एक्स्प्लोर
Advertisement
महायुतीला 204, महाआघाडीला 69 जागा, 3 वाजेपर्यंतच्या मतदानानुसारच्या एक्झिट पोलचा अंदाज
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात 54.53 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात 54.53 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार एबीपी माझा सी वोटरने निवडणुकीच्या निकालाचा सर्व्हे केला.
एबीपी माझा सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार शिवसेना-भाजप-रिपाइं महायुती 204 (192 ते 216) जागा जिंकण्याची शक्यता आहे. महाआघाडीला 69 (55 ते 81) जागा मिळतील अशी शक्यता आहे. तर इतर पक्ष आणि अपक्षांना 15 (4 ते 21)मिळतील.
विभागनिहाय आकडेवारी (दुपारी 3 वाजेपर्यंत झालेल्या मतदानानुसारच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार)
1. मुंबईतल्या एकूण 36 जागांपैकी महायुतीला 31, महाआघाडीला 4 तर जागा मिळतील. एक जागा इतरांना मिळेल.
2. कोकण विभागातील एकूण 39 जागांपैकी 32 जागांवर महायुती जिंकेल, 5 जागा महाआघाडीला मिळतील तर इतरांना दोन जागा मिळतील.
3. मराठवाडा विभागातील एकूण 46 जागांपैकी 26 जागा महायुतीला मिळतील, तर 14 जागांवर महाआघाडी विजय मिळेल, इतरांना 6 जागा मिळतील.
4. उत्तर महाराष्ट्र विभागातील एकूण 35 जागांपैकी 23 जागांवर महायुती जिंकेल, 12 जागा महाआघाडीला मिळतील. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
5. विदर्भातील एकूण 62 जागांपैकी 50 जागांवर महायुती जिंकेल, 9 जागा महाआघाडीला मिळतील तर इतरांना 3 जागा मिळतील.
6. पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 70 जागांपैकी 42 जागांवर महायुती जिंकेल, 25 जागा महाआघाडीला मिळतील तर इतरांना 3 जागा मिळतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement