Dharavi Vidhan Sabha constituency: धारावी विधानसभा मतदारसंघात कोणाचे पारडे वरचढ, महायुती की मविआ,कोण बाजी मारणार?
Dharavi assembly constituency: धारावी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे, मतदानाचे आणि निकालाचे ताजे अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा.
मुंबई: राज्यात धारावी विधानसभा मतदारसंघ हे नेहमीच पुनर्विकास प्रकल्पामुळे चर्चेतला मतदार संघ आहे. या मतदारसंघांमध्ये सध्या पुनर्विकास आणि सुविधांचा मुद्दा फार गाजतोय . सध्या या मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) या विद्यमान आमदार होत्या. खासदार झाल्यानंतर त्यांनी या मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा दिला . धारावी (Dharavi Vidhan Sabha) हा काँग्रेसचा गड समजला जातो. 2019 निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट या मतदारसंघांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता.
मात्र, यावेळी महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला (Congress) सोडली जाणार आहे. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी दिला जाईल. गायकवाड कुटुंबीयांचा गेल्या अनेक वर्षापासून हा गड राहिला असल्यामुळे यंदा वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गायकवाड यांनी या मतदारसंघांमध्ये कंबर कसली आहे. त्यामुळे ज्योती गायकवाड यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, घराणेशाहीला धारावीकर कंटाळले अशी परिस्थिती आहेत त्यात महायुतीकडून मनोहर रायबागे, राजेश खंदारे हे शिवसेना शिंदे गटाकडून किंवा ही जागा भाजपला सुटल्यास दिव्या ढोले किंवा मनी बालन लढवतील.
तसेच 2019 विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असणारे आशिष मोरे नक्की या मतदारसंघात काय करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या मतदारसंघात महायुती विरोधात धारावी पुनर्विकासात स्पष्टता नसल्यामुळे नाराजी देखील आहे. तर पुनर्विकास होतोय त्यामुळे काही ठिकाणी आनंद आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महायुतीला मोठा फटका हा पाहायला मिळाला. एकंदरीत पाहिल तर काँग्रेसचं पारड या मतदारसंघात जड आहे. माञ धारावीकरांच्या मुद्द्यांमध्ये या निवडणुकीत घराणेशाही जिंकते की महायुती बाजी मारते, हे पुढील काळात स्पष्ट होणार आहेत.
धारावी विधानसभा मतदारसंघात कोणात लढत?
काँग्रेस विरुद्ध शिवसेना शिंदे गट किंवा भाजप
धारावी पुनर्विकास, अस्वच्छता, बेरोजगारी, आरोग्य व्यवस्था, शिक्षण या मुद्द्यांवर निवडणूक होईल
मिनी इंडियात कोणता फॅक्टर चालणार?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत वर्षा गायकवाड 53 हजार 954 मतं, तर शिवसेना ठाकरे गटाच्या आशिष मोरे यांना 42,130 मतं मिळाली होती, तर मनोज संसारे यांना 13000 मतं मिळाली होती. या निवडणुकीत कोणता फॅक्टर प्रभावी ठरेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
आणखी वाचा
मोठी बातमी: भाजप मुंबईत भाकरी फिरवणार; राम कदमांसह 'या' 5 आमदारांचा पत्ता कट होणार?