एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nagpur Vidhansabha Election 2024: भाजपचा गड अभेद्य! देवेंद्र फडणवीसांचा नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून सहाव्यादा दणदणीत विजय

South-West Nagpur Vidhan Sabha : उपराजधानी नागपुरातील एकूण 12 विधानसभा मतदारसंघांपैकी अतिशय महत्वाचा मतदारसंघ असलेल्या नागपूर दक्षिण-पश्चिम (नैऋत्य) मध्ये यंदाची निवडणूक अधिक चुरशीची होणार  आहे.

South-West Nagpur VidhanSabha 2024 Result : लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश बाजूला सारुन महायुतीने विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय चमत्कार करुन दाखवला आहे. विशेष म्हणजे गेल्या लोकसभेत भाजप आणि महायुतीला विदर्भात दारुण पराभवाला समोर जावे लागले होते.  दरम्यान आज  (शनिवारी) सकाळी आठ वाजल्यापासून विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या तीन तासांमध्ये महायुतीला (Mahayuti) प्रचंड मोठे यश मिळताना दिसत आहे. दरम्यान, राज्यासह देशाचे लक्ष लागून राहीलेल्या  अतिशय महत्वाच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे. देवेंद्र फडणवीसांनी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून एकहाती यश खेचत दणदणीत विजय मिळवला आहे. 

दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून सहाव्यादा दणदणीत विजय

 महाराष्ट्रातील 288 विधानसभा निवडणुकांच्या निकालाची अपडेट हाती येत असून भाजप महायुतीला तब्बल 200 पेक्षा जास्त जागांवर आघाडी पाहायला मिळत आहे. त्यामुळे, राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार असे चित्र दिसून येते. या निकालानंतर भाजप महायुतीलमधील सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष व्यक्त केला आहे. एकीकडे भाजप नेत्यांकडूनही पेढे वाटून जल्लोष केला जात असताना, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या कार्यालयात शुकशुकाट झाल्याचे चित्र आहे. तर, भाजपने 100 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा रंगली आहे. त्यातच, देवेंद्र फडणवीस यांचे सख्खे भाऊ आशिष फडणवीस यांनी आनंद व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत, असेही त्यांनी म्हटले. 

विजयाचे श्रेय महायुतीच्या सर्व शेलेदारांना- देवेंद्र फडणवीस

दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे प्रत्यक्ष सहाव्यादा निवडनुकीच्या मैदानात उतरले आहेत. तर पहिल्या कलापासून  फडणवीस हे आघाडीवर असल्याचे चित्र आहे. तर त्यानंतर जसजशी आकडेवारी पुढे येत गेली त्यानुसार देवेंद्र फडणवीसांच्या विजयी आश्वाची घोडदौड सुरूच असल्याची चित्र आहे. दरम्यान नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारांचा कौल बघता  देवेंद्र फडणवीसांचे बंधु आशिष फडणवीस हे देखील भारावले आहे. यावेळी त्यांनी बोलताना या संपूर्ण विजयाचे श्रेय महायुतीच्या सर्व शेलेदारांना दिले आहे. देवेंद्र फडणवीसांनी सहाव्या फेरीअखेरीस आपल्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून तब्बल 12,009 मतांनी आघाडी कायम ठेवली आहे. तर आज फडणवीस हे आपल्या नागपूर येथील निवासस्थानी जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांना मोठ्या पराभवाला समोर जावे लागले आहे. ऐकुणात भाजपने मुसंडी मारल्याचे चित्र आहे.

देवेंद्र फडणवीस यांची सलग तिसर्‍यांदा महाराष्ट्राच्या चाणक्यावर मात

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस  (Congress) सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 13 खासदारांसह काँग्रेस राज्यात आणि महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) सर्वात मोठा पक्ष ठरलाय. सांगलीत विशाल पाटील यांच्या विजयामुळे काँग्रेसचे संख्याबळ 14 वर पोहोचणार आहे. महाविकास आघाडीत आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. शिवाय, लोकसभेच्या या निकालामुळे विधानसभेला महाविकास आघाडीतील गणिते बदलणार असणार असल्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे, विदर्भात काँग्रेसने घरवापसी करत दहा पैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळवून दिले आहे. तर भाजप 2 आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या 1 ठिकाणी यश आले आहे. त्यामुळे विदर्भात महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली असून काँग्रेस विदर्भातही सर्वत मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाजप आणि महायुतीला अधिक कस लावावा लागणार असल्याचे उघड आहे. 

