एक्स्प्लोर

Vidhan Sabha Election 2024 : मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही हे कसं शोधायचं? चेक करा एका क्लिकवर

Vidhan Sabha Elections 2024 : राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदार यादीमध्ये तुमचं नाव असणं आवश्यक आहे. पण तुमचं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही हे कसं पाहाल? जाणून घ्या

Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यभरात लवकरच विधानसभेच्या निवडणुकांचं (Vidhan Sabha Elections 2024) बिगुल वाजणार आहे. लवकरच निवडणुका पार पडणार आहेत. निवडणुकांच्या वेळी मतदार हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. मतदारांनी दिलेल्या मतांवर नेते निवडून येतात. निवडणुका जाहीर झाल्या की मतदार यादी देखील जाहीर होते आणि ही मतदार यादी दरवेळी बदलत असते. काही वेळा अचानक बऱ्याच जणांची नावं मतदार यादीतून गायब होतात आणि हे बघून त्या मतदारांचा हिरमोड होतो. त्यामुळे आताच आपण आपलं नाव मतदार यादीत आहे का? हे घरबसल्या सोप्या पद्धतीने तपासून पाहूया.

मतदार यादी 2024 मध्ये स्वत:चं नाव का तपासावं?

आता तुम्हाला वाटेल की मागच्या वेळी तर मतदार यादीत आमचं नाव होतं, मग आता पुन्हा चेक करण्याची काय गरज? तर तुमच्या माहितीसाठी - मतदार याद्या या दरवेळी अपडेट होत असतात, दरवेळी यादीत काही बदल होत असतात. काही वेळा मतदार यादीतील तुमचं नाव चुकू शकतं किंवा तुमच्या पत्त्यात काही बदल झालेला असू शकतो.

काही वेळा चुकीने तुमचं नाव वगळलं जाऊ शकतं, त्यामुळे या सर्वाची खबरदारी म्हणून तुम्ही मतदार यादीत तुमचं नाव चेक केलं पाहिजे, अन्यथा ऐन वेळी तुम्हाला मतदान करता येणार नाही. मतदार यादीतील तुमच्या तपशीलात काही दुरुस्ती असल्यास तुम्ही त्या निवडणुकाच्या 10 दिवस आधीपर्यंत बदलून घेऊ शकता.

मतदार यादीत तुमचं नाव कसं शोधाल?

1. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीत तुमचं नाव शोधू शकता. त्यासाठी सर्वप्रथम भारतीय निवडणूक आयोगाच्या या लिंकवर क्लिक करा - https://electoralsearch.eci.gov.in/

2. आता वेबसाईटच्या वरच्या बाजूला तुम्हाला 3 पर्याय दिसतील. 'Search by Details', 'Search by EPIC', 'Search by Mobile' या पैकी एका पर्यायावर क्लिक करा.

Vidhan Sabha Election 2024 : मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही हे कसं शोधायचं? चेक करा एका क्लिकवर

3. आवश्यक माहिती (Basic Information) आणि कॅप्चा कोड सबमिट करा, यानंतर 'Search' वर क्लिक करा.

4. यानंतर आता खाली मतदार यादीतील तुमचं नाव, EPIC Number आणि सर्व माहिती दिसेल.

Vidhan Sabha Election 2024 : मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही हे कसं शोधायचं? चेक करा एका क्लिकवर

5. जर सर्च केल्यानंतरही तुम्हाला तुमचं नाव दिसत नसेल तर तुम्ही भरलेले तपशील एकदा तपासून पाहावे किंवा तीनपैकी इतर दोन पर्यायाचा वापर करावा. तरीही नाव न दिसल्यास राज्य निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधा.

SMS द्वारे मतदार यादीतील नाव तपासा

एसएमएसद्वारे मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी सर्वात प्रथम मेसेज टाईप करताना स्पेस दाबा. त्यानंतर तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक टाईप करा. हा एसएमएस 9211728082 किंवा 1950 वर पाठवा. याचं उत्तर तुम्हाला एसएमएसमध्ये मिळेल. तसेच एसएमएसमध्ये भाग क्रमांक, मतदान केंद्र क्रमांक आणि नाव पाठवलं जाईल. तुमचे नाव मतदार यादीत नसल्यास, ‘नो रेकॉर्ड फाऊंड’ असा मेसेज येईल.

हेही वाचा:

Sanjay Raut : विधानसभेची घोषणा होण्याआधीच संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक मतदारसंघात 15 कोटी पोहोचले!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pimpri-Chinchwad Election 2026: अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या; पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या; पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण

व्हिडीओ

Meghana Bordikar Parbhani : परभणीत भाजपचाच महापौर होणार! मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केला विश्वास
Asaduddin Owaisi Amravati Speech: मुलं जन्माला घालण्याच्या विधानावरुन ओवैसींचा राणा,भागवतांवर निशाणा
Parbhani Akola Special Report : समस्या बेसुमार, मतदानावर बहिष्कार;परभणी अकोल्यातील नागरिकांचा निर्णय
Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad Election 2026: अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या; पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या; पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
BMC Election 2026: मुंबईत राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा होणार नाही कारण...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली भाजपची ती थिअरी
मुंबईत राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा होणार नाही कारण...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली थिअरी
Jay Dudhane First Reaction After Arrested: मी हनिमूनसाठी जात होतो आणि...; अटकेनंतर जय दुधाणे नेमकं काय म्हणाला?
मी हनिमूनसाठी जात होतो आणि...; अटकेनंतर जय दुधाणे नेमकं काय म्हणाला?
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Embed widget