तुम्ही फक्त आशिर्वाद द्या, सगळ्या योजना पूर्ण करु, पुढील 5 वर्ष शेतकऱ्यांना विजबिल माफ हा अजितदादाचा वादा
अजितदादाचा वादा आहे, पुढील 5 वर्ष विजबिल माफ आहे, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं.
Ajit Pawar : अजितदादाचा वादा आहे, पुढील 5 वर्ष विजबिल माफ आहे, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. जेवढे उमेदवार उभे केले, तिथे जातोय, भाजप शिवसेनेने काय करावे, हा त्यांचा प्रश्न आहे. निफाड विधानसभा मतदारसंघाचे (Nifad Vidhansabha Election) आमदार दिलीप बनकर यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
महायुतीच्या सरकारनं दोन अडीच वर्षे चांगले काम केलं
आपण सर्वजण समाजाच्या विकासासाठी काम करत आहोत. देशाचे पंतप्रधान सभा घेत आहेत, ते त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत, अमित शाह देखील मिटींग घेत आहेत असे अजित पवार म्हणाले. महायुतीच्या सरकारनं दोन अडीच वर्षे चांगले काम केले आहे. काही राजकिय स्थित्यंतरे घडली आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केल्यावेळी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी ठरवले होते. माझी सही होती, झिरवाळ याची सही होती, अनेक आमदारांची सही होती. पण त्यावेळी अशी काही घटना घडली की ते झाले नाही. माझे सहकारी म्हणयाचे दादा आम्ही निवडून आलो, कोरोनाचा काळ आला, त्यामुळं कामं झाली नाहीत. दिलीप काकांनी मतदारसंघात चांगले काम केले आहे.
सर्वाना बरोबर घेऊन जातोय, भेदभाव करत नाही
1 ऑक्टोबरपासून गायीच्या दुधाला 7 रुपये अनुदान दिले आहे. शेतकरीच्या खात्यावर थेट पैसे देतोय, पारदर्शकता आहे. यामध्ये गळती नसल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. साडेबारा टक्के जागा आदिवासी समाजाला दिल्या, तर मुस्लिम समाजाला 10 टक्के जागा दिल्या आहेत. आम्ही सर्वाना बरोबर घेऊन जातोय, भेदभाव करत नाही. शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेने जात असल्याचे अजित पवार म्हणाले.
केंद्र सरकार पाठिशी, त्यामुळं तुमच्या सर्व योजना पूर्ण करु
दिलीप बनकर यांना निवडून आणा, सर्व ताकदवान आपल्यासोबत आहेत असेही अजित पवार म्हणाले. राज्यात महायुती आणि आमचा उमेदवार काय करणार? हा जाहिरनामा देतोय. केंद्र सरकार पाठिशी आहे, त्यामुळं तुमच्या सर्व योजना पूर्ण करु, कामे आणू असे अजित पवार म्हणाले. नाशिक जिल्ह्यात निफाड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आमदार दिलीप बनकर यांच्या प्रचारसभेत अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारनं घेतलेल्या निर्णयांची देखील माहिती दिली. तसेच दिलीप बनकर यांना पुन्हा निवडून आणण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं.