BMC Election :मुंबईत सोयीनुसार वॉर्ड पुनर्रचना, नाना पटोलेंचा आक्षेप, कोर्टात जाण्याचा इशारा
BMC Election 2022 : मुंबईतील वॉर्ड पुनर्रचनेवर आधी भाजपनं आक्षेप घेतल्यानंतर आता काँग्रेसनंही नाराजी व्यक्त केली आहे. नाना पटोलेंनी सोयीनुसार वॉर्ड पुनर्रचना झाली असल्याचा आरोप केलाय.
BMC Election 2022 : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी केलेल्या वॉर्ड पुनर्रचनेवर आधी भाजपनं आक्षेप घेतला होता. मात्र आता सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसनंही नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सोयीनुसार वॉर्ड पुनर्रचना झाली असल्याचा आरोप केला आहे. नाना पटोले यांनी म्हटलं की, तीन पक्षांचं सरकार असताना सर्व पक्षांनी मिळून वॉर्ड रचना करायला हवी. आपण सोबत राहून जर आपल्या मित्रपक्षाचं नुकसान होत असेल तर ते बरोबर नाही, त्यामुळं आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. आम्ही पुण्यासह अनेक ठिकाणी कोर्टात गेलो आहोत. कारण ज्या पद्धतीनं प्रभागरचना झालीय ती चुकीची आहे. आमची मागणी दोनचा प्रभाग करण्याची होती पण तीन सदस्यांचा प्रभाग करण्यात आला आहे. मुंबई, पुण्यात महाविकास आघाडीतील काही पक्ष आपल्या सोयीनं प्रभाग तयार केले आहेत. आम्ही कोर्टात या बाबत न्याय मागण्याची भूमिका घेणार आहोत, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
राज्यसभेच्या जागांसदर्भात अद्याप कुठलीही बैठक याविषयी झालेली नाही. बैठक होईल तोवर त्या विषयावर बोलणं बरोबर नाही, असंही ते म्हणाले. नाना पटोले म्हणाले की, दरवर्षी पावसात मुंबई पाण्याखाली येते. अनेक वर्ष काँग्रेसचा महापौर राहिला आहे. त्यावेळी कधीच मुंबई पाण्याखाली गेली नाही. मुंबईकरांसाठी आम्ही या विषयात कोर्टात गेलो आहोत, असं पटोलेंनी म्हटलं आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये आता 227 ऐवजी 236 वॉर्ड असणार
मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये आता 227 ऐवजी 236 वॉर्ड असणार आहेत. या अधिसूचनेत वॉर्डच्या नवीन सीमा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने एक परिपत्रक जारी केलं आहे. प्रत्येक प्रभाग कसा असेल याची सविस्तर माहिती या परिपत्रकात देण्यात आली आहे. त्यामध्ये प्रभाग क्रमांक, त्या ठिकाणची एकूण लोकसंख्या जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गाची लोकसंख्या किती आहे हे देखील सांगितलं आहे.
नवीन प्रभाग रचना पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
नव्याने वाढणाऱ्या नऊ प्रभागांपैकी तीन प्रभाग शहर भागात, तीन पश्चिम उपनगरात व तीन पूर्व उपनगरात वाढले आहेत. शहर भागातील तीन प्रभाग हे वरळी, परळ व भायखळामध्ये, पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, दहिसरमध्ये, पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर, गोवंडीत नवे प्रभाग आहेत. वाढीव 9 वॉर्ड पैकी 6 वॉर्ड शिवसेनेचे बालेकिल्ले समजले जातात.
महत्वाच्या इतर बातम्या
BMC : मुंबई महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर; नकाशा आणि लोकसंख्या... असा असेल तुमचा वॉर्ड