नाचता येईना अन् अंगण वाकडं, EVM ला दोष देण्यापेक्षा आत्मचिंतन करा, सुरज चव्हाणांची विरोधकांवर टीका
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांकडून EVM बाबत संशय व्यक्त केला आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट युवके प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हण (Suraj Chavan) यांनी विरोधकांवर टीका केलीय.
Suraj Chavan : विधनसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महायुतीला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार (Mahayuti Govt) स्थापन होणार आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांकडून EVM बाबत संशय व्यक्त केला आहे. या मुद्यावरुन भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावरही टीका होत आहे. दरम्यान, याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट युवके प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हण (Suraj Chavan) यांनी विरोधकांवर टीका केलीय. विरोधकांची अवस्था "नाचता येत नाही अंगण वाकड" अशी झाली आहे. विरोधकांनी EVM ला दोष देण्यापेक्षा आत्मचिंतन करावं लोकांनी त्यांना का नाकारलं? असा सवाल चव्हाण यांनी केला आहे.
तिकीट वाटप करताना मारामारी करणाऱ्या विरोधकांना लोक कसे स्वीकारतील?
सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी ट्वीट करत विरोधकांवर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर लोकांचा विश्वास गमावून बसलेल्या विरोधकांनी EVM ला दोष देण्यापेक्षा आत्मचिंतन करावं लोकांनी त्यांना का नाकारलं असे चव्हाण म्हणाले. निवडणुकीनंतर विरोधात काम केलं म्हणून मित्रपक्षांच्या खासदाराच्या विरोधात आंदोलन करावं लागलं. तिकीट वाटप करताना मारामारी करणाऱ्या विरोधकांना लोक कसे स्वीकारतील असा टोला देखील चव्हाण यांनी विरोधकांना लगावला.
विरोधकांची अवस्था "नाचता येत नाही अंगण वाकड" अशी झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर लोकांचा विश्वास गमावून बसलेल्या विरोधकांनी EVM ला दोष देण्यापेक्षा आत्मचिंतन करावं लोकांनी त्यांना का नाकारलं.
— Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) November 30, 2024
निवडणुकीनंतर विरोधात काम केलं म्हणून मित्रपक्षांच्या खासदाराच्या विरोधात आंदोलन करावं…
अनेक पराभूत उमेदवारांनी केली फेर मतमोजणीची मागणी
महाराष्ट्र राज्य विधानसभेचे निकाल लागल्यानंतर विरोधकांकडून EVM बद्दल संशय व्यक्त केला जात आहे. देश विदेशातील जाणकार याबाबत आपले मत मांडत आहेत. तर विरोधक EVM मध्ये गैरप्रकार झाल्याचे सांगत आहे. अनेक पराभूत उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी देखील केली आहे. अनेकांनी यासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळं या मुद्यावरुन सध्या आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार 20 नोव्हेबर रोजी रात्री 11.30 वाजेपर्यंत 65.2 टक्के मतदान झाले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जाहीर केलेली अधिकृत आकडेवारी 66.5 टक्के होती असे मुख्य निवडणूक अधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात नाना पटोले यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने स्वत: अधिकृतरित्या जाहीर केलेल्या आकडेवारीत 1.03 टक्क्यांची तफावत कुठून आली? असा सवाल देखील विरोधकांकडून केला जातोय. विरोधकांच्या याच मुद्यावर महायुतीचे नेते टिका करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या: