Mahim Vidhan Sabha Result 2024: माहीमचं मैदान मारताच नवनिर्वाचित आमदार जणता दरबारी, महेश सावंतांनी विजयाचे सूत्र सांगितलं
माहीम विधानसभा मतदारसंघाचे मैदान मारल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित विजयी उमेदवार महेश सावंत त्यांनी सकाळपासूनच प्रभादेवी मधील चाळींमध्ये जाऊन मतदारांचे आभार मानायला सुरुवात केली आहे.
![Mahim Vidhan Sabha Result 2024: माहीमचं मैदान मारताच नवनिर्वाचित आमदार जणता दरबारी, महेश सावंतांनी विजयाचे सूत्र सांगितलं maharashtra vidhan sabha constituency election result 2024 Mahesh Sawant told the formula of victory Mahim Vidhan Sabha Result 2024 marathi news Mahim Vidhan Sabha Result 2024: माहीमचं मैदान मारताच नवनिर्वाचित आमदार जणता दरबारी, महेश सावंतांनी विजयाचे सूत्र सांगितलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/24/fba11a89886bea55020cdcd0ffc7eaf21732436595222892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mahim Vidhan Sabha Result 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत काँटे की टक्कर पाहायला मिळाली होती. पण, विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मतांचं दान महायुतीच्या पारड्यात टाकल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना (शिंदे गट), भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीला राज्यातील जनतेनं स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे आता पुढच्या पाच वर्षांसाठी राज्यात महायुतीचंच सरकार येणार, हे जवळपास स्पष्ट झालं आहे. अशातच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मुंबईतही मोठे यश मिळाले. मुंबईतील सर्वाधिक लक्षवेधी लढत असलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यासह सदा सरवणकर यांचा दारुण पराभव झाला आहे.
दरम्यान, माहीम विधानसभा मतदारसंघाचे मैदान मारल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित विजयी उमेदवार महेश सावंत त्यांनी सकाळपासूनच प्रभादेवी मधील चाळींमध्ये जाऊन मतदारांचे आभार मानायला सुरुवात केली आहे. "ज्या दिवशी मला उमेदवारी मिळाली त्याच दिवशी समोर जरी सदा सरवणकर, अमित ठाकरे यांच्यासारखे मोठे उमेदवार असले तरी माझा विजय होणार, याचा विश्वास मला कायम होता", असं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलंय.
कुठल्या परिस्थितीत आपल्याला जिंकायचं हेच मी ठरवलं -महेश सावंत
स्पर्धेसारखी मी ही लढत बघतील, कुठल्या परिस्थितीत आपल्याला जिंकायचा आहे, असं मी ठरवलं होतं. दोन बलाढ्य उमेदवार माझ्यासमोर होते. त्यात टिकाव माझा लागणार की नाही अशी शंका होती. पण लोकांवर माझा विश्वास होता. सदा सरवणकर तीन टर्म नगरसेवक, तीन टर्म आमदार होते. मात्र, ते सध्या तळागाळात काम करत नव्हते, हे मला माहीत होतं. ते फक्त बंगले बदलत होते. अनेक काम या मतदारसंघात करायचे बाकी आहेत, त्याला पाच वर्षे पण पुरणार नाही पण मी पूर्ण काम करणार, असल्याची प्रतिक्रिया महेश सावंत यांनी यावेळी बोलताना दिली आहे.
उद्धव ठाकरेंनी माहीम, दादरचा गड राखला याचा खूप आनंद झाला- महेश सावंत
अमित ठाकरे हे राजकारणात नवीन होते, राजकारणात कसं काम करायचंय त्यांना माहित नव्हतं. राज ठाकरे हे महाराष्ट्राचे विजन बघत होते, पण त्यांना आपल्या विभागात त्यांना माहित नव्हतं की इथे कसं काम करायचं. मनसेचे या मतदारसंघांमध्ये 40,000 मतं होते. त्यातले 13000 आम्ही आधीच मायनस केले. शिवाजी पार्क मधील भागातील मत हे मनसेला मिळतील, अशी मला थोडीशी शंका होती. पण त्या पट्ट्यांनी सुद्धा मनसेला स्वीकारलं नाही. दरम्यान उद्धव ठाकरेंना माहीम, दादरचा गड आम्ही राखला याचा खूप आनंद झाला. दरम्यान आगामी काळात महेश सावंत नेहमीसारखा आक्रमकपणे विधानसभेत प्रश्न मांडणार असेही ते म्हणाले.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)