Madhurimaraje and Malojiraje Chhatrapati : राजेश लाटकरांसाठी मालोजीराजे आणि मधुरिमाराजे मैदानात, उत्तर कोल्हापुरात प्रचारासाठी ताकद लावली
Madhurimaraje and Malojiraje Chhatrapati : मालोजीराजे आणि मधुरिमाराजे हे राजेश लाटकर यांच्या प्रचारासाठी सक्रिय झाले आहेत.
Madhurimaraje and Malojiraje Chhatrapati, कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार मधुरिमाराजे यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने मोठा वाद झाला होता. दरम्यान, राजेश लाटकर या कार्यकर्त्यावर अन्याय व्हायला नको म्हणून आम्ही माघार घेतल्याचे खासदार शाहू महाराज यांनी स्पष्ट केलं होते. आता उत्तर कोल्हापुरात राजेश लाटकर हेच महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. दरम्यान, मोठ्या वादानंतरही मालोजीराजे आणि मधुरिमाराजे महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. त्यांच्या नवीन राजवाड्यावर माजी सतेज पाटील यांच्या उपस्थितीत पार बैठक पडली. यावेळी मालोजीराजे आणि मधुरिमाराजे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
मालोजीराजे म्हणाले, खासदार छत्रपती शाहू महाराज यांना पहिल्यापासून सामान्य घरातल्या कार्यकर्त्याला संधी मिळाली, असं वाटतं होतं. मात्र कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना असल्याने आम्ही काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरला होता. अनेक घडामोडीनंतर उमेदवारी अर्ज मागे घेऊन सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहून राजेश लाटकर यांना आमदार करण्याची भावना श्रीमंत खासदार शाहू महाराज यांनी व्यक्त केली होती.
हाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजय करण्यासाठी आज पासून सक्रिय
छत्रपती शाहू महाराज यांच्या आदेशानुसार माजी आमदार छत्रपती मालोजीराजे गट व काँग्रेसचे कार्यकर्ते जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजय करण्यासाठी आज पासून सक्रिय होतील. तसेच कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट,शिवसेना उद्धव ठाकरे गट पुरस्कृत राजेश लाटकर यांना निवडून आणण्यासाठी माजी आमदार छत्रपती मालोजीराजे आणि मधुरिमा राजे छत्रपती यांच्यासह सर्व कार्यकर्ते आज पासून ताकतीने प्रचारात उतरतील असा विश्वास माजी आमदार छत्रपती मालोजीराजे यांनी व्यक्त केला.
मधुरिमाराजे आणि मालोजीराजे यांनी लाटकर यांच्यासाठी योग्य निर्णय घेतला
कोल्हापूर जिल्ह्याने नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्याला आधार दिलाय. राजर्षी शाहू महाराज यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिली होती. राजू लाटकर यांच्या प्रचारात मी उतरलो आहे, गरज असेल त्याठिकाणी कार्यक्रम घेणार उमेदवारी मागे घेऊन कार्यकर्त्याला न्याय देण्याचा निर्णय घेतला. राजू लाटकर यांच्या मागे महाविकास आघाडी ताकदीने उभा राहील. मधुरिमाराजे आणि मालोजीराजे यांनी लाटकर यांच्यासाठी योग्य निर्णय घेतला. उमेदवाराला राजाश्रय मिळण्यापेक्षा लोकाश्रय मिळणे महत्वाचे आहे राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येईल असा विश्वास आहे, असं शाहू महाराज म्हणाले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या