एक्स्प्लोर

बोगस मतदारांवरुन बीडमध्ये संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर गटात राडा

पाटोदा मतदारसंघातून बीड मतदारसंघात बोगस मतदार मतदानासाठी आणल्याचा आरोप आहे. हे 10 ते 15 मतदार जयदत्त क्षीरसागर यांच्या संस्थेतील कर्मचारी असल्याचं कळतं.

बीड : राज्यभरात लोकशाहीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. सामान्य नागरिकांसह, राजकारणी आणि सेलिब्रिटीही मतदानाचा हक्क बजावत आहेत. मात्र मतदानाच्या वेळी काही ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याची तर काही ठिकाणी दोन गटात राडा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. बीडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर आणि शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर गटात बोगस मतदारांवरुन जुंपली. पाटोदा मतदारसंघातून बीड मतदारसंघात बोगस मतदार मतदानासाठी आणल्याचा आरोप आहे. हे 10 ते 15 मतदार जयदत्त क्षीरसागर यांच्या संस्थेतील कर्मचारी असल्याचं कळतं. ओळखपत्रावरील फोटो आणि मतदार यांचे फोटो जुळत नसल्याने हा प्रकार समोर आला. हा प्रकार घडला त्यावेळी संदीप क्षीरसागर उपस्थित होते. या हे कर्मचारी खरंच जयदत्त क्षीरसागर यांच्या संस्थेतील आहे का? याची चौकशी पोलिस करत आहेत. दरम्यान, जयदत्त क्षीरसागर यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत. काका-पुतण्या समोरासमोर, राहायला मात्र एकच बंगला बीड मतदारसंघात काका-पुतण्या अशी लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून संदीप क्षीरसागर निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांना शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागर यांचं आव्हान आहे. निवडणुकीच्या मैदानात हे काका-पुतण्या एकमेकांच्या विरोधात उभे असले तरी त्यांचं वास्तव्य एकाच घरात आहे. बीडमधील नगर रोडवर त्यांचा बंगला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा कार्यकर्त असो किंवा शिवसेनेचा त्याला कामासाठी आपल्या नेत्याला भेटायचं असेल तर या बंगल्यावरच यावं लागतं. क्षीरसागर कुटुंबामध्ये उभी फूट बीड नगरपालिकेच्या निवडणुकीवरुन क्षीरसागर कुटुंबांमध्ये उभी फूट पडली. त्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर यांच्यापासून फारकत घेतली. त्याचवेळी संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादीकडून बळ मिळालं आणि जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मागच्या दोन अडीच वर्षापासून संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपले चांगलेच बस्तान बसवले अगदी बीड नगरपालिकेमध्ये दोन्ही काकांना धोबीपछाड देत संदीप क्षीरसागर यांनी सर्वात जास्त नगरसेवक निवडून आणले शिवाय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सुद्धा काकाच्या राजकारणाला धक्का देत विजय संपादन केला आता पुन्हा हे काका-पुतणे आमने-सामने उभे आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

 Chhatrapati Sambhajinagar Fire News : मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग; 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण थोडक्यात बचावले
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न, 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण थोडक्यात बचावले
Vidyanand Bapat : विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? रत्नागिरीतून आई वडिलांचा विद्यानंद बापट यांना भावनिक फोन
विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? आई वडिलांचा भावनिक फोन
Goa : गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार, भाजप सरकारची मोठी घोषणा 
गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार
Smriti Mandhana: स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम
स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम

व्हिडीओ

Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 Chhatrapati Sambhajinagar Fire News : मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग; 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण थोडक्यात बचावले
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न, 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण थोडक्यात बचावले
Vidyanand Bapat : विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? रत्नागिरीतून आई वडिलांचा विद्यानंद बापट यांना भावनिक फोन
विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? आई वडिलांचा भावनिक फोन
Goa : गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार, भाजप सरकारची मोठी घोषणा 
गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार
Smriti Mandhana: स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम
स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम
Rohit Sharma : रोहित शर्माच्या रिटायरमेंटच्या दिवसभर चर्चा, अखेर बीसीसीआयचे सचिव मैदानात, हिटमॅनच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज
रोहित शर्माच्या रिटायरमेंटवरुन तर्क वितर्क, अखेर BCCI चे सचिव समोर आले अन् सगळं स्पष्ट केलं
सातारा, कोल्हापूरचा जीआर काढा, प्रमाणपत्र काढताना वंशावळ ग्राह्य धरली जात नाही, मंत्रालयामध्ये कधी मराठा-कुणबी स्वतंत्र कक्षाची स्थापना करणार? जरांगे पाटलांची सरकारच्या शिष्टमंडळासमोर प्रश्नांची सरबत्ती

BCCI : अखेर युवा खेळाडूचा फसवाफसवीचा खेळ संपला, बीसीसीआयनं थेट दोन वर्षाची बंदी घातली  
युवा खेळाडूचा फसवाफसवीचा खेळ संपला, बीसीसीआयनं थेट दोन वर्षाची बंदी घातली
Permanently Shifted! SIR मधून चक्क भाजप खासदार राघव चड्ढांचं नाव वगळलं; पंजाब सरकारवर गंभीर आरोप करत म्हणाले, 'जेव्हापासून मी आप सोडला तेव्हापासून..' आपचा सुद्धा पलटवार
Permanently Shifted! SIR मधून चक्क भाजप खासदार राघव चड्ढांचं नाव वगळलं; पंजाब सरकारवर गंभीर आरोप करत म्हणाले, 'जेव्हापासून मी आप सोडला तेव्हापासून..' आपचा सुद्धा पलटवार
Embed widget