एक्स्प्लोर

Election : ग्रामपंचायतींमध्ये मतदारांचा समिश्र कौल, कोकणात ठाकरे गट तर विदर्भात काँग्रेस- भाजप समसमान 

Gram panchayat Election : राज्यातील 1 हजार 79 ग्रामपंचायतींचा निकाल आज लागला असून त्यामध्ये मतदारांनी समिश्र कौल दिल्याचं दिसून येतंय. 

मुंबई : राज्यात रविवारी झालेल्या ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठीच्या निवडणुकांचा निकाल  (Maharashtra Gram Panchayat Election Result) जाहीर झाला आहे. त्यामध्ये प्रमुख पक्षांना समिश्र यश मिळाल्याचं दिसून येतंय. राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठी 74 टक्के मतदान झालं होतं.

राज्य निवडणूक आयोगाने 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या; तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे रविवारी 1 हजार 79 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. त्याचा आज निकाल हाती आला आहे. नागपुरात काँग्रेस आणि भाजपला समिश्र यश आलं तर कोकणात शिवसेना ठाकरे गटाला चांगलं यश मिळालं आहे. 

नंदुरबार जिल्ह्यामध्ये आतापर्यंत हाती आलेल्या बातमीनुसार, काँग्रेसने 66 तर भाजपने 54 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवलं आहे. तर भंडाऱ्या सरपंचपदासाठी महिलाराज असल्याचं दिसून आलं. या ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली आहे. 

रत्नागिरीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरेंचा बोलबाला 

रत्नागिरी ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचा बोलबाला असल्याचं दिसून येतंय. तब्बल 24 ग्रामपंचायतींमध्ये उद्धव ठाकरे गटाची सत्ता आली आहे. तर शिंदे गटाला केवळ 7 ग्रांमपंतायतींमध्ये यश आलं आहे. गाव पॅनलच्या 17 ग्रांमपंचायती नेमक्या कुणाकडे जाणार याची उत्सुकता आहे. रत्नागिरी, लांजा-राजापूर मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचा करिश्मा दिसून आला. तसेच दक्षिण रत्नागिरीत 18 जागांवर उद्धव ठाकरे गटाचा दबदबा दिसून आला. 

ग्रामपंचायत फायनल आकडेवारी आणि वैशिष्ट्य

रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची अंतिम आकडेवारी

मतदान झालेल्या  ग्रामपंचायती- 36
बिनविरोध ग्रामपंचायती- 15

निकाल खालील प्रमाणे 
शिवसेना - 24
शिंदे गट - 07
भाजप- 01
राष्ट्रवादी- 02
काँग्रेस- 00
इतर- 17
एकुण ग्रामपंचायत-51 

सिंधुदुर्ग फायनल आकडेवारी 

एकूण - 4 ग्रामपंचायत
भाजप - 3
उद्धव ठाकरे शिवसेना - 1
शिंदेगट शिवसेना - 0
इतर – 0

सिंधुदुर्गमध्ये (Sindhudurg) चारपैकी तीन ठिकाणी भाजपची बाजी 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण चार ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाल्या. चार पैकी तीन ग्रामपंचायत निवडणुकीवर भाजपने तर एका ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने बाजी मारली. शिंदे गटाचा या ठिकाणी आमदार असतानाही त्यांना एकाही जागेवर यश मिळालं नाही. शिंदे गटाचे आमदार दिपक केसरकर यांच्या ताब्यात असलेली पाट्ये पुनर्वसन ग्रामपंचायत भाजपकडे गेल्याने यांचा सुफडा साफ झाला आहे. केसरकरांच्या मतदारसंघात शिंदेगटाला एकही ग्रामपंचायत राखता आलेली नाही. 

पुण्यातील मावळ तालुक्यातील चांदखेड ग्रामपंचायतींवर स्थानिक आघाडीचे वर्चस्व प्रस्थापित झालं आहे. सरपंच आणि ग्रामपंचायतीवर स्थानिक आघाडीचा विजय. संत रामजी बाबा ग्रामविकास आघाडीने 11 पैकी 9 जागा मिळवल्या तर सरपंचपदावर ही विजय मिळवला.

पुणे- ग्रामपंचायत फायनल निकाल

पुणे मुळशी - 1
बिनविरोध- 1 
मावळ - 1
आज निकाल- 1 
एकूण जागा-2

नागपुरात समिश्र प्रतिसाद 

नागपूर (Nagpur Election) जिल्ह्यातील 17 ग्रामपंचायत साठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी रामटेक तालुक्यातील दोन ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्या होत्या. 15 ग्रामपंचायतीसाठी काल झालेल्या मतदानात ग्रामीण मतदारांनी संमिश्र कौल दिला आहे. मतदान झालेल्या 15 ग्रामपंचायतीपैकी सहा ठिकाणी काँग्रेसचे सरपंच निवडून आले आहे. तर सहा ठिकाणी भाजपचे सरपंच विजयी झाले आहे. एका ठिकाणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला सरपंचपदी यश मिळालं आहे. तर दोन ग्रामपंचायतीमध्ये अपक्ष म्हणजेच स्वतंत्र सरपंच निवडून आले आहेत.
ग्रामपंचायत निकाल फायनल आकडेवारी :

जिल्हा : नागपूर : 17 

एकूण ग्रामपंचायत 17
बिनविरोध- 2 
काँग्रेस - 6 जागी सरपंच विजयी 
भाजप - 6 जागी सरपंच विजयी 
शिवसेना -  ( ठाकरे गट ) 1 जागी विजयी
अपक्ष - 2 जागी सरपंच विजयी ( + 2 ठिकाणी निवडणूक बिनविरोध झाली. तेही कुठल्याच पक्षाचे नाही)

वाशिमध्ये एका ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली होती. त्यामध्ये अपक्षांनी बाजी मारली. तर अमरावतीमध्येही हीच स्थिती आहे. 

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात एकूण चार ग्रामपंचायतसाठी निवडणूक लागली होती. त्यापैकी आजरा तालुक्यातील करपेवाडी ही ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात आली. उर्वरित तीन ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल खालीलप्रमाणे, 

जिल्हा : कोल्हापूर : 04 

बिनविरोध – 01 
भाजप – 00
शिंदे गट – 00
ठाकरे गट – 00
राष्ट्रवादी – 01
काँग्रेस – 00
अपक्ष – 02 

वर्ध्यात काँग्रेसला यश  

वर्धा (Wardha) जिल्ह्यातील 9 ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्या आणि त्यापैकी 7 ग्रामपंचायत या आर्वी तालुक्यातील आहेत. त्याचे आज निकाल जाहीर करण्यात आले. आर्वी तालुक्यातील 7 ग्रामपंचायती पैकी 4 ग्रामपंचायती कॉग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत तर भाजपाच्या वाट्याला 2 ग्रामपंचायती आल्याने तालुक्यात सध्या कॉग्रेसचा जल्लोश पाहायला मिळते आहे. 

भाजपा समर्थक - 4
काँग्रेस समर्थक - 4
इतर - 01

भंडाऱ्यात महिलाराज आणि अपक्षांचा बोलबाला 

भंडारा (Bhandara) जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 19 ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला असून यात महिलाराज पहायला मिळाला आहे. तब्बल 13 ग्रामपंचायतीत महिला सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत.  विशेष म्हणजे पक्षाचा विचार करता अपक्षांचा बोलबाला पहायला मिळाला असून तब्बल 09 ग्रामपंचायती अपक्षाचा ताब्यात गेली आहे. तर काँग्रेस आणि शिंदे गटाची कामगिरी देखील समाधानकारक असून काँग्रेसने 05 ग्रामपंचायती तर शिंदे गटाने 03  ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवला आहे. तर, दूसरीकड़े भाजप आणि राष्ट्रवादी प्रत्येकी एक ग्रामपंचायतीवर समाधानी राहिले आहे. दरम्यान ठाकरे गटाला या निवडणुकीत काही यख मिळालं नाही. यात उल्लेखनीय बाब अशी की, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुद्धा भाजप विशेष कामगिरी करु शकला नाही. तर, तिकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मतदार संघात कमळ फुलले आहे. एकंदरीत ही निवडणूक अपक्षाची ठरली असून आता अपक्ष कोणत्या पक्षाला पाठिंबा देतात हे पाहाने विशेष महत्वाचे ठरेल.

एकूण ग्रामपंचायत 19

हाती आलेले ग्रामंपचायत निकाल -  19
भाजपा - 01
काँग्रेस - 05
राष्ट्रवादी - 01
बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट )- 03
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना - 00
इतर - 09

गोंदियात प्रफुल्ल पटेल यांना धक्का 

गोंदियात (Gondia) राष्ट्रवादीचे नेते नेते प्रफुल पटेल यांना धक्का बसला असून राष्ट्रवादीला एकही ग्रामपंचायत निवडणूक जिंकता न आल्याने गोंदियात त्यांचा सुपडा साफ झाल्याचं दिसून आलं. पाचपैकी चार ठिकाणी भाजप तर एका ठिकाणी काँग्रेसने यश मिळवलं आहे. 

एकूण ग्रामपंचायत 05

हाती आलेले ग्रामंपचायत निकाल -  05
भाजपा - 01+01+01+1=04
काँग्रेस - 01
राष्ट्रवादी - 00
बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट )- 0
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना - 00
इतर - 0

नंदुरबारमध्ये काँग्रेसचे यश, भाजप दुसऱ्या क्रमांकावर 

नंदुरबारमध्ये (Nandurbar) एकूण 206 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. त्यामध्ये काँग्रेसने 66 तर भाजपला 54 ठिकाणी यश मिळालं आहे. शिवसेनेला 12, शिंदे गटाला 13, राष्ट्रवादीला 4 तर अपक्षांना 17 ठिकाणी यश मिळालं आहे. 

ग्रामपंचायतींचा निकाल खालील प्रमाणे

जिल्हा -  नंदुरबार

एकुण ग्रामपंचायत- 206
आता पर्यंतचे निकाल 169

शिवसेना - 12
शिंदे गट - 13
भाजप-  54
राष्ट्रवादी- 4
काँग्रेस-  66
माकप -2
इतर- 17

साताऱ्यात शिंदे गटाची मुसंडी 

सातारा (Satara) जिल्ह्यातील झालेल्या तीन तालूक्यातील ग्रामपंचायतीची मतमोजणी पुर्ण झाली. यात गेल्या 60 वर्षापासून वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादीचा झेंडा खाली उतरवून बाळासाहेबांच्या शिवसेनाचा झेंडा लावल्याचा धक्कादायक निकाल हा पाटण तालूक्यातील मोरगिरी या ग्रामपंचायतीत पहायला मिळाला. नामदार शंभूराज देसाई यांच्या मतदार संघातील पाटण तालूक्यातील मोरगिरी या ग्रामपंचायतीवर गेली साठ वर्ष राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. यंदाही राष्ट्रवादीच ग्रामपंचायीतवर झेंडा फडकवेल असे वाटत असताना मात्र मतदारांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेला स्विकारल्याचे दिल्याचे दिसून आले . तसेच पाटण तालूक्यातील दुसऱ्या ग्रामपंचायतीमध्ये मात्र लोकांनी मात्र बाळासाहेबांच्या शिंदे गटाला नाकारले. तेथे राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळाले. याच पाटण तालूक्यातील इतर तीन ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या असून या तीन्ही ग्रामपंचायतीवर बाळासाहेबांची शिवसेना गटाने यश मिळवले. तसेच जावळी तालुक्यातील चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. त्यावर आ शिवेंद्रराजेंच्या रुपाने भाजपने आपला झेंडा फडकवला होता. तर याच तालुक्यातील भनंग या ग्रामपंचायतीमधील सरपंच पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय झाला.  महाबळेश्वर तालूक्यातील पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. त्यातील पाच पैकी एक मेटगुटाड राष्ट्रवादीकडे गेली आणि चार ग्रामपंचायतीवर बाळासाहेबांची शिवसेना गटाने बिनविरोध बाजी मारली. या बिनविरोधमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावाचाही समावेश आहे.  यांच्या तर निवडणूक झालेल्या गावांमध्ये सरपंचपद हे राष्ट्रवादीकडे गेले तर उर्वरीत बिनविरोध झाले. 


पालघरमध्ये भाजपचं यश 

पालघर (Palghar) जिल्ह्यामध्ये भाजपने 89 ठिकाणी बाजी मारली आहे तर शिंदे गटाने 56 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवलं आहे. 

भाजपा-89
काँग्रेस- 01
बाळासाहेबांची शिवसेना- 56
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे-18
माकप 06
बाविआ 08
जिजाऊ संघटना 16
मनसे 01
श्रमजीवी 06
इतर 49

एकूण 250



 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Embed widget