मलबार हिलच्या धनाढ्यांना साजेसा थाट, अंबानींचा आमदार; मंगलप्रभात लोढांच्या संपत्तीचा आकडा पाहून व्हाल थक्क
शेअर्समध्ये 4 कोटी आणि सोन्यातील गुंतवणूक 6 कोटी रुपये इतकी आहे. पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत घट झाल्याचं समोर आलंय.
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election) सर्वच पक्षांच्या उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगबग सुरु आहे. मात्र सर्वसामान्यांना उत्सुकता आहे, ती म्हणजे प्रतिज्ञापत्रानुसार उमेदवारांची संपत्ती किती आहे. याच माध्यमातून कोण नेता किती श्रीमंत आहे, याचा अंदाज नागरिकांना येतो.आतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये भाजपचे मलबार हिलचे उमेदवार आणि विद्यमान आमदार मंगलप्रभात लोढा सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. मंगलप्रभात लोढा यांनी एकूण 436 कोटींची चल-अचल संपत्ती घोषित केली आहे. या संपत्तीशिवाय त्यांच्यावर जवळपास 183 कोटींचं कर्ज आहे.
मंगल प्रभात लोढा यांच्याकडे सध्या 436 कोटी 80 लाख 48 हजार 591 रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी जाहीर केले. लोढा यांच्यावर सध्या 182.93 कोटी रुपयांचे तर त्यांची पत्नी मंजुळा लोढा यांच्यावर 123.28 कोटी रुपयांचे कर्ज आहे. लोढा यांच्या नावावर एकूण 123 कोटी 38 लाख 98 हजार 588 रुपये इतकी संपत्ती आहे. तसेच पत्नीच्या नावावर 10 कोटी 28 लाख 75 हजार 340 रुपये इतकी संपत्ती आहे. त्यांच्याकडे 125 कोटी 54 लाख 49 हजार 707 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
सोन्याची गुंतवणूक सहा कोटीपेक्षा अधिक
मलबार हिल मतदारसंघाचे आमदार असलेल्या मंगल प्रभात लोढा यांची जंगम मालमत्ता 123 कोटी 39 लाख रुपये इतकी आहे. तर स्थावर मालमत्ता 125 कोटी 54 लाख रुपयांची आहे. मंगल प्रभात लोढा यांच्यावर जवळपास 182 कोटी रुपयांचे कर्ज आहे. शेअर्समध्ये 4 कोटी आणि सोन्यातील गुंतवणूक 6 कोटी रुपये इतकी आहे. पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत घट झाल्याचं समोर आलंय. 2019 च्या निवडणुकीत लोढा यांनी त्यांची संपत्ती 441 कोटींपेक्षा जास्त असल्याचं जाहीर केलं होतं. मंगलप्रभात लोढा यांच्याकडे फक्त 2 लाख 12 हजार 376 रुपयांची रोख आहे.
सलग पाच वेळा भाजपचे मंगलप्रभात लोढा निवडून आलेत
देशाच्या आर्थिक राजधानीतील उच्चभ्रू वस्तीचा, मोठे उद्योजक, व्यापारी अशांचा भरणा असणारा मतदारसंघ म्हणजे मलबार हिल विधासभा मतदारसंघ या मतदारसंघात राजभवन, सह्याद्री अतिथीगृह , पेडर रोड, यांसारखे महत्त्वाचे भाग येतात त्यामुळेचं याला राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं स्वरुप प्राप्त झालं आहे.
मलबार हिल विधासभा मतदारसंघात 1995 पासून सलग पाच वेळा भाजपचे मंगलप्रभात लोढा निवडून येत आहेत.मलबार हिल हा उच्चभ्रूंसह मध्यमवर्गीय मराठी मतदार असलेला मतदारसंघ आहे
मतदारसंघाचा इतिहास
मलबार हिल विधासभा हा सुरुवातीपासून खुला मतदारसंघ राहिला आहे. मराठी मतदार अधिक असलेल्या मतदारसंघात जात, मराठी अस्मिता यांसारखी समीकरणं कधी उपयोगी आली नाहीत. 1995 पासून मतदारसंघात मंगलप्रभात लोढा यांच्याशिवाय कोणतंही नेतृत्व तयार झालेलं नाही. 1995 साली बी. ए देसाई यांना हरवून पहिल्यांदा मंगलप्रभात लोढा आमदार झाले. 1995 पासून ते 2009 पर्यंत भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्यातच प्रमुख लढत पाहायला मिळाली. 2014 साली भाजप-शिवसेना यांच्यात काडीमोड झाल्यामुळे त्यावेळी फक्त भाजप विरुद्ध शिवसेना लढत पाहायला मिळाली. पण तरीही भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे.
हे ही वाचा :
राजकीय ट्रेंडमध्ये #DevaBhau देशात पहिल्या क्रमांकावर; देवेंद्र फडणवीसांच्या शक्तिप्रदर्शनाचे एक्सवर देखील पडसाद