एक्स्प्लोर

नारायण राणे म्हणजे थापेबाजी आणि पोपटपंची करणारा माणूस, पहिल्यांदाच मिळाला कर्तव्यशून्य खासदार, विनायक राऊतांचा प्रहार

नारायण राणे (Narayan Rane) म्हणजे थापेबाजी आणि पोपटपंची करणारा माणूस असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे  माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केली.

Vinayak Raut on Narayan Rane : नारायण राणे (Narayan Rane) म्हणजे थापेबाजी आणि पोपटपंची करणारा माणूस असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे  माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केली. निवडणुकीत बेसुमार पैशाचा वापर आणि निवडून आल्यानंतर लोकांना लुबाडणे या पलीकडे नारायण राणे यांचे दुसरं कर्तव्य नाही असंही ते म्हणाले. नारायण राणे खासदार असताना त्यांच्या कारकिर्दीत चिपी विमानतळावरील मुंबई सिंधुदुर्ग ही विमानसेवा बंद पडली. मात्र राणेंना त्याचा सांग पत्ता लागलेला नाही असेही राऊत म्हणाले.

नारायण राणेंसारखा कर्तव्य शून्य खासदार पहिल्यांदाच मिळाला

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्थापनेनंतर नारायण राणेंसारखा कर्तव्य शून्य खासदार पहिल्यांदाच मिळाला, हे सिंधुदुर्गच दुर्दैव असल्याचे विनायक राऊत म्हणाले. नारायण राणे हे पैशांचा बेसुमार वापर करणारा व्यक्ती असल्याचे विनायक राऊत म्हणाले. आम्ही अथक प्रयत्नातून चीपी विमानतळ सुरु केले होते. मात्र, नारायण राणेंच्या काळात ते विमानतळ बंद पडल्याची टीका विनायक राऊत यांनी केली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील प्रचाराला वेग आला आहे. नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र या विधानसभा निवडणुकीत उभे आहेत. आमदार नितेश राणे हे कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात चंदक्रात आबाजी जाधव (बहुजन समाज पार्टी), संदेश भास्कर पारकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे निवडणूक लढवत आहेत. तर नारायण राणेंचे दुसरे पुत्र निलेश राणे हे देखील निवडणूक लढवत आहेत. ते कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात रवींद्र हरिश्चंद्र कसालकर (बहुजन समाज पार्टी), विरुद्ध वैभव विजय नाईक (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), अनंतराज नंदकिशोर पाटकर (महाराष्ट्र स्वराज्य पार्टी) हे निवडणूक लढवत आहेत. तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून दिपक वसंतराव केसरकर (शिवसेना), विरुद्ध राजन कृष्णा तेली (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), विरुद्ध अर्चना संदीप घारे (अपक्ष), विरुद्ध विशाल प्रभाकर परब (अपक्ष) निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, काही दिवसापूर्वीच राणेंचे समर्थक राजन तेली यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. 

महत्वाच्या बातम्या:

Rajan Teli: नारायण राणेंसोबत जाणं सर्वात मोठी चूक, आता केसरकरांच्या पराभवासाठी ठाकरेंच्या शिवसेनेत परततोय, राजन तेलींची गर्जना!

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget