रयत्न करत आहे

अजित पवारांची लढाई कुणाशी युगेंद्र की शरद पवारांशी?

मी जेव्हा निवडणुकीत उतरतो तेव्हा समोरच्याचं डिपॉझिट जप्त होतं. तरी मी गेल्या पाच वर्षांत केलेली कामं, आमच्या योजना याच्या जोरावर लढतो आहे. माझ्या प्रत्येक उमेदवारानं आपला जाहिरनामा तयार केला आहे..काय करणार. बारामतीमधे गेल्या पाच वर्षांत केलेलं काम आणि पुढल्या पाच वर्षांत काय काम करणार याचं छोटं पत्रक काढलं आहे. त्यामध्ये जर काही राहिलं आणि लोकांनी सूचना केली तर तेही करून देईल.

शरद पवारांचं आव्हान 

लोकशाहीमधे ज्याला जे वक्तव्य करायचं ते करू शकतो..आम्ही त्यांचा आदर करतो. निवडणूक म्हटली की निवडणूक..कुणीतरी लढणार, कुणीतरी जिंकणार. आम्ही आमची कामं केली..जनता जनार्दन निर्णय घेईल

बारामतची लढाई कोण जिंकणार ?

तुम्ही थोडा फेरफटका मारून मतदारसंघाचा अंदाज घ्या..आम्ही निवडणूक मतदारांना रिस्पेक्ट करून बोलत असतो. बारामतीतील ग्रीनरी, सुविधा, शिक्षण सोयी, कायदा सुव्यवस्था सगळं आलबेल आहे.

लोकसभेनंतर लोकांचा कल बदलला आहे का? 

लोकांनी पवार साहेबांच्या वयाचा आदर केला, पवार साहेबांची मुलगी उभी आहे. म्हणून मतदान केलं. संविधान, घटना बदलणार, आरक्षण जाणार, म्हणून अबकी बार 400 पार या फेक नरेटिव्हमुळे मराठाड्यात मोठा फटका बसला. सीएए आणून तुम्हाला गोळा करून परदेशात पाठवणार अशा खोट्या बाता सांगितल्या. कांदा निर्यातबंदीचा फटका सहा सात तालुक्यात बसला, लोक ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. आम्ही संविधान भवन बांधतोय, न्यायदेवतेची प्रतिमा बदलली, पंतप्रधान मोदी प्रत्येक बैठकीत संविधानाला नमस्कार करतात. हे सगळं असतानाही फेक नरेटिव्ह सेट करतात..आम्ही काय केलं ते नाही सांगत. राज्यातील डेव्हलपमेंट्ल प्रोजेक्टबद्दल बोला ना.

लोकसभा पराभवातून काय शिकले 

संविधान बदलाचा अधिकार असेंबलीला नाही, हे स्वतः पंतप्रधानांनी सांगितलं आहे. आम्ही आता म्हणतोय का अब की बार चारसौ पार?145 बहुमताचा आकडा आहे ते आमचं टार्गेट आहे..मी प्रॅक्टिकली बोलणारा माणूस आहे. लाडकी बहीण योजना आणली आणि जुलैपासून सगळ्या महिलांना पैसे देण्यास सुरूवात केली. मात्र तरीही विरोधक म्हणतात की हा चुनावी जुमला आहे.

एक है तो सेफ है चा नारा अजित दादांना मान्य आहे का ?

मोदी म्हणाले हम सब एक है तो सेफ है...माझा दावा आहे की, गेल्या दीड वर्षात मायनॉरिटीजच्या बाबजीत सगळ्यात जास्त निर्णय़ आम्ही घेतले. कटेंगे ते बटेंगे हा नारा आम्हाला मान्य नाही. आम्ही शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारसरणीनं जाणारा पक्ष आहोत.

तीनही पक्षांच्या भूमिकेत तफावत का?

 ज्यावेळेस एखादा कॅबिनेट निर्णय होतो, तेव्हा त्याला मान्यता मुख्यमंत्री देतात. तुम्हाला वाटलं होतं का काँग्रेस, शिवसेना एकत्र होतील आणि सत्तेत येतील, आज राज्यात अशी परिस्थिती आहे की विकासासाठी तीन वेगळ्या पक्षांनी कॉमन मिनिनल प्रोग्राम बनवून त्यावर काम करायचं आहे.

उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवर दादाचं मत काय ?

माझी बॅग परभणीला चेक झाली..शिंदे साहेबांच्या बॅगा लोकसभेच्या वेळी चेक झाल्या. आम्ही बोलत नाही कारण, तो त्यांचा अधिकार आहे. आम्ही त्याचा बोभाटा करत नाही.. तुम्हाला निवडणूक आयोगानंं त्यांना ते काम करण्याची जबाबदारी दिली आहे. आपल्याकडे काही नसेल तर घाबरता का, उलट स्वच्छ मनानं सांगता आलं पाहिजे. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे, त्यांनी कुणाचं काय तपासायचं हा त्यांचा प्रश्न आहे. तुम्हाला जर एखाद्याची शंका आली तर तुम्ही तक्रार करा..

शरद पवारांसोबत एकत्र येणार का?

ज्यावेळेस माझ्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी सगळ्या नेत्यांनी दिली. तेव्हा मी ठरवलं की प्रत्येक शब्द तोलून मापून बोलायचा. उद्या जर माझ्याकडून एखादा वेगळा शब्द बाहेर पडला तर कार्यकर्ते माझ्यावर संशय घेतील.जनसन्मान यात्रा सुरू झाल्यापासून आजपर्यंत मी एकही असा शब्द काढला नाही. ज्याचा फटका महायुतीला आणि उमेदवाराला बसेल आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, आम्ही दोघं उपमुख्यमंत्री आहोत..आमचं ध्येय तोवर या गोष्टीवर मी अजिबात चर्चा करणार नाही हे मी ठरवलं आहे.

अजित दादा किंग मेकर होणार का?

 पक्षाचे नेते नवाब मलिक, दिलीप वळसे पाटील जरी म्हणत असले, तरी आम्ही सगळे घटकपक्षांनी ठरवून पावणे दोनशे जागा मिळवून सत्तेत कसे येणार हे आमचं ठरलं आहे

मैत्रीपूर्ण लढतीवर का म्हणाले अजित पवार?

कालच माझं आणि अमित शाह यांच्याशी बोलणं झालं..त्या पुर्वी महायुतीच्या सर्व महत्वाच्या नेत्यांसोबत आम्ही बसून चर्चा केली की कुठे कोणाच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं आहे.

राज ठाकरे फॅक्टर किती इफेक्ट करेल ?

राज ठाकरेंची भाषणं कायम गाजतात पण मतं मिळत नाही. त्यांनी भोग्यांचा विषय अनेकदा काढला आहे..प्रत्येक निवडणुकीला त्यांची भूमिका वेगळी असते..कधी मोदींना समर्थन करतात, कधी विरोध करतात. त्यांनी तो पक्ष स्थापन केलाय, त्याला नाव दिलंय, चिन्हं दिलंय..ती त्यांची विचारसरणी आहे.

चांदीवालांच्या मुलाखतीवर दादा काय म्हणाले ?

मी मविआमध्ये होतो. मात्र, माझ्याकडे होम डिपार्टमेंट कधीच नव्हतं. त्यामुळे तिथे जे घडतं त्याचं ब्रिफिंग त्यांना होतं..त्यामुळे मी त्याबद्दल फारसं काही बोलणार नाही. माझा हात या सगळ्या प्रकरणात कसा होता हे वाझेंनी मला सांगावं. हे बिनबुडाचे आरोप आहेत..मला काहीच माहिती नाही, कारण मी त्यात कधीच लक्ष घालत नव्हतो. आपल्याकडे जे डिपार्टमेंट असेल ते सांभाळावं, इतरांच्या विभागात लुडबुड करू नये, अनिल देशमुख काय करायचे हे मी कसं सांगू असं अजित पवार म्हणालेत.

2024 चा मुख्यमंत्री कोण असणार?

आत्ताच्या घडीला आमचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत... आमचं टार्गेट 175 पेक्षा जास्त जागा निवडून आणणं हे आहे..त्यानंतर महायुतीचा 2024 चा मुख्यमंत्री कोण असेल हे आम्ही बसून ठरवू असं अजित पवार म्हणालेत.

पवार कुटुंब एकत्र येणार का ?

पवार कुटुंब एकत्र येणार का? या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, नातंच घट्ट आहे, असं तुम्ही म्हणता. मग, पुन्हा एकत्र येणार असं का म्हणता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget