एक्स्प्लोर

Maharashtra Vidhansabha Election 2024: कर्जत मतदारसंघात महायुतीने उधळला गुलाल; शिंदे गटाचे महेंद्र थोरवे यांचा विजय

Maharashtra Assembly Election 2024: महायुतीत असणाऱ्या राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या शिलेदारकडून महेंद्र थोरवे यांच्याविरोधात शक्तिप्रदर्शन केले जात आहे.

Karjat Vidhansabha Election 2024: कर्जत विधानसभा मतदारसंघात पुन्हा शिवसेनेच्या शिंदे गटाने बाजी मारली आहे. महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी पुन्हा विजय मिळवला आहे.महेंद्र थोरवे यांनी 5 हजार 694 मतांनी विजय मिळवला आहे. महेंद्र थोरवे यांना एकूण 94 हजार 871 मते मिळाली. महेंद्र थोरवे यांनी ठाकरे गटाचे नितीन सावंत यांचा पराभव केला. 

2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय झालं?

2019 मध्ये हा मतदारसंघ शिवसेनेने जिंकला होता. कर्जत हा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यांतर्गत येतो. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कर्जतमधून एकुण 11 उमेदवार रिंगणात होते. शिवसेनेचे महेंद्र सदाशिव थोरवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेशभाऊ नारायण लाड यांच्यात मुख्य लढत झाली. यामध्ये महेंद्र थोरवे यांनी बाजी मारत सुरेशभाऊ लाड यांचा पराभव केला. महेंद्र  थोरवे यांनी या मतदारसंघात पहिल्यांदा एक लाख मतदानाचा टप्पा पार केला. 189 कर्जत विधानसभा मतदारसंघात 70.81 टक्के मतदान झाले होते. कर्जत मतदारसंघात कधीही कोणताही उमेदवार सलग तीन वेळा निवडून आले नाहीत, ते आमदार सुरेश लाड यांच्या पराभवाने 2019 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा सिद्ध झाले होते.

2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत काय घडलं?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाच्या सुनील तटकरे यांचा विजय झाला. तर ठाकरे गटाचे नितीन गिते यांना पराभवाचा सामना करावा लागला. सुनील तटकरे यांनी 508352 मते मिळवत अनंत गिते यांचा पराभव केला. सुनील तटकरे यांनी ही निवडणूक 82,784 मतांनी जिंकली. तर ठाकरे गटाच्या अनंत गीते यांना 425568 मते मिळाली. त्यामुळे सुनील तटकरे हे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने निवडून आले आहेत.

गेले दोन वर्षांत अनेक राजकीय भूकंप-

गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सर्वात आधी शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी, त्यानंतर सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळणं, शिंदेंनी भाजपच्या साथीनं महायुती सरकार स्थापन करुन स्वतः मुख्यमंत्रीपदी विराजमान होणं, त्यानंतर अजित पवारांच्या बंडानंतरची राष्ट्रवादीतील फूट, तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी थेट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ठोकलेला दावा. यासर्व घडामोडी राज्याच्या राजकारणाला हादरे देणाऱ्या ठरल्या. त्यामुळे ज्या मतदार राजानं हे राजकीय हादरे झेलले, तो मतदार राजा यंदा राज्याचं सिंहासन कुणाच्या हवाली करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

संबंधित बातमी:

