एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Shivsena Candidate List 2024 : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची तिसरी यादी जाहीर, 15 जागांवरील उमेदवार जाहीर, शायना एनसींना सेनेकडून उमेदवारी

Maharashtra Shivsena Candidate List 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या तिसऱ्या यादीत 15 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तिसऱ्या यादीत सेनेचे 13 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. दोन जागी मित्रपक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे. विशेष बाब म्हणजे रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव, भाजपच्या शायना एनसी यांचं सेनेच्या तिसऱ्या यादीत आलं आहे. बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार

सिंदखेड राजा - शशिकांत खेडेकर
घनसावंगी- हिकमत उढाण
 कन्नड- संजना जाधव
कल्याण ग्रामीण- राजेश मोरे
भांडूप पश्चिम- अशोक पाटील
मुंबादेवी- शायना एनसी 
संगमनेर- अमोल खताळ
श्रीरामपूर - मल्हारी कांबळे
नेवासा- विठ्ठल लंघे पाटील
धाराशिव- अजित पिंगळे 
करमाळा- दिग्विजय बागल
बार्शी- राजेंद्र राऊत
गुहागर- राजेश बेंडल

पाठिंबा- जनसुराज्य
हातकणंगले- अशोकराव माने 
राजश्री शाहू विकास आघाडी
शिरोळ- राजेंद्र यड्रावकर

शायना एनसी, रावसाहेब दानवेंच्या लेकीला उमेदवारी 

भाजप नेत्या शायना एनसी वरळी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होत्या. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून वरळीत मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर शायना एनसी यांना शिवेसनेकडून मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव हिनं काल शिवसेनेत प्रवेश केला होता. तिला देखील कन्नड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. 

बार्शीमधील अपक्ष आमदार राजेंद्र राऊत हे भाजपचे समर्थक मानले जातात.मात्र, जागा वाटपामध्ये बार्शीची जागा एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यानतंर राऊत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या ठिकाणी शिवसेनेकडून राजेंद्र राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  

कोल्हापूरमधील दोन जागांवर मित्रपक्षांना पाठिंबा 

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून कोल्हापूरमध्ये हातकणंगलेच्या जागेवर जनसुराज्य पार्टीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. भाजपनं देखील शाहूवाडी मतदारसंघात जनसुराज्य पार्टीचे विनय कोरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.  एकनाथ शिंदे यांनी शिरोळ मतदारसंघात राजेंद्र यड्रावकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. 

शिवसेनेकडून 78 जागी उमेदवार तर दोन जागा मित्रपक्षांना 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेककडून पहिल्या यादीत 45, दुसऱ्या यादीत 20 आणि तिसऱ्या यादीत  सेनेचे 13 आणि मित्रपक्षांचे 2 असे उमेदवार जाहीर केले आहेत. म्हणजेच शिवसेना 78 आणि मित्रपक्ष 2 जागा लढवणार आहेत. 

महायुतीकडून भाजपनं 146 आणि मित्रपक्ष 4 अशा 150 एकनाथ शिंदे यांची शिवसेना 78 आणि मित्रपक्षांचे 2 अशा 80 जागा जाहीर केल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 49 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. 

इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Navneet Rana : दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
Banarasi BIkini Wedding Ceremony : लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
Sharad Pawar: जाणत्या राजाने जनाधार गमावलाय, आता त्याने घरी बसावं; विखे-पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका
जाणत्या राजाने जनाधार गमावलाय, आता त्याने घरी बसावं; विखे-पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका
Shiv Sena UBT : 'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?
'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 12 PM : 28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaShahaji Bapu Patil : मी काय भीताड आहे का खचायला? शहाजीबापू पाटलांची टोलेबाजीCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :12 PM : 28 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaPriyanka Gandhi- Ravindra Chavan Oath : प्रियंका गांधी , रवींद्र चव्हाणांनी घेतली खासदारकीची शपथ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navneet Rana : दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
Banarasi BIkini Wedding Ceremony : लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
Sharad Pawar: जाणत्या राजाने जनाधार गमावलाय, आता त्याने घरी बसावं; विखे-पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका
जाणत्या राजाने जनाधार गमावलाय, आता त्याने घरी बसावं; विखे-पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका
Shiv Sena UBT : 'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?
'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?
Kangana Ranaut And Aditya Pancholi : 'ती त्याच्यासोबत घरी यायची आणि' कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या विवाहबाह्य संबंधांवर पत्नीचा सनसनाटी खुलासा!
'ती त्याच्यासोबत घरी यायची आणि' कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या विवाहबाह्य संबंधांवर पत्नीचा सनसनाटी खुलासा!
Waaree Renewable : 1233 कोटींच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम मिळताच शेअर बनला रॉकेट, 5 वर्षात दिला 59000 टक्के परतावा
1233 कोटींच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं मिळताच 'वारीचा' शेअर बनला रॉकेट, 5 वर्षात दिला 59000 टक्के परतावा
Actress Charge 5 Crore For Song : 'आज की रात' साठी तमन्नाच्या एक कोटीची चर्चा, पण फक्त चार मिनिटाच्या आयटम साँगसाठी पाच कोटी घेणाऱ्या अभिनेत्रीची रंगली भलतीच चर्चा!
'आज की रात' साठी तमन्नाच्या एक कोटीची चर्चा, पण फक्त चार मिनिटाच्या आयटम साँगसाठी पाच कोटी घेणाऱ्या अभिनेत्रीची रंगली भलतीच चर्चा!
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना कॉल, एक महिला ताब्यात
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना कॉल, एक महिला ताब्यात
Embed widget