Maharashtra CM Oath Ceremony: शपथविधी सोहळ्यासाठी भाजपची जय्यत तयारी, लोकसभा सदस्यांपासून ते जिल्हा संवादकापर्यंत निमंत्रण
Maharashtra CM Oath Ceremony : भाजपकडून उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज्यभरातून विविध जिल्ह्यातील 29 पदाची यादी जिल्हा कमिटीकडे पाठवण्यात आली आहे.
Maharashtra CM Oath Ceremony मुंबई: मुंबईत आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत गटनेतेपदी अखेर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. विधानभवनातील भाजप विधिमंडळ पक्ष कार्यालयात भाजपची कोअर कमिटीची बैठक झाली.
भाजपचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित करण्यात आले आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या नावावर एकमत झालं. त्यानंतर आता विधिमंडळ पक्ष बैठकीत संमत होण्याची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. या बैठकीत निरीक्षक म्हणून इथे आलेले विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन देखील उपस्थित होते.
प्रत्येक जिल्ह्यातून 29 पदांवरील पदाधिकाऱ्यांना निमंत्रण
दरम्यान, महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार असल्याची माहिती आहे. त्या ठिकाणी मोठी तयारी केली जात आहे. शपथविध सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशातच आता भारतीय जनता पार्टी कडून उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज्यभरातून विविध जिल्ह्यातील 29 पदाची यादी जिल्हा कमिटीकडे पाठवण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची माहिती जमा करण्यात आली असून शपथविधी सोहळ्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये 2017 पासून पुढील मनपा, पंचायत समिती, जिल्हापरिषद सदस्य, नगर परिषद सदस्य, बाजार समिती सभापती, उपसभापती यांचीही माहिती घेण्यात आली आहे.
शपथविधी सोहळ्यासाठी भाजपची निमंत्रीतांची श्रेणी
लोकसभा सदस्य
राज्यसभा सदस्य
बोर्ड, महामंडळ, आयोग अध्यक्ष
माजी खासदार
केंद्रीय पदाधिकारी
प्रदेश पदाधिकारी
विभाग संघटन मंत्री
विधानसभा सदस्य
विधान परिषद सदस्य
प्रदेश कार्यकारणी सदस्य
प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य
निमंत्रित सदस्य
लोकसभा कोअर कमिटी
लोकसभा निवडणूक प्रमुख
विधानसभा निवडणूक प्रमुख
विधानसभा संयोजक
जिल्हाध्यक्ष- महामंत्री
मुंबई पदाधिकारी व मोर्चा पदाधिकारी
देशमुख मोर्चा पदाधिकारी
प्रदेश प्रकोष्ट पदाधिकारी
जिल्हा मोर्चा अध्यक्ष
प्रदेश प्रवक्ते
मंडल अध्यक्ष व महामंत्री
मनपा, जि प, पं समिती, नगरपरिषद व नगरपंचायत सदस्य (2017 पासून पुढील)
बाजार समिती सभापती व उपसभापती ( 2017 पासून पुढील)
जिल्हा बँक व सहकारी बँक संचालक/ भाजप पदाधिकारी
सर्व प्रकोष्ट जिल्हा संयोजक
विधानसभा विस्तारक
जिल्हा संवादक
अजित पवार गटाचे संभाव्य मंत्री कोण?
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंत्रिपदी ज्यांची वर्णी लागू शकते त्या नेत्यांची नाव एबीपी माझाच्या हाती लागली आहेत. आदिती तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद कायम राहणार असल्याचं कळतंय. तर दत्ता भरणे, नरहरी झिरवाळ, संजय बनसोडे, इंद्रनील नाईक, संग्राम जगताप आणि सुनील शेळके यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते. दरम्यान, राष्ट्रवादीला राज्य सरकारमध्ये 7 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री पदं हवी असल्याची सूत्रांची माहिती आहे. याशिवाय प्रफुल पटेलांसाठी केंद्र सरकारमध्ये एक कॅबिनेट पद, तसंच पक्षातील वरिष्ठ नेत्यासाठी राज्यपाल पदाचीही मागणी असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा
- Mahayuti Oath Ceremony: ठरलं एकदाचं! उद्या आझाद मैदानात महायुतीचा शपथविधी; परिसरातील वाहतूक मार्गात बदल, पर्यायी मार्ग कोणते?
- आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?