नागपूर दक्षिण-पश्चिम (नैऋत्य) विधानसभेचा इतिहास काय?

दरम्यान, दक्षिण-पश्चिम ( नैऋत्य) नागपूर या विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस हे 2009 पासून या मतदारसंघाचं नेतृत्व करतात. विशेष म्हणजे नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निर्मिती ही 2008 साली झाली. त्यानंतर 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने या मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांना रिंगणात उतरवले. तेव्हापासून आजपर्यंत सलग देवेंद्र फडणवीसांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले असून ते सलग तीन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. तसेच त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपदसह अनेक पदे सांभाळली आहेत.

2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेसने प्रफुल्ल पाटील यांना उमेदवारी दिली होती. यापैकी देवेंद्र फडणवीस यांना 59.21 टक्के मते मिळाली होती. तर काँग्रेसचे प्रफुल्ल पाटील हे दुसऱ्या क्रमांकावर होते, त्यांना एकूण 28.57  टक्के मते मिळाली होती. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीबाबत बोलायचं झाल्यास, काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आशिष देशमुख यांना रिंगणात उतरवले होते. मात्र यात देवेंद्र फडणवीस यांना परत विजय मिळाला असला तरी त्यांची मतं जवळपास दोन टक्क्यांनी कमी झाल्याचं बघायला मिळालं होतं. त्यामुळे 2024 मध्ये महाविकास आघाडीने प्रबळ उमेदवार दिल्यास देवेंद्र फडणवीस यांना आपल्याच मतदारसंघात संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधे पाटीलांचा दारुण पराभव 

विशेष म्हणजे अलिकडे झालेल्या हरियाणा, जम्मू काश्मीर येथील निवडणुकांसाठी सहप्रभारी म्हणून काँग्रेसने प्रफुल गुडधे यांना जबाबदारी दिली होती. दरम्यान, नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून 2014 ला काँग्रेसकडून प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी निवडणूक लढवली होती. शिवाय आधी याच मतदारसंघाचा भाग असलेल्या पश्चिम नागपूरमधून ते दोनवेळा भाजपचे आमदार राहिले आहेत. त्यामुळे यंदाही काँग्रेसने त्यांना उमेदवारी देत मैदानात उतरवले होते. तर या शर्यतीत तिसरे आणि निश्चित नाव म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा उमेदवार विनय भांगे यांना दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली होती. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी एकहाती विजय खेचून आणले आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Vidhan Sabha Election Results 2024 : महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
Maharashtra vidhansabha Results 2024 देवाभाऊंचं यश पाहून सख्खा भाऊ पहिल्यांदाच टीव्हीवर; आशिष फडणवीस मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टच म्हणाले....
देवाभाऊंचं यश पाहून सख्खा भाऊ पहिल्यांदाच टीव्हीवर; आशिष फडणवीस मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टच म्हणाले....
Mahad Assembly Election results : ठाकरेंच्या पहिल्या उमेदवाराकडून पराभव मान्य, भरतशेठ गोगावलेंचा विजय जवळपास निश्चित
ठाकरेंच्या पहिल्या उमेदवाराकडून पराभव मान्य, भरतशेठ गोगावलेंचा विजय जवळपास निश्चित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Vidhan Sabha Election Results 2024 : महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
Maharashtra vidhansabha Results 2024 देवाभाऊंचं यश पाहून सख्खा भाऊ पहिल्यांदाच टीव्हीवर; आशिष फडणवीस मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टच म्हणाले....
देवाभाऊंचं यश पाहून सख्खा भाऊ पहिल्यांदाच टीव्हीवर; आशिष फडणवीस मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टच म्हणाले....
Mahad Assembly Election results : ठाकरेंच्या पहिल्या उमेदवाराकडून पराभव मान्य, भरतशेठ गोगावलेंचा विजय जवळपास निश्चित
ठाकरेंच्या पहिल्या उमेदवाराकडून पराभव मान्य, भरतशेठ गोगावलेंचा विजय जवळपास निश्चित
Eknath Shinde vs Uddhav Thackeray: अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: विधानसभेच्या निकालानंतर शिवसेना भवनात शुकशुकाट, सागर बंगल्यावर आनंदाला भरती
विधानसभेच्या निकालानंतर शिवसेना भवनात शुकशुकाट, सागर बंगल्यावर आनंदाला भरती
Pravin Darekar : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं,  प्रविण दरेकर यांचं महायुतीच्या बाजूनं कल येताच मोठं वक्तव्य
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं, प्रविण दरेकर यांचं मोठं वक्तव्य
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Embed widget