Salil Deshmukh: न्या. चांदीवालांच्या दाव्यावर अनिल देशमुखांच्या मुलाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, 'मला आधीही त्यांनी गोवण्याचा प्रयत्न...'
Salil Deshmukh: चांदीवालांच्या दाव्यावर अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे आरोप केले जात आहेत.
Salil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी शंभर कोटी रुपये वसुलीचे आरोप केले. त्या प्रकरणांमध्ये चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती चांदीवाल यांनी आपल्या अहवालामध्ये आणि देशमुख यांना क्लीन चिट दिली नाही असं म्हटलं आहे. या प्रकरणात अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे आरोप केले जात असल्याचं सलील देशमुख यांनी म्हटले आहे.
राज्यात निवडणुकांची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे ,आज 13 तारीख आहे येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे. त्याच्या आधी अशा पद्धतीच्या काही गोष्टी समोर आणल्या जात आहेत. मतदार राजासाठी ही गोष्ट काही नवी नाहीये. लोकांना सगळं सगळं समजतं. एका व्यवहाराचा 40 लाख रुपयांचा मेसेज सचिन वाझे यांनी समोर आणला काय सत्य आहे, या प्रश्नावर बोलताना सलील देशमुख म्हणाले, मला आधीही त्यांनी गोवण्याचा प्रयत्न केला आहे. आधीही मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. कोणता पुरावा त्यांच्याकडे आहे, तेव्हा त्यांनी तो कोर्टात द्यायला हवा होता किंवा आयोगासमोर तो द्यायला हवा होता. आता मी स्वतः उमेदवार असल्यामुळे वीस तारखेच्या आधी माझ्या विरोधात असं काहीतरी करून निवडणुकीत परिणाम होईल, असं त्यांना वाटतं असेल तर तसं होणार नाही. आमची जनता हुशार आहे, असं यावेळी ते म्हणालेत.
जर चांदीवाल अहवाल उद्धव ठाकरेंकडे सोपवला होता तेव्हा सरकार तुमचं होतं मग तो अहवाल समोर का आला नाही, या प्रश्नावर बोलताना सलिल देशमुख म्हणाले, त्याबाबत मला माहिती नाही पण मी इतकंच सांगतो, तो अहवाल होता तो माझ्या माहितीप्रमाणे नंतरच्या सरकारच्या काळात सादर झाला. त्यानंतर अहवाल विधानभवनामध्ये टेबल करावा लागतो. पण पुढची कारवाई होताना दिसली नाही. पूर्वीच्या सरकार उद्धव ठाकरे होते, तेव्हा अजित पवार इकडे होते, आता सरकार बदललं त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे झाले,असंही सलील देशमुख पुढे म्हणालेत.
अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन त्यांना गुंतवण्याचा प्रयत्न केला असं चांदीवाले सांगतात या प्रश्नावर बोलताना सलिल देशमुख म्हणाले, चांदीवाल यांचा आम्ही आदर करतो. ते न्यायाधीश राहिले आहेत. मला एकदाही त्यांचा संबंध आलेला नाही समन्स आलेला नाही किंवा कोणती नोटीसही आलेली नाही मला बोलावलं असतं तर मी गेलो असतो, किंवा कळवलं असतं. आता ज्या गोष्टी पुढे येत आहेत त्यातून फक्त एकाच गोष्ट दिसते निवडणूक, असही पुढे सलील देशमुख यांनी म्हटलं आहे
नेमकं प्रकरण काय?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी 100 कोटींच्या वसुलीचे (Anil Deshmukh 100 crore bribery case) आरोप केले. या प्रकरणात चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती चांदीवाल (Chandiwal Commission) यांनी आपल्या अहवालात आपण देशमुखांना क्लीनचीट दिलेली नाही असं म्हटलं आहे. योग्य पुरावे आयोगासमोर समोर येऊ दिले नाहीत असं न्या. चांदीवाल यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे चांदीवाल आयोगाने आपल्याला क्लीनचीट दिल्यामुळेच अहवाल सार्वजनिक होऊ दिला जात नाही असा आरोप अनिल देशमुख वारंवार करतात. मात्र अनिल देशमुखांचा क्लीनचीटचा दावा न्या. चांदीवाल यांनी एबीपी माझावर सपशेल फेटाळला आहे.