Maharashtra NCP Political Crisis : ....तेव्हा बडवे आडवे आले नाहीत का? जयंत पाटलांचा भुजबळांवर हल्लाबोल
Maharashtra NCP Political Crisis : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी आणि महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. अजित पवार गटाने आज एमईटीमध्ये बैठक उपस्थित केली. तर शरद पवार यांच्याकडून वायबी चव्हाण सेंटर येथे बैठक आयोजित केली आहे.
Maharashtra NCP Political Crisis : शरद पवार यांनी अनेकांना संधी दिली. विठ्ठलाच्या बाजूला बडवे आहेत असे म्हटले, पण तुम्ही दोन वर्षातून तुरुंगातून आले तेव्हा डोक्यावर पगडी ठेवली, तेव्हा बडवे आडवे आले नाहीत का ? ज्यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा अपमान केला, त्यांच्या मांडीला मांडीला लावून बसले आहेत. 2019 ला शरद पवार यांनी मंत्री मंडळात पहिले नाव छगन भुजबळ यांचे घेतले, तेव्हा बडवे आडवे नाही आलेत का? असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित करत छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडले.
अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी आणि महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. अजित पवार गटाने आज एमईटीमध्ये बैठक उपस्थित केली. तर शरद पवार यांच्याकडून वायबी चव्हाण सेंटर येथे बैठक आयोजित केली आहे. एमईटी येथे झालेल्या सभेमध्ये अजित पवार यांच्या गटातील नेत्यांनी शरद पवार आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले. यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय असे म्हणत अप्रत्यक्षपणे जयंत पाटील यांच्यावर टीका केली होती. जयंत पाटील यांनीही या टीकेला प्रत्युत्तर दिलेय.
जयंत पाटील यांनी यावेळी अजित पवार गट आणि भाजपवर निशाणा साधला. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, अनेकांनी हा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला. आज काही लोक बाजूला गेले, याचे आम्हाला शल्य आहे.
शरद पवारसाहेबांच्या उजवीकडे आणि डावीकडे बसलेले आज नाहीयेत. एक वर्ष झालं मुंबई शहराचा अध्यक्ष नेमला नाही, का नेमला नाही? मुंबई प्रदेशच्या नेमणुका जयंत पाटील करत नाही. मला पाच वर्षे झालीत काही विधाने झाली, मी साहेबांना भेटलो आणि बोललो एकही सुट्टी घेतली नाही आता सुट्टी द्या... आता तुम्ही निर्णय घ्याल तो मान्य असेल. मी प्रदेश अध्यक्ष असताना मी फिरलो, मंत्री असताना मी मुंबईत बसून करू शकलो असतो, असे जयंत पाटील म्हणाले.
शरद पवार साहेबांनी अनेक प्रसंगाला तोंड दिले आहे. संकट किती ही आली तरी त्याचा सामना केला आहे. 10 जून 1999 ला आपला प्रवास सुरु झाला, तो 24 वर्षाचा झाला आहे, असे जयंत पाटील म्हणाले. पक्षाची चोरी करणाऱ्यांचा आज थयथयाट सुरू आहे. एका पक्षाची चोरी झाली, शिवसेनेबाबत जे झाले ते राष्ट्रवादीच्या बाबतीत सुरू आहे. राज्यात राजकीय पटलावरून नामशेष करण्याची भूमिका असेल तर सर्वानी परत या. वय कितीही झालं तरी या नेत्याचा भारतात दरारा आहे, असे जयंत पाटील म्हणाले. आमची चूक आहे.. मी शरद पवार साहेबाच्या शब्दाच्या बाहेर जात नाही ही माझी चूक आहे, असेही जयंत पाटील म्हणाले. साहेब बांधतील ते तोरण आणि सांगतील ते धोरण, असे म्हणत जयंत पाटील यांनी अमोल कोल्हे यांना पक्षाचे प्रचारप्रमुख व्हा... असे म्हटले.
अजून खाते वाटप झालेले नाही. उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जे 40 जण गेले त्यांची तक्रार काय होती. आता तीच तक्रार पुन्हा असेल तर उद्धव ठाकरेंच्या बरोबर असलेल्यांच्या मनात आता परत फिरायचे वेध लागले आहेत. एवढी अवस्था मी कधीच राजकरणात पाहिली नाही. सर्वात मोठा पक्ष आहे त्यांचे मंत्री किती 8 आहेत. 105 मधल्या निष्ठावंताना फक्त 4 किंवा 5 मंत्री मिळाले आहेत. दुसऱ्याची कबर खोदता खोदता स्वतःची खोदत आहेत. आमच्या मविआला तीन चाकी गाडी म्हणत होते, आता काय? असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला.
Maharashtra NCP Crisis : आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय; छगन भुजबळांचा नेमका रोख कोणाकडे?