एक्स्प्लोर

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, पुन्हा राम मंदिर निर्मितीचं आश्वासन

जाहीरनाम्याचा तसेच निवडणूक प्रचाराचा केंद्रबिंदू हा मध्यमवर्गीय असेल असं केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींनी जाहीर केलं आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकासाठीचा आपला जाहीरनामा भाजपने प्रसिद्ध केला आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्याला 'संकल्पपत्र' म्हटलं आहे. संकल्पपत्रातील महत्त्वाची बाब म्हणजे राम मंदिर निर्मितीचं पुन्हा एकदा भाजपने आश्वासन दिलं आहे.

लोकसभा निवडणुकासाठीचा आपला जाहीरनामा भाजपने प्रसिद्ध केला आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्याला संकल्पपत्र म्हटलं आहे. संकल्पपत्रातील महत्त्वाची बाब म्हणजे राम मंदिर निर्मितीचं पुन्हा एकदा भाजपने आश्वासन दिलं आहे. भाजपच संकल्पपत्र 2024 साठी आहे. पण स्वातंत्र्याला 75 वर्षपूर्ती निमित्त 2002 पर्यंत ही आश्वासनं पूर्ण करण्याचा निर्धार आम्ही केला आहे, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

देशाला प्रगतीपथावर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. 'वन मिशन, वन डायरेक्शन' आम्ही पुढे जाणार आहोत. देशात अनेक भागात पाण्याची समस्या गंभीर आहे. याबाबत ठोस पाऊल उचलण्याच गरज आहे. यासाठी जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करणार असल्याचं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते.

VIDEO | संकल्पपत्रातून नवा भारत साकारण्याचा प्रयत्न, राजनाथ सिंह यांचं भाषण | नवी दिल्ली | एबीपी माझा

पाच वर्षात भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली : अमित शाह

भाजपच्या संकल्पपत्रात सरकारच्या मागील पाच वर्षातील यशस्वी कामगिरीची माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. परदेशात भारताच्या कार्याच्या डंका वाजला, राष्ट्रीय सुरक्षा भक्कम झाली, अशी माहिती भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी दिली.

2014 मध्ये आम्ही पुढील 5 वर्षांच व्हिजन ठेवलं होतं. ज्यावर देशातील जनतेने विश्वास ठेवला आणि आम्हाला निवडून दिलं. संपूर्ण बहुमत असतानाही आम्ही एनडीएचं सरकार स्थापन केलं आणि देशात अनेक विकासकामे केली. या पाच वर्षाच सरकारने अनेक ऐतिहासिक कामे केली. ही पाच वर्ष भविष्यात विकासासाठी ओळखली जातील.

एनडीए सरकारचा 2014 ते 2019 चा कार्यकाळ भविष्यात सुवर्ण अक्षरांत लिहिली जाईल. भाजप सरकारने देशातील अस्थिर वातावरण संपवलं. आज देश महाशक्ती म्हणून समोर येत आहे. 2014 साली भारताची अर्थव्यवस्था 11 व्या क्रमांकावर होती, जी आज सहाव्या क्रमाकांवर आहे.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत वीज पोहोचवण्याच प्रयत्न भाजप सरकारने केला. 7 कोटी गरीबांच्या घरात गॅस कनेक्शन पोहचलं आहे. तर 8 कोटींहून अधिक शौचालयांची निर्मिती या पाच वर्षात झाली आहे, अशी माहिती अमित शाहांनी दिली.

भाजपच्या संकल्पपत्रातील महत्त्वाचे मुद्दे

  • संकल्पपत्रात राम मंदिराच्या निर्मितीचा पुररुच्चार
  • 75 वैद्यकीय महाविद्यालय, विद्यापीठ स्थापन करणार
  • व्यवस्थापन, अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील जागा वाढवणार
  • 2022 पर्यंत देशातील सर्व रेल्वे लाईनचं विद्युतीकरण करणार
  • छोट्या दुकानदारांना पेन्शची योजना
  • दहशतवाद मिटवण्यासाठी कठोर भूमिका घेतली जाईल
  • सुक्ष्म, लघु आणि मध्यमांसाठी 1 लाख कोटींच्या क्रेडिट गॅरंटीची योजना
  • कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी 25 लाख कोटी रुपये गुंतवणूक करणार
  • शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
  • शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देणार, तसेच 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना पेंशनची सुविधा देणार
  • 1 लाखांपर्यंतच्या कृषी कर्जावर 5 वर्षांपर्यंत व्याज नाही
  • तीन तलाकविरोधात कायदा आणून मुस्लिम महिलांना न्याय देणार
  • सिटीजनशिप विधेयक लागू करणार
  • प्रत्येक घरात वीज, शौचालय पोहोचवण्यातं लक्ष्य
  • 50 शहरांमध्ये मेट्रोचं नेटवर्क मजबूत करणार
  • पायाभूत सुविधांसाठी 100 लाख कोटी रुपये गुंतवणूक करणार
  • सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी 1 लाख कोटी रुपये
  • पाच किमी अंतरात बँकिंग सुविधा पुरवण्याचं उद्दिष्ट
VIDEO | संकल्पपत्रातून नवा भारत साकारण्याचा प्रयत्न, राजनाथ सिंह यांचं भाषण | नवी दिल्ली | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : माहीमचