एक्स्प्लोर

Congress Candidate List 2024 : काँग्रेसनं शंभरचा टप्पा ओलांडला, चौथ्या यादीत तीन उमेदवार, कोल्हापूर उत्तरचा उमेदवार बदलला

Congress Candidate List : काँग्रेसनं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये त्यांनी तीन नवे उमेदवार जाहीर केले आहेत. तर, एका ठिकाणी उमेदवार बदलण्यात आला आहे.

मुंबई :महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीसाठी चौथी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसनं उमेदवार जाहीर करण्यामध्ये शंभरचा टप्पा ओलांडला आहे.  आतापर्यंत १०२ जागांवर कांग्रेसने उमेदवार जाहीर केले आहेत.  या यादीतील विशेष बाब म्हणजे कुलाब्याची जागा अखेर काँग्रेसला गेली आहे.  मुंबईतील आता बोरिवली आणि मुलुंड या दोनच जागा  जाहीर होणे बाकी आहे.

सोलापूर शहर मध्य मधून अखेर काँग्रेसचा उमेदवार घोषित करण्यात आला आहे.  शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना काँग्रेसनं उमेदवारी देण्यात आली. या जागेवर महाविकास आघाडीतर्फे माकपचे नरसय्या आडम हे देखील इच्छुक होते.मात्र, आडम यांना महाविकास आघाडीने संधी न देता चेतन नरोटे यांना संधी दिली आहे. माकपला महाविकास आघाडीने धक्का दिला असल्याचं स्पष्ट झालं आहे. कोल्हापूर उत्तरमधील उमेदवार देखील काँग्रेसनं बदलला आहे.राजेश लाटकर यांच्या जागी मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

काँग्रेसनं तिसऱ्या यादीत कुणाला स्थान दिलं? 

अकोला पश्चिम : साजिद खान मन्नन खान 

कुलाबा : हीरा देवासी 

सोलापूर शहर मध्य : चेतन नरोटे 

कोल्हापूर उत्तर : मधुरिमाराजे छत्रपती यांना राजेश लाटकर यांच्या जागी उमेदवारी देण्यात आली.

अकोला पश्चिम काँग्रेसकडे,  सोलापूर शहर मध्ये माकपला नाहीच

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं जोर लावला होता. शिवसैनिकांनी देखील अकोला पश्चिम जागेसाठी आग्रह धरला होता. मात्र, काँग्रेसनं ही जागा मिळवण्यात यश मिळवलं. सोलापूर शहर मध्य मधून चेतनसिंह नरोटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या ठिकाणी माकपचे नरसय्या आडम मास्तर इच्छुक होते. लोकसभेला त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यामुळं त्यांना जागा सोडली जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, या ठिकाणी काँग्रेसनं उमेदवार दिला आहे. 

काँग्रेसनं शंभरचा टप्पा ओलांडला...

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसनं शंभर जागांचा टप्पा ओलांडला आहे. काँग्रेसनं आतापर्यंत 102 उमेदवार जाहीर केले आहेत. तर, ठाकरेंच्या शिवसेनेनं 85 उमेदवार जाहीर केले आहेत. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 82 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मविआकडून समाजवादी पार्टीला 2 आणि माकपला कळवण आणि डहाणूची जागा दिली जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच महाविकास आघाडीमधील 273 जागांवरील पेच सुटला आहे. मविआ शेकापला किती जागा सोडणार हे देखील पाहावं लागेल. 

इतर बातम्या : 

Eknath Shinde Candidate list 2024 : विखे-थोरात वादाने राजकारण पेटलं, पण उमेदवार जाहीर करत शिंदे गटाने संगमनेरचं मैदान मारलं!

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Embed widget