एक्स्प्लोर

Maharashtra Election Results 2019 | सख्ख्या भावांच्या दोन जोड्या विधानसभेत

हा विक्रम केला आहे लातूरच्या देशमुख बंधूंनी आणि सोलापूरच्या शिंदे बंधूंनी.

लातूर/सोलापूर : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच सख्ख्या भावांच्या दोन जोड्या विधानसभेत दाखल झाल्यात आहेत. हा विक्रम केला आहे लातूरच्या देशमुख बंधूंनी आणि सोलापूरच्या शिंदे बंधूंनी. विलासराव देशमुख यांचा वारसा सांगणारे त्यांचे दोन पुत्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी यावेळी नशीब आजमावले आणि विजय मिळवला. तर सोलापुरात बबन शिंदे आणि संजय शिंदे बंधूंनीही विजयश्री मिळवला. अमित देशमुख यांची हॅटट्रिक अमित देशमुख यांनी हॅटट्रिक साधत तब्ब्ल 40 हजार मतांची आघाडी घेत विजय खेचून आणला. त्यांनी भाजपाचे उमेदवार शैलेश लाहोटी यांचा पराभव केला. शैलेश लाहोटी यांना 68497 मतं पडलं. धीरज पहिल्यांदाच विधानसभेत तर धीरज देशमुख यांनी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत लातूर ग्रामीणची जागा ऐनवेळी शिवसेनेच्या वाट्याला गेली आणि लढत सोपी झाली. जवळपास एक लाखांच्या विक्रमी मतांची लीड घेत धीरज देशमुख विजयी झाले आहेत. जिल्ह्यात काँग्रेसच्या दोन जागा आल्या आहेत, त्या दोन्ही जागा देशमुख बंधूंच्या रुपात आल्या आहेत हे विशेष. सोलापुरातही भावांची जोडी विधानसभेत Maharashtra Election Results 2019 | सख्ख्या भावांच्या दोन जोड्या विधानसभेत बबन शिंदे सलग सहावेळा माढ्याचे आमदार माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेच्या संजय कोकाटे यांचा सुमारे 68 हजार मतांनी पराभव केला. विधानसभेवर निवडून जाण्याची बबन शिंदे यांची ही सलग सहावी वेळ आहे. याविधानसभा निवडणुकीपूर्वी बबन शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. परंतु राष्ट्रवादीने माढा मतदारसंघातून त्यांनाच उमेदवारी दिली आणि त्यांचा विजयही झाला. संजय शिंदेंचा विजय संजय शिंदे यांनी यंदा अपक्ष निवडणूक लढवली आणि विजय मिळवत पहिल्यांदाच विधानसभेत गेले आहेत. संजय शिंदे हे आमदार बबन शिंदे यांचे धाकटे बंधू आहेत. सोलापुरातील करमाळा मतदारसंघात अपक्षांचा बोलबाला राहिला. नारायण पाटील या अपक्ष उमेदवाराने संजय शिंदेंना कडवी झुंज दिली. परंतु संजय शिंदे यांनी जवळपास साडेपाच हजार मतांनी विजय मिळवला. त्याआधी माढा लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. परंतु तिथे त्यांचा पराभव झाला.

महत्त्वाच्या बातम्या

Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Embed widget