Maha Vidhan Sabha Nivadnuk 2024 LIVE : बिग ब्रेकिंग! पुण्यात नाकाबंदीत 138 किलो सोने जप्त
Maha Vidhan Sabha Nivadnuk 2024 LIVE : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षानं आपापल्या परीनं उमेदवार जाहीर केले आहेत.

Background
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 LIVE Updates : बारामतीत पुन्हा एकदा पवार विरूद्ध पवार अशी लढत होतेय.. होय.. शरद पवारांनी अजित पवारांच्या विरोधात त्यांचा पुतण्या युगेंद्र पवारला आखाड्यात उतरवलंय.. लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अजित पवारांनी कोणती रणनीती आखलीय, तर नातवाला जिंकवण्यासाठी शरद पवार कोणता डाव टाकणार आहेत?
मविआत 85 चा फॉर्म्युला ठरला असला तरी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेतल्या काही जागांचा तिढा मात्र सुटत नाहीय... त्यातल्या विदर्भातल्या जागांमध्ये कळीचा वाद ठरलाय रामटेक मतदारसंघाचा...ठाकरेंनी याठिकाणी उमेदवारी जाहीर केली असली तरी काँग्रेसनं मात्र अजूनही आशा सोडलेला नाहीय. त्यामुळे रामटेकमध्ये लोकसभेसारखी सांगलीची पुनरावृत्ती होणार का, असा प्रश्न पडलाय.
Pune News: पुण्यात नाकाबंदी दरम्यान 138 कोटींचं सोनं जप्त
Pune News: सातारा रस्त्यावर आज सकाळच्या सुमारास नाकाबंदी पोलिसांनी 138 कोटींचं सोने जप्त केले.
एका संशयित वाहनाची पोलिसांनी झडती घेतली असता त्यात हे सर्व सोन्याचे दागिने सापडले.
हे सोनं नेमकं आले कुठून, कुठे जात होते? कुणाचे होते याचा तपास आता पोलीस करत आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात जागोजागी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे..
संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे.. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे 138 कोटी रुपये किंमत असलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत...
Gondia Vidhan Sabha Election 2024 : गोंदियातील मोरगाव अर्जुनी मतदारसंघात हायव्होल्टेज ड्रामा
Gondia Vidhan Sabha Election 2024 : गोंदियातील मोरगाव अर्जुनी मतदारसंघात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. आधी महायुतीत बंडखोरी झाली. त्यानंतर आता मविआतही बंडखोरीची चिन्ह दिसत आहेत. मविआत मोरगाव अर्जुनीची उमेदवारी कुठल्याही घटक पक्षाला गेली तरी चालेल. मात्र आयात उमेदवाराला तिकीट देऊ नये, अन्यथा बंडखोरी करु असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिला. मोरगाव अर्जुनीत काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप बनसोड इच्छुक आहेत. ते तिरोडा तालुक्यातील असून फक्त निवडणूक लढण्यासाठी त्यांनी मोरगाव अर्जुनीमध्ये तात्पुरतं घर घेतल्याचा आरोप स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अनेक वेळा केला आहे.



















