Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी मुंबईतील आणखी एक उमेदवार जाहीर केला, भाजपच्या मंगलप्रभात लोढांविरुद्ध शिलेदार रिंगणात
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं मुंबईतील आणखी एका मतदारसंघात उमेदवार जाहीर केला आहे. मंगलप्रभात लोढा यांच्या विरुद्ध भैरुलाल चौधरी जैन निवडणूक लढवणार आहेत.
![Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी मुंबईतील आणखी एक उमेदवार जाहीर केला, भाजपच्या मंगलप्रभात लोढांविरुद्ध शिलेदार रिंगणात Maharashtra Assembly Election 2024 Uddhav Thackeray gave announced candidate for Malbar Hill Bhairulal Choudhary Jain contest against Mangal Prabhat Lodha Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी मुंबईतील आणखी एक उमेदवार जाहीर केला, भाजपच्या मंगलप्रभात लोढांविरुद्ध शिलेदार रिंगणात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/26/1afd7198f5963a17586858463d529dcf1729938379918989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुंबईतील आणखी एका मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. मुंबईतील एकूण 36 मतदारसंघांपैकी 19 ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मलबार हिल मतदारसंघ आम आदमी पक्षाकडे जाणार अशा चर्चा सुरु होत्या. अखेर मलबार हिल मतदारसंघ देखील ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाला आहे. ठाकरेंकडून मलबार हिल मतदारसंघात भैरुलाल चौधरी जैन यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष लढत आहेत. मुंबईतील आतापर्यंतच्या जागा वाटपाचा आढावा घेतला असता मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेनं 19 उमेदवार जाहीर केले आहेत. कालपर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेनं 18 उमेदवार जाहीर केले होते. आज आणखी एका जागेवर ठाकरेंच्या शिवेसनेकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. मलबार हिल मतदारसंघातून भैरुलाल चौधरी जैन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
मलबार हिलमधून आप निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, आम आदमी पक्षानं मतांचं विभाजन व्हायला नको म्हणून महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं मलबार हिल मतदारसंघ देखील ठाकरेंच्या वाट्याला गेला आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून आतापर्यंत मुंबईतील 19 उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसकडून 7 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं एका जागेवर उमेदवार जाहीर केला आहे. म्हणजेच मुंबईत मविआनं 27 उमेदवार जाहीर केले आहेत. मविआकडून मुंबईतील 9 उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत.
मविआमध्ये काही जागांवर अजूनही चर्चा सुरुच
महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष मिळून प्रत्येकी 90 जागा लढवणार आहेत. तर, उरलेल्या 18 जागा मित्रपक्षांसाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही काही जागांवर चर्चा सुरु आहेत.
दरम्यान, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी मविआकडून आतापर्यंत 192 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. मविआतील पक्षांकडून अद्याप 92 जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आलेली नाही. महाविकास आघाडीतील शेकाप, समाजवादी पार्टी आणि डाव्या पक्षांना किती आणि कोणत्या जागा मिळणार हे पाहावं लागेल.
इतर बातम्या :
नवाब मलिकांपासून भाजप दोन हात लांब राहणार! बड्या नेत्यानं थेट भूमिकाच जाहीर करून टाकली
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)