एक्स्प्लोर

काँग्रेसचा गड असलेल्या रिसोड मतदारसंघात 2019 ला भाजप बाजी मारणार?

2019 च्या निवडणुकीचे काल्पनिक चित्र पाहिले तर सध्या सत्तेत असलेल्या भाजपच्या तिकिटावर लाढण्यासाठी बरेच उमेदवारे आपल्या गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. तर कॉंग्रेस कडून विद्यमान आमदार अमित झनक यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे.

वाशीम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मतदार संघ म्हणून राजकारणात नेहमी वजन राहीलं आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणाचे रिसोड मधून सूत्र हलविले जाते. 1962 च्या पहिल्या विधानसभा निवडणुकीमध्ये रिसोड मतदारसंघ हा गोवर्धना मतदार संघ म्हणून ओळखला जायचा. 1962 च्या निवडणुकीमध्ये गोवर्धना मतदारसंघ हा एससी जाती करता राखीव होता. मात्र 1967 मध्ये या मतदारसंघाची फेर रचना झाल्याने हा मतदारसंघ मेडशी विधानसभा मतदारसंघ या नवीन नावाने ओळखल्या गेला या मतदार संघावर कायमच कॉंग्रेस ने आपल वजन कायम ठेवत आपला ठसा उमटवला. 1998 ते 2004 आणि 2004 ते 2009 पर्यंत फक्त दोन वेळा या मतदार संघातून भाजपचे अ‍ॅड. विजय जाधव विजयी झाले. या मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकाविता आला. हे दहा वर्ष वगळता या मतदारसंघावर सुरवातीपासूनच झनक घराण्याचं कायम वर्चस्व असल्याने रामाराव झनक, सुभाष झनक आणि विद्यमान आमदार अमित झनक या तीन पिढ्यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. 2009 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील विधानसभा मतदार संघांच्या फेररचना करण्यात आल्या. त्यामध्ये मेडशी मतदार संघाचे रुपांतर रिसोड मतदार संघामध्ये करण्यात आले. सलग दोन वेळा भाजपकडे असलेला हा मतदार संघ भाजपच्या ताब्यातून कॉंग्रेसने पुन्हा आपल्याकडे खेचून आणला. रिसोड हा विधानसभा मतदार संघ म्हणजे खासदाराचं जन्मस्थान. कॉंग्रेसचे अनंतराव देशमुख, शिवसेनेचे स्व : पुंडलिकराव गवळी आणि त्यांच्या कन्या आणि यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे सलग 5 वेळा नेतृत्व करणाऱ्या विद्यमान खासदार भावना गवळी या खासदारांच जन्मस्थानही रिसोड विधानसभा मतदार संघ आहे. जिल्ह्यातील राजकारणात कॉंग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख आणि झनक परिवार हे तसे दोन्ही परिवार कॉंग्रेसचे कट्टर मात्र या दोन्ही परिवाराचे साप-मुंगसाचे वैर जगजाहीर आहे. हे वैर 2009 च्या निवडणुकीत मतदारांना पाहायला मिळाले. या निवडणुकीत कॉंग्रेसशी बंडखोरी करत अनंतराव देशमुख यांनी कॉंग्रेस ला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. तर 2014 च्या निवडणुकीत सुद्धा कॉंग्रेसच्या देशमुख घराण्याने भाजपच्या उमेदवाराचा उघड प्रचार करून कॉंग्रेसला पुन्हा सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त्यातही अपयशच आले. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत कोणाला किती मतं? सुभाष झनक (काँग्रेस) : 51 हजार 234 अनंतराव देशमुख (अपक्ष) : 48 हजार 194 विजयानंतर अशोकराव चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात सुभाष झनक यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळालं ते महिला बालकल्याणच्या रूपाने मात्र आदर्श घोटाळयामध्ये अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं तेव्हा सुभाष झनक यांना मंत्रीपदावरून कमी करण्यात आले. 2013 मध्ये सुभाष झनक यांचे ह्र्दयविकाराच्या झटक्याने अकाली निधन झाले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीसोबत या मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली. यावेळी देशभरात मोदी लाट वाहत असताना सुद्धा कॉंग्रेसचे अमित झनक यांनी विजय मिळवला. 2014 च्या विधानसभा पोटनिवडणुकीतील मतदानाची आकडेवारी अमित झनक(काँग्रेस) : 70 हजार 939 विजयराव जाधव : 52 हजार 231 स्व. सुभाषराव झनक यांची बळीराजासोबत जुळलेली नाळ या पोट निवडणुकीत अमित झानकांच्या विजयाचे कारण ठरले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार अमित झनक यांची लोकप्रियता नसताना युती न झाल्यामुळे भाजप शिवसेना या दोन पक्षामधील मतविभाजनामुळे विजयाची माळ अमित झनक यांच्या गळ्यात पडून कॉंग्रेसने हा गड कायम ठेवला. कायम सत्तेत असलेल्या कॉंग्रेस पक्षाचा हा गड विकासात्मकदृष्ट्या अजूनही मागासलेलाच आहे. 2019 च्या निवडणुकीचे काल्पनिक चित्र पाहिले तर सध्या सत्तेत असलेल्या भाजपच्या तिकिटावर लाढण्यासाठी बरेच उमेदवारे आपल्या गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. तर कॉंग्रेस कडून विद्यमान आमदार अमित झनक यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे. कॉंग्रेसचे माजी खासदार यांनी निवणूक न लढविण्याचा निर्णय घेऊन त्यांचे चिरंजीव नकुल देशमुख यांचा चेहरा समोर करत आहेत. मात्र नकुल देशमुख यांना मतदारांनी कायम नापसंती दर्शविली आहे. कारण त्यांना साध्या नगर परिषद निवडणुकीत सुद्धा पराभव स्वीकारावा लागला आहे. शिवसंग्रामचे विनायक मेटे हे सुद्धा या मतदार संघावर आपल्या जागेचा दावा करत आहेत. मात्र या मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वामन सानप आणि प्रशांत गोळे हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. वंचितला मिळणारे मतदान इथे निर्णायक ठरणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget