मोठी बातमी : अजित पवारांनी पहिल्या आमदाराचं तिकीट कापलं? पिंपरीतील आमदाराच्या जागी नवा चेहरा देण्याची चिन्हं!
Pimpri Assembly Elections 2024: अजित पवारांनी इतर विद्यमान आमदारांप्रमाणे बनसोडेंना एबी फॉर्म न देण्याचं कारण बेहलांनी सांगून टाकलं. त्यामुळं बनसोडेंच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी दिली जाणार का? अशी चर्चा रंगलेली आहे.
पुणे : अजित पवारांनी काल पिंपरीतील विद्यमान आमदार अण्णा बनसोडेंना एबी फॉर्म का दिला नाही, याचं कारण आता समोर आलं आहे. नव्या चेहऱ्याला संधी द्यावी अशी मागणी अजित पवार गटाकडून होत असल्याची कबुली नवनियुक्त शहराध्यक्ष योगेश बेहलांनी दिली आहे. मुळातच बेहलांनी शिंदे गटातील जितेंद्र ननावरेंसाठी फिल्डिंग लावली आहे, यावरून त्यांचा अण्णा बनसोडेंना विरोध असल्याचं स्पष्ट होतं. अजित पवारांनी इतर विद्यमान आमदारांप्रमाणे बनसोडेंना एबी फॉर्म न देण्याचं कारण बेहलांनी सांगून टाकलं. त्यामुळं बनसोडेंच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी दिली जाणार का? अशी चर्चा रंगलेली आहे.
अजित दादांनी एबी फॉर्म न देण्याचं कारण समोर
पिंपरीतील विद्यमान आमदार अण्णा बनसोडेंना एबी फॉर्म का दिला नाही याबाबत सांगितलं की, या मतदारसंघातून अनेक जण इच्छुक आहे, त्यामुळं बनसोडेंच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी दिली जाणार का? त्यामुळे या मतदारसंघाबाबत चर्चा सुरू आहेत.
योगेश बेहल यांची प्रतिक्रिया
पिंपरीतून यावेळी अटीतटीचा लढाई होणार आहे. त्यामुळे विचार करून आणि जिंकण्याच्या उद्देशाने तिन्ही पक्षांची एक- एक जागा महत्वाची आहे. महायुतीतील सर्व आमदार कसे निवडून येतील याकडे आम्हाला पाहणं आहे. पिंपरीमध्ये जो कोणी आमदार असेल किंवा अण्णा बनसोडे असतील किंवा जो नवा उमेदवार दिला जाईल त्याला निवडून देणं ही आमची जबाबदारी आहे. ती आम्ही पुर्ण करणार आहोत. पक्षांतून बनसोडे यांना विरोध असल्याच्या चर्चांवर उत्तर देताना बेहल म्हणाले, असं मला दिसून येत नाही, काही छोट्या कारणास्तव नाराजी आहे, नाही असं नाही, पण ती नाराजी दूर करता येईल असंही ते म्हणालेत.
अण्णा बनसोडे यांना उमेदवारी देण्यावर देखील काही हरकत नाही किंवा पक्षाला नवा चेहरा द्यायचा असेल तरी देखील काही हरकत नाही. मी कोणासाठी फिल्डिंग लावत नाही. पक्षातील इच्छुक उमेदवारांची माहिती पक्षाला दिली आहे, जे नेते इच्छुक आहेत, त्यापैकी कोणालाही उमेदवारी दिली तरी आम्ही त्यांच्यासाठी काम करू, इच्छुकांमध्ये आण्णा बनसोडे, जितेंद्र ननवरे, सीमा सावळे, काळूराम पवार ही नावे चर्चेत आहेत. यांच्यापैंकी कोणालाही पक्षांने उमेदवारी दिली तरी आम्ही जोमाने त्यांची कामे करू असंही त्यांनी म्हटलं आहे.
अण्णा बनसोडे यांच्या नावाला काही नगरसेवकांनी विरोध केला होता. तेव्हा मी अजित दादांच्या समोर असं नाव घेऊन बोलू नका रोष घेऊ नका. जे काही दादांना सांगायचं आहे ते प्रेमात सांगा असं म्हणालो होतो, त्यामुळे पुन्हा एकदा मला मोठी जबाबदारी दिली आहे, अजित पवारांनी मला आत्तापर्यंत मोठी जबाबदारी दिली, ती मी पुर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. पक्ष सोडण्याच्या चर्चावर ते म्हणाले, मी पहिल्यांदा अजित पवारांना खासदार झालेलं पाहिलं, 1992 पासून आतापर्यंत मी अजित पवारांसोबत आहे. त्यांनी दिलेल्या जबाबदाऱ्या मी निष्ठेने पार पाडल्या.मी नाराज आहे कारण अजित पवारांनी मला महापालिकेच्या पुढे नेलं नाही. माझ्यासोबतचे काहीजण आमदार झाले अन्य पदावर गेले, पण माझ्या नाराजीचा फटका मी पक्षाला होऊ देणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.