साईबाबांनी आशीर्वाद दिल्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा केव्हाच मुख्यमंत्री झाले नसते, दीपक केसरकरांचा टोला
गेल्या 15 वर्षात मी काय काम केलं यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. पण ते सोडा गेल्या 5 वर्षात 2500 कोटी रुपयांचा निधी आणल्याचे वक्तव्य मंत्री दीपक केसरकरांनी ( Minister Deepak Kesarkar) केलं.
Deepak Kesarkar : गेल्या 15 वर्षात मी काय काम केलं यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. पण ते सोडा गेल्या 5 वर्षात 2500 कोटी रुपयांचा निधी आणल्याचे वक्तव्य मंत्री दीपक केसरकरांनी ( Minister Deepak Kesarkar) केलं. उद्धव ठाकरे सावंतवाडीत येऊन साई बाबांबद्दल (Sai Baba) बोलतात. मात्र साईबाबांनी आशीर्वाद दिले म्हणूनच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा उद्धव ठाकरे केव्हाच मुख्यमंत्री झाले नसते असा टोला केसरकरांनी लगावला. ते सावंतवाडी इथं आयोजीत केलेल्या प्रचारसभेत बोलत होते.
नारायण राणे यांनी मला पहिल्यांदा आमदार केलं.
सावंतवाडी विधानसभा मतदासंघाचे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सावंतवाडीत जाहीर सभा होत आहे. या सभेत केसरकर बोलत होते. नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हाची स्थिती बघा. त्यावेळी किती मताधिक्य होत ते बघा असेही केसरकर म्हणाले. नारायण राणे यांनी मला पहिल्यांदा आमदार केलं. विधानपरिषदेत मी आठ वेळा बजेट सादर केल्याचे केसरकर म्हणाले. जी युती बाळासाहेबांनी निर्माण केली, ती युती सिंधुदुर्गात मोडायचं काम उद्धव ठाकरे यांनी केल्याचे दीपक केसरकर म्हणाले. मी स्वतः बजेट सादर करताना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला निधी दिला, मात्र उद्धव ठाकरे म्हणतात आपण निधी दिला असेही केसरकर म्हणाले.
दीपक केसरकर विरुद्ध राजन तेली काँटे की टक्कर
देशातील एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपास आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनाची पंढरी म्हणून ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच सिंधुदुर्गात मालवणमधील समुद्रात सिंधुदुर्ग किल्ला उभारला आणि आरमाराची देखील स्थापना केली म्हणूनच भारतीय आरमाराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना संबोधलं जातं. सिंधुदुर्ग जिल्हा हा ऐतिहासिकच नाही तर पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणचे स्वच्छ सुंदर समुद्रकिनारी हे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. त्यासोबतच हिरवागार निसर्ग, स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा हा पर्यटकांना आकर्षित करतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली अशी एकूण तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील सावंतवाडी मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून दीपक केसरकर निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे राजन तेली निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळं ही लढत रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या: