एक्स्प्लोर

महाराष्ट्रात युतीला 42च्या वरच जागा मिळतील : रावसाहेब दानवे

Maharashtra Exit Polls 2019 : एबीपी-नेल्सन एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार राज्यात शिवसेना 17, भाजप-17, काँग्रेस-4, राष्ट्रवादी- 9 आणि स्वाभिमानीला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला या निवडणुकीत भोपळाही फोडता येणार नाही.

Maharashtra Exit Polls 2019 : मुंबई : महाराष्ट्रात युतीला 42च्या वरच जागा मिळतील, 41 होणार नाहीत. तसंच देशात भाजप 300 जागांचा आकडा पार करुन पुन्हा बहुमत मिळवेल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याच्या मतदानानंतर विविध वाहिन्यांच्या एक्झिट पोलमध्ये एनडीए पुन्हा सत्तेच्या जवळ जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यावर रावसाहेब दानवे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. Exit Poll | महाराष्ट्रात युतीला 42 च्या वरच जागा मिळतील, रावसाहेब दानवेंना विश्वास जनता भरकटली नाही रावसाहेब दानवे म्हणाले की, "मी देशाच्या जनतेचे आभार मानतो. अनेक पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान बनण्याचं स्वप्न पाहिलं, कोणी सायकलवर निघालं तर कोणी हत्तीवर पण जनता भरकटली नाही. राज्यभरातल्या सभांमधून लोकांमध्ये उत्साह दिसत होता." Exit Poll 2019 Maharashtra : महायुतीला फटका, महाआघाडीच्या काहीच जागा वाढणार काँग्रेस-राष्ट्रवादी 5 जागांच्या वर जाणार नाही एबीपी-नेल्सनच्या एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीला फटका बसून महाआघाडीच्या काही जागा वाढण्याची शक्यता आहे. याविषयी दानवे म्हणाले की, "महाराष्ट्रात आम्हाला 42च्या वरच जागा मिळणार, 41 होणार नाही. आजपर्यंतचा अभ्यास आहे राष्ट्रवादी काँग्रेस 6 आणि 4 या आकड्यांच्या वर कधी गेली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून राज्यात पाच जागांच्या वर जाणार नाही याचा मला विश्वास आहे." सर्व चॅनेल्सच्या एक्झिट पोल्सचा कल कोणाच्या बाजूने? मोठा भाऊ-छोटा भाऊ असं काही नाही! एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, राज्यातील समान जागेमुळे भाजप आणि शिवसेना आता मोठे-छोटे नाही तर जुळे भाऊ झाल्याची प्रतिक्रिया उमटली. याबद्दल विचारलं असता रावसाहेब दानवे यांनी सांगितलं की, "प्रत्येक मतदारसंघात पंतप्रधान मोदी उभे होते, असं शिवसेना-भाजपने एकत्र काम केलं. त्यामुळे मोठा भाऊ, लहान भाऊ असं काही नाही. आम्ही विधानसभेला पण एकत्र लढा देऊ." महाराष्ट्रात युतीला 42च्या वरच जागा मिळतील : रावसाहेब दानवे एबीपी-नेल्सन एक्झिट पोल : महाराष्ट्रातील अंदाज शिवसेना-भाजप महायुती राज्यात 34 जागा जिंकणार असल्याचा अंदाज एबीपी-नेल्सनचा एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार राज्यात शिवसेना 17, भाजप-17, काँग्रेस-4, राष्ट्रवादी- 9 आणि स्वाभिमानीला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला या निवडणुकीत भोपळाही फोडता येणार नाही. लोकसभेच्या निवडणूक 2014 शी एबीपी-नेल्सनचा एक्झिट पोलची तुलना केली, तर भाजपला 6 जागांचा तर शिवसेनेला एका जागेचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसच्या 2 आणि राष्ट्रवादीच्या 5 जागा वाढण्याची शक्यता आहे. ABP News Exit Polls 2019 Lok Sabha Elections Live Updates: एनडीए पुन्हा सत्तेच्या जवळ, मात्र स्पष्ट बहुमत नाही

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, राष्ट्रवादी शरद पवार गटाला इशारा
ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, राष्ट्रवादी शरद पवार गटाला इशारा
Gokul Election: कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
Embed widget