एक्स्प्लोर

Maharashtra Election Results 2019 : महाराष्ट्रात काँग्रेसचं पतन का झालं?

Maharashtra Election Results 2019 Live : महाराष्ट्रात तर काँग्रेसच्या चिंधड्या झाल्या आहेत. काँग्रेसचं पतन होण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे वंचित बहुजन आघाडी.

मुंबई : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. 542 पैकी जवळपास साडेतीनशे जागांवर आघाडी मिळवत भाजपप्रणित एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तर यूपीएचा अक्षरश: सुपडासाफ झाला आहे. महाराष्ट्रात तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंधड्या झाल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीला सहाच जागा मिळवता आल्या. त्यापैकी काँग्रेसचा एकच उमेदवार आघाडीवर आहे. राज्यातील 48 जागांपैकी जवळपास 43 जागांवर विजयी आघाडी मिळवत, मागील लोकसभा निवडणुकीतील विक्रमही मागे टाकला आहे. मात्र काँग्रेसच्या या पतनाची कारणं काय आहेत? वंचित बहुजन आघाडी फॅक्टर मात्र राज्यात काँग्रेसचं पतन होण्यामागे वंचित बहुजन आघाडीचा मोठा वाटा असल्याचं दिसून येत आहे. अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे मतांची विभागणी होऊन सर्वाधिक फटका आघाडीच्या विशेषत: काँग्रेसच्या उमेदवारांना बसला. सोलापुरात भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी हे आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्यापेक्षा सुमारे 83000 मतांनी आघाडीवर आहेत. मात्र त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना सुमारे 93 हजार मतं मिळाली. राज ठाकरेंच्या सभा फोल महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जणू काही आघाडीचे स्टार प्रचारक म्हणूनच काम केलं. राज ठाकरे यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी सभा घेतल्या. या सभांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला फायदा होईल तसेच भाजप-शिवसेना युतीची मतं कमी होतील, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला होता. परंतु राज यांनी ज्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या त्यापैकी रायगड, सातारा, बारामती वगळता इतर सर्व उमेदवार पराभवाच्या छायेत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा झाला नसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. राहुल गांधींची न्याय योजना पक्षाच्या योजना जनतेपर्यंत योग्यरित्या न पोहोचवणं हे देखील काँग्रेसचा सुपडासाफ होण्यामागचं प्रमुख कारण आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास देशातील 20 टक्के गरीब कुटुंबांना दरवर्षी 72 हजार रुपये देणार, अशी घोषणा पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली होती. परंतु काँग्रेसला ही योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यास यश आलं नाही. परिणामी त्याचं उत्तर काँग्रेसला मतांच्या रुपाने पाहायला मिळालं. राष्ट्रवादाला उत्तर नाही पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करुन उत्तर दिलं. भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली. दहशतवादाला उत्तर देण्यासाठी भाजप हाच एकमेव पक्ष असल्याचा दावा करत, राष्ट्रवादाची भावना निर्माण केली. तसंच नवमतदारांनी आपलं पहिलं मत पुलवामातील शहीदांना समर्पित करण्याचं भावनिक आवाहन केलं. परंतु काँग्रेसला या मुद्द्यावरुन भाजपला काऊंटर करता आलं नाही. सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यावरुन काँग्रेसला मोदी सराकारला कोंडीत पकडता आलं नाही. नोटाबंदी, रोजगार, जीएसटीचे मुद्दे नोटाबंदी, रोजगार आणि जीएसटी यांसारखे मुद्दे काँग्रेस-राष्ट्रवादीला निवडणुकीचे मुद्दे बनवता आले नाहीत. 2017-18 मध्ये देशातील बेरोजगारी 45 वर्षांच्या उच्चस्तरावर असल्याचा अहवाल एका खासगी संस्थेने दिला होता. पण आघाडीला निवडणुकीत हा मुद्दा प्रभावीपणे मांडता आला नाही. काळापैशांना आळा घालण्यासाठी मोदी सरकारने नोटाबंदी केली. नोटाबंदीमुळे सगळा काळा पैसा बाहेर येईल, असा दावा सरकारने केला. परंतु 99 टक्के नोटा परत आल्या. तसंच जीएसटीमुळे व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडलं, या मुद्द्यांवर सरकारला कोंडीत पकडण्यात आघाडीला जमलं नाही. तसंच शेतकऱ्यांची सरकारवर असलेली नाराजीही आघाडीला कॅश करता आली नाही. मोदींना टक्कर देणारं नेतृत्त्व नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींना भक्कम पर्याय देण्यात काँग्रेस अपयशी ठरली. भाजपने मोदींना 'लार्जर दॅन लाईफ' असं सादर केलं. देशासाठी मोदी हे एकमेव पर्यय असल्याचा प्रचार केला. परंतु त्याच वेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत जनतेच्या मनात विश्वास निर्माण करता आला नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget