राज्यात आणखी एका काका-पुतण्याचा संघर्ष, माढ्यातून महादेव जानकरांविरोधात पुतण्या लढवणार निवडणूक
महाराष्ट्रात आणखी एका काका पुतण्याचा संघर्ष पाहायला मिळत आहे. महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या विरोधात माढा लोकसभा मतदारसंघातून त्यांचा पुतण्या निवडणूक लढवणार आहे.
![राज्यात आणखी एका काका-पुतण्याचा संघर्ष, माढ्यातून महादेव जानकरांविरोधात पुतण्या लढवणार निवडणूक Madha Loksabha Election News His nephew will contest against Mahadev Jankar from Madha Lok Sabha constituency राज्यात आणखी एका काका-पुतण्याचा संघर्ष, माढ्यातून महादेव जानकरांविरोधात पुतण्या लढवणार निवडणूक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/16/6dc9c0b06f6e0604850426a8398a8ef91710569204022339_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Madha Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. अनेठ ठिकाणी राजकीय नेत्यांनी दावेदारी केलीय. महाराष्ट्रात आणखी एका काका पुतण्याचा संघर्ष पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) हे माढा लोकसभा मतदारसंघातून (Madha Loksabha) निवडणूक लढवणार आहेत. पण अशातच महादेव जानकर यांचे पुतणे स्वरुप जानकर (Swaroop Jankar) यांनी देखील माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलंय. महादेव जानकर जर माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असतील तर त्यांच्या विरोधात मी निवडणूक लढवणार असल्याचं स्वरुप जानकर यांनी सांगितलंय.
नेमकं काय म्हणाले स्वरुप जानकर?
जर महादेव जानकर माढा लोकसभा मतदारसंघातून उभे राहणार असतील तर त्यांच्या विरोधात मी निवडणूक लढवणार असल्याचे स्वरुप जानकर यांनी सांगितले. महादेव जानकर हे जाणीवपूर्वक सातत्याने माझा पुतण्या राजकारणात येणार नाही, अशा पद्धतीने माध्यमांशी बोलत आहेत. मुळात मी त्यांचा पुतण्या आहे, याची कधीही कुठेही वाच्यता केलेली नाही. मी त्यांच्या मंत्रालयातील कार्यालयात देखील कधीही गेलेलो नाही. मी बाहेर परिसरात असणाऱ्या त्यांच्या बंगल्यावर कधीही पाऊल ठेवलेलं नाही. तरी देखील वारंवार जाणीवपूर्वक ते माझा उल्लेख करत आहेत. महादेव जानकर यांचा संघर्ष आम्हाला माहिती आहे. यामुळेच आम्ही त्यांना मदत करत आलो आहोत. मात्र जाणीवपूर्वक ते जर माझा उल्लेख करत असतील तर मला माढा लोकसभा मतदारसंघात आपली उमेदवारी जाहीर करावी लागेल असे स्वरुप जानकर म्हणाले. महादेव जानकर यांनी उत्तर प्रदेशातल्या मिर्जापुर इथून निवडणूक लढावावी किंवा परभणी येथून लढावं, मात्र त्यांनी माढ्यातून लढू नये असे स्वरुप जानकर म्हणाले.
७
माढा लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना (Ranjitsinh Nimbalkar) उमेदवारी दिलीय. या मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील (Dharishhil Mohite Patil) इच्छूक होते. मात्र, भाजपनं त्यांना डावलले आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. मोहिते पाटील यांनी शरद पवार गटाकडून तुतारी या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवावी अशी भावना कार्यकर्तेय व्यक्त करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे महादेव जानकर यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली आहे. ते देखील माढ्यातून निवडणूक लढवणार आहेत. मात्र, पवार त्यांना साथ देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
इतिहासाची पुनरावृत्ती होणार? माढ्यात 'कमळानं' डावललं, मोहिते पाटील हाती 'तुतारी' घेणार का?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)