Maharashtra MLC Election LIVE : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी आज मतदान, आतापर्यंत किती टक्के मतदान?
Maharashtra MLC Election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक आणि अमरावती या पदवीधर तसंच औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे.
LIVE
Background
Maharashtra MLC Election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad) पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी (Graduate And Teacher Constituency Election) आज (30 जानेवारी) मतदान होणार आहे. यामध्ये नाशिक, अमरावती या पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. मतदारांना सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. 2 दोन फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. या पाचही जागांची मुदत 7 फेब्रुवारी रोजी संपत आहे.
महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजप-शिंदे गट असा थेट सामना पुन्हा एकदा रंगणार आहे. नाशिक आणि नागपूर इथल्या मतदारसंघांमध्ये चुरस वाढली आहे. पहिल्या दिवसांपासून ते आतापर्यंत नाशिक मतदारसंघात नवनव्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. शिवाय नागपूर शिक्षक मतदारसंघही अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. त्यामुळे पाच जागांसाठी होणाऱ्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आता या मतदारसंघात कोणता राजकीय पक्ष बाजी मारणार हे पाहावं लागणार आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघ
विधानपरिषदेच्या पाच जागांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली आणि सगळ्याचं लक्ष असलेली निवडणूक म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघाची. काँग्रेसने उमेदवारी दिलेल्या सुधीर तांबे यांनी अर्ज मागे घेतला आणि त्याच वेळी त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरला. पक्षविरोधी भूमिका घेतल्याने काँग्रेसने सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे यांची पक्षातून हकालपट्टी केली. तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नागपूरमध्ये शिक्षक मतदारसंघ
नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या समर्थनाने विदर्भ माध्यमिक शिक्षकसंघाचे सुधाकर अडबाले मैदानात उतरले आहेत. त्यांच्यासमोर भाजप प्रणित आणि महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांचं आव्हान आहे.
अमरावतीमध्ये पदवीधर मतदारसंघ
अमरावती विभाग पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेस लढवत असून धिरज लिंगाडे हे रिंगणात आहेत. या पदवीधर मतदारसंघात भाजप, शिवसेना (बाळासाहेबांची शिवसेना) आणि रिपाइं (आठवले गट) युतीचे उमेदवार डॉ. रणजित पाटील रिंगणात आहेत. त्यामुळे ही लढत रंगतदार होणार आहे.
कोकण शिक्षक मतदारसंघ
महाविकास आघाडीकडून शेकाप उमेदवार बाळाराम पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. इथे भाजपकडून ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ
औरंगाबात शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप सामना पाहायला मिळेल. गेली कित्येक वर्षे औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. त्यामुळे यावेळी देखील हा मतदारसंघ आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून देखील हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या किरण पाटील यांना भाजपकडून रिंगणात उतरवण्यात आलं आहे. तर विक्रम काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत.
कोणामध्ये प्रमुख लढत?
कोकण शिक्षक मतदारसंघ
बाळाराम पाटील (शेकाप)
ज्ञानेश्वर म्हात्रे ( भाजप)
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ
विक्रम काळे (राष्ट्रवादी काँग्रेस)
किरण पाटील (भाजप)
नाशिक पदवीधर मतदारसंघ
शुभांगी पाटील (अपक्ष)
सत्यजीत तांबे (अपक्ष)
धनराज विसपुते (अपक्ष)
धनंजय जाधव (अपक्ष)
नागपूर शिक्षक मतदारसंघ
सुधाकर अडबाले (मविआ पाठिंबा)
नागो गाणार (भाजप पाठिंबा)
अमरावती पदवीधर मतदारसंघ
धीरज लिंगाडे (मविआ - काँग्रेस)
डॉ. रणजित पाटील (भाजप)
संबंधित बातमी
Thackeray Group Vs Shinde Group: ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाचा लेखी युक्तिवाद सादर
ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाचा लेखी युक्तिवाद सादर करण्यात आला आहे. तसेच कुठल्याही पातळीवर तपासलं तरी न्यायाची बाजू आमची, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
विधानपरिषद नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक; दुपारी दोनपर्यंत 60.48 टक्के मतदान
Teachers Constituency Election Nagpur : विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी विभागातील सहा जिल्ह्यात दुपारी दोनपर्यंत 60.48 टक्के मतदान झाले आहे. यात गडचिरोली येथे दुपारी एकवाजतापर्यंत 69.60 टक्के मतदान झाले होते. तर आतापर्यंतच्या प्राप्त आकडेवारीनुसार गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झाले आहे. विभागातील इतर जिल्ह्यातील आकडेवारी खालील प्रमाणे नागपूर 52.75 टक्के, वर्धा 67.06 टक्के, चंद्रपूर 69.06 टक्के, भंडारा 63.58 टक्के, गोंदिया 57.18 टक्के मतदान झाले आहे.
Amravati Graduate Constituency Election : अमरावती शहरात शेवटच्या तासात मतदानासाठी गर्दी, दुपारी 2 वाजेपर्यंत अमरावती विभागात 30.40 टक्के मतदान
Amravati Graduate Constituency Election : अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अमरावती शहरात शेवटच्या तासात मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली आहे. दुपारी चार वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत अमरावती विभागात 30.40 टक्के मतदान झालं.
Nashik Graduate Constituency Election : नाशिक पदवीधर मतदारसंघातील पाच जिल्ह्यात दुपारी 2 वाजेपर्यंत 31.71 टक्के मतदान, सर्वाधिक मतदान धुळ्यात
Nashik Graduate Constituency Election : नाशिक पदवीधर मतदारसंघातील पाच जिल्ह्यात दुपारी 2 वाजेपर्यंत 31.71 टक्के मतदान झालं. सर्वाधिक मतदान धुळे जिल्ह्यात झालं.
- सर्वाधिक 34.05 टक्के मतदान धुळे जिल्ह्यात
- नगर जिल्ह्यात 32.55 टक्के,
- नंदुरबार जिल्ह्यात 31.73 टक्के
- नाशिक जिल्ह्यात 29.91 टक्के,
- जळगाव जिल्ह्यात 30.93 टक्के
Amravati Graduate Constituency Election : अकोट शहर पोलिसांनी 54 लाख रुपयांची रक्कम पकडली, व्यापाऱ्याची रक्कम असल्याचं पोलीस तपासात समोर
Amravati Graduate Constituency Election : अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील अकोट शहर पोलिसांनी काल रात्री 54 लाख रुपयांची रक्कम पकडली आहे. पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीदरम्यान एका चारचाकी वाहनात ही रक्कम आढळली. संबंधित रक्कम ही वाडेगाव येथील एका ब्लँकेट, बेडशीटचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याची असल्याचं पोलीस चौकशीत स्पष्ट झालं आहे. या व्यापाऱ्याने आज सकाळी बिलं सादर केल्यानंतर पोलिसांनी रक्कम मालकाच्या स्वाधीन केली आहे. या प्रकरणावर पोलिसांनी 'इन कॅमेरा' बोलणं टाळलं.