(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Election Results 2024: छत्रपती संभाजीनगरचा बालेकिल्ला ठरला! छत्रपती संभाजीनगरमध्ये मशाल की धन्युष्यबाण कोण विजयाच्या उंबरठ्यावर?
Maharashtra Election Results 2024: निवडणुक आयोगाकडून आलेल्या पहिल्या फेऱ्यांमधील कल पाहता सुरुवातीला पिछाडीवर असलेले शिंदे गटाचे उमेदवार आता आघाडीवर आल्याचे दिसते.
Maharashtra Election Results 2024: राज्याच्या विधानसभा निवडणुकांसाठी २० नोव्हेंबरला मतदान झाले. मराठवाड्यात ४६ जागांसाठी झालेल्या मतमोजणीचे निकाल येऊ लागले आहेत. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने? अशी उत्सुकता शिगेला पोहोचली असताना उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्धव ठाकरेंचे सर्व उमेदवार पिछाडीवर असल्याचं समोर आलं आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर विधानसभा मतदारसंघांमध्ये फुटीनंतर उद्धव ठाकरेंना मतदारांचा कौल नसल्याचं समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे सर्वच्या सर्व म्हणजे ६ उमेदवार आघाडीवर आहेत.
राज्यातील 288 विधानसभा मतदार संघातील मतमोजणीचे कल हाती येत आहेत. 288 पैकी भाजपने शंभरी ओलांडली असून शिंदेसेनेने 50 चा आकडा पार केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटानेही साधारण 30 च्या पुढे जागांवर आघाडी मिळवल्याचे चित्र आहे. दरम्यान, मराठवाड्यातील 46 मतदारसंघातील मतमोजणीचे कल हाती येत आहेत. निवडणुक आयोगाकडून आलेल्या पहिल्या फेऱ्यांमधील कल पाहता छत्रपती संभाजीनगर सुरुवातीला पिछाडीवर असलेले शिंदे गटाचे उमेदवार आता आघाडीवर आल्याचे दिसते. औरंगाबाद पश्चिममधून संजय शिरसाट हे पिछाडीवरून आघाडीवर गेले आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरेंचे सर्व उमेदवार पिछाडीवर असल्याचे समोर आल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा झटका बसला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
छत्रपती संभाजीनगरमध्ये ९ मतदारसंघ आहेत. सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेसेनेला मतदारांचा पाठिंबा असल्याचं चित्र हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहे. जिल्ह्यातील ९ मतदारसंघात सध्या आघाडीवर शिंदेंची शिवसेना असून ९ पैकी ६ जागांवर शिंदेंची शिवसेना आघाडीवर आहे. भाजप एका जागेवर आघाडीवर असून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे एक जागा असल्याचं दिसतंय. एमआयएम औरंगाबाद पूर्व मतदारसंघात आघाडीवर असल्याचं चित्र आहे.
शिंदे गटाचे सर्व उमेदवार आघाडीवर
छत्रपती संभाजीनगर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. पण शिवसेनाफुटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेने छ. संभाजीनगरात एकाकी पडल्याचे चित्र आहे. निवडणूक आयोगाकडून येत असलेल्या मतमोजणीच्या आकड्यांनुसार, सकाळच्या सत्रात पिछाडीवर असलेले शिंदे सेनेचे सर्व उमेदवारांनी मुसंडी मारत आघाडीकडे घोडदौड केली आहे. सिल्लोडमध्ये पिछाडीवर असलेले अब्दुल सत्तार आता आघाडीवर गेले आहेत. शिवाय संजय शिरसाटही आघाडीवर गेल्याचे सांगण्यात येत आहे.
औरंगाबाद पूर्वमध्ये इम्तियाज जलील आघाडीवर
कन्नडधून अपक्ष म्हणून उभारलेले हर्षवर्धन जाधव पिछाडीवर आहेत. औरंगाबाद पूर्वमध्ये एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील आघाडीवर आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठे चुरशीची लढत?
छत्रपती संभाजीनगरच्या ९ मतदारसंघात बहुतांश ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत आहे.पण मराठा मतपेढी कोणत्या शिवसेनेबरोबर जाणार? मुस्लिम बांधवांचा कल कोणाच्या बाजूनं राहणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. दरम्यान, पूर्व औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष आहे. लाडकी बहीण आणि धार्मिक ध्रूविकरणाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद पूर्वची लढत चुरशीची होणार आहे. भाजपचे अतुल सावे, MIM चे इम्तियाज जलील आणि काँग्रेसकडून लहू शेवाळे या प्रमुख उमेदवारांमध्ये ही होत आहे. शिवाय कन्नडमध्येही उद्धव ठाकरे गटाचे उदयसिंग राजपूत विजयी ठरतात की शिंदे गटाच्या संजना जाधव याकडेही राज्याचं लक्ष आहे.