एक्स्प्लोर

Digras Assembly Election 2024 : दिग्रसच्या हायव्होल्टेज लढती संजय राठोड विजयी, माणिकराव ठाकरे यांचा पुन्हा पराभव

Digras Assembly Election 2024: दिग्रस विधानसभा मतदारसंघात मंत्री संजय राठोड आणि काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे आमने सामने आले होते. संजय राठोड विजयी झाले.

Digras Assembly Election 2024 यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेचे सात मतदारसंघ आहेत. यवतमाळ, राळेगाव, वणी, अर्णी, दिग्रस,उमरखेड आणि पुसद अशी या जिल्ह्यातील मतदारसंघांची नावं आहेत. काही महिन्यांपूर्वी पाड पडलेल्या लोकसभा निवडणुकीत 7 पैकी 6 विधानसभा मतदारसंघात मविआचे उमेदवार आघाडीवर होते. यवतमाळ मधील सात विधानसभा मतदारसंघ, यवतमाळ वाशिम, चंद्रपूर आणि हिंगोली या तीन लोकसभा मतदारसंघात येतात. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला 7 पैकी 6 जागांवर विजय मिळाला होता. तर, राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर विजय मिळाला होता.  दिग्रस मतदारसंघात संजय राठोड विरुद्ध काँग्रेसचे माणिकराव ठाकरे अशी लढत झाली होती. संजय राठोड यांनी माणिकराव ठाकरे यांना पराभूत केलं. दिग्रसमध्ये संजय राठोड यांना 143115 मतं मिळाली. तर, माणिकराव ठाकरे यांना 114340 मतं मिळाली. संजय राठोड यांनी 28775 मतांनी माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला.

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कोट्यातील जागा काँग्रेससाठी सोडण्यात आली होती. कांग्रेस कडून माणिकराव ठाकरे येथून मैदानात उतरले होते. 

दिग्रस विधानसभा मतदार संघातून संजय राठोड आतापर्यंत चार वेळा विजयी झाले आहेत.राठोड यांनी 2004,2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि संजय राठोड यांच्यातील लढत चुरशीची झाली. माणिकराव ठाकरे यांच्यासारखा तगडा उमेदवार समोर असल्यानं संजय राठोड यांच्यासाठी ही लढत आव्हानात्मक होती. मात्र, संजय राठोड यांनी पाचव्यांदा विजय मिळवला. 

लोकसभा निवडणुकीत दिग्रस मतदारसंघात कुणाला आघाडी?

दिग्रस विधानसभा मतदारसंघ हा यवतमाळ लोकसभा मतदारसंघात आहे. यवतमाळ लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पहिल्यांदा भावना गवळी यांना उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र, त्यानंतर भाजपच्या दबावानंतर भावना गवळी यांची उमेदवारी रद्द करुन राजश्री हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली होती. दिग्रस विधासनभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय देशमुख आघाडीवर राहिले. देशमुख यांना 106187 मतं मिळाली. तर, राजश्री पाटील यांना 97520 मतं मिळाली.

दिग्रस विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पहिल्यांदा ठाकरेंच्या शिवसेनेला देण्यात आला होता. या ठिकाणी माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल यांचं नाव निश्चित करण्यात आलं होतं. मात्र, काँग्रेसनं ठाकरेंच्या शिवसेनेला दर्यापूरची जागा दिल्यानंतर त्या बदल्यात दिग्रसची जागा सोडण्यात आली. दिग्रसमधून माणिकराव ठाकरे लढणार आहेत.  माणिकराव ठाकरे यांनी दारव्हा विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून चार टर्म प्रतिनिधीत्व केलं आहे.

इतर बातम्या :

विधानसभेची खडाजंगी : यवतमाळमध्ये 2019 ला भाजप सेनेचं वर्चस्व, 2024 च्या लोकसभेला मविआची सरशी, विधानसभा निवडणुकीत काय होणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Embed widget