रायगड जिल्ह्यात कोणाचं वर्चस्व, महायुती की महाविकास आघाडी?, संपूर्ण आमदारांची यादी; जाणून घ्या सध्याची राजकीय स्थिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indrajit Sawant : सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करु; प्रशांत कोरटकर पोलिसांना अजून सापडत नसताना आता इतिहासकार इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी
सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करु; प्रशांत कोरटकर पोलिसांना अजून सापडत नसताना आता इतिहासकार इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी
Sanjay Raut : तर यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे; संजय राऊतांनी कदम आणि सावकारेंना फटकारलं; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी...
तर यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे; संजय राऊतांनी कदम आणि सावकारेंना फटकारलं; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी...
Uttarakhand Badrinath Massive Avalanche : उत्तराखंडमध्ये महामार्गावर हिमस्खलनात 57 मजूर अडकले; 16 मजुरांना बाहेर काढण्यात यश
उत्तराखंडमध्ये महामार्गावर हिमस्खलनात 57 मजूर अडकले; 16 मजुरांना बाहेर काढण्यात यश
Nagpur Crime News: नागपुरातील कुख्यात गुन्हेगारांसोबतच्या इन्स्टाग्राम रिल्समध्ये गजा मारणे; सायबर पोलिसांकडून दखल, गुन्हा दाखल 
नागपुरातील कुख्यात गुन्हेगारांसोबतच्या इन्स्टाग्राम रिल्समध्ये गजा मारणे; सायबर पोलिसांकडून दखल, गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Datta Gade Crime News | अटकेपूर्वी आरोपी दत्ता गाडेचा जीवन संपवण्याचा प्रयत्न? तर योगेश कदमांच्या वक्तव्याने विरोधक आक्रमकABP Majha Marathi News Headlines  3 PM TOP Headlines 3 PM 28 February 2025Pakistan Lahor Market : Champions Trophy 2025 निमित्त लाहोर मार्केटमध्ये सुनंदन लेलेंचा फेरफटकाDevendra fadnavis PC : योगेश कदमांनी संवेदनशीलपणे बोलावं, मुखमंत्र्यांनी कान टोचले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indrajit Sawant : सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करु; प्रशांत कोरटकर पोलिसांना अजून सापडत नसताना आता इतिहासकार इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी
सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करु; प्रशांत कोरटकर पोलिसांना अजून सापडत नसताना आता इतिहासकार इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी
Sanjay Raut : तर यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे; संजय राऊतांनी कदम आणि सावकारेंना फटकारलं; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी...
तर यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे; संजय राऊतांनी कदम आणि सावकारेंना फटकारलं; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी...
Uttarakhand Badrinath Massive Avalanche : उत्तराखंडमध्ये महामार्गावर हिमस्खलनात 57 मजूर अडकले; 16 मजुरांना बाहेर काढण्यात यश
उत्तराखंडमध्ये महामार्गावर हिमस्खलनात 57 मजूर अडकले; 16 मजुरांना बाहेर काढण्यात यश
Nagpur Crime News: नागपुरातील कुख्यात गुन्हेगारांसोबतच्या इन्स्टाग्राम रिल्समध्ये गजा मारणे; सायबर पोलिसांकडून दखल, गुन्हा दाखल 
नागपुरातील कुख्यात गुन्हेगारांसोबतच्या इन्स्टाग्राम रिल्समध्ये गजा मारणे; सायबर पोलिसांकडून दखल, गुन्हा दाखल
Prakash Ambedkar : योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, प्रकाश आंबेडकर संतापले; पुणे पोलिसांवरही ओढले ताशेरे
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, प्रकाश आंबेडकर संतापले; पुणे पोलिसांवरही ओढले ताशेरे
जमिनीतून पाण्याचे मोठमोठे फवारे, लोकांची झुंबड!
जमिनीतून पाण्याचे मोठमोठे फवारे, लोकांची झुंबड!
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना VVIP ट्रीटमेंट? धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया; म्हणाले, जेल प्रशासनाने आता तरी...  
संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना VVIP ट्रीटमेंट? धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया; म्हणाले, जेल प्रशासनाने आता तरी...  
उद्धव ठाकरेच गद्दारीचे जनक, त्यांचा ढोंगीपणा उघड, मंत्री आशिष शेलारांचा हल्लाबोल 
उद्धव ठाकरेच गद्दारीचे जनक, त्यांचा ढोंगीपणा उघड, मंत्री आशिष शेलारांचा हल्लाबोल 
Embed widget