एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Election 2024 : 'मी आमदार झालो तर सर्व पोरांची लग्न लावून देईन'; धनंजय मुंडेंच्या विरोधातील उमेदवाराचं अजब आश्वासन

बाबूराव तुमचं लग्न करायचंय..त्यामुळं आगे बढो म्हणल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही असं म्हणताच मतदारांमध्येही हशा पिकला होता. तरुण पोरांना काम मिळवून देणार असं आश्वासनही त्यांनी केले. 

Beed: राज्यात विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी उमेदवारांची आश्वासनं सुरु झाली आहेत. आता  राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या उमेदवारानं काहिसं हास्यास्पद आश्वासन देत परळीच्या मतदारांचं लक्ष वेधून घेतलंय. मी आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न करून देऊ असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या या उमेदवारानं प्रचाराचा शुभारंभ केल्याचं दिसतंय. बीड जिल्ह्याच्या परळी मतदारसंघात केलेल्या या अजब आश्वासनाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने बीडमधील परळी विधानसभा मतदारसंघातून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. 

आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न!

परळीत आपल्या प्रचाराचा शुभारंभ करताना शरद पवार गटाचे परळीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी अजब आश्वासनं देत मतदारांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ते म्हणाले, तरुण पोरांना लग्नासाठी विचारताना लोक विचारतात, पोराला नोकरी आहे का विचारतात. सरकारच देत नाही तर कशी लागणार..काही उद्योगधंदा आहे का? पालकमंत्र्याचाच उद्योगधंदा नाही तर पोरांचा कसा असेल. यामुळं सगळ्या पोरांचं लग्न होणं अवघड झालंय. त्यामुळं सगळ्या पोरांना मी आश्वासन देतो, जर मी आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न लावून देऊ असं अजब आश्वासन राजेसाहेब देशमुख यांनी केलंय.

बाबूराव तुमचं लग्न करायचंय..त्यामुळं आगे बढो म्हणल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही असं म्हणताच मतदारांमध्येही हशा पिकला होता. तरुण पोरांना काम मिळवून देणार असं आश्वासनही त्यांनी केले. 

कूचकामी पालकमंत्री म्हणत धनंजय मुंडेंवर टीका

काय चाललंय जिल्ह्यात हुकमी एक्का आणि दादागिरी.. दिसेल त्याला दाबणे. जिल्ह्यात निश्क्रीय आणि कुचकामी पालकमंत्री असल्याचं सांगत त्यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केलाय. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prajakt Tanpure :  प्राजक्त तनपुरेंची राहुरीच्या पोटनिवडणुकीवर पहिली प्रतिक्रिया, कार्यकर्त्यांचा उल्लेख अन् मुख्यमंत्र्यांचं कौतुक,राजकीय वर्तुळात चर्चा सुरु
प्राजक्त तनपुरेंकडून पोटनिवडणूक जाहीर होताच कार्यकर्त्यांचा उल्लेख आणि मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राजकीय वर्तुळात चर्चा सुरु
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
Baramati : बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर? निवडणूक जाहीर होताच नवी अपडेट, नेमकं काय घडलं?
बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर? निवडणूक जाहीर होताच नवी अपडेट
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
West Bengal Election in 2 phases: केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
Embed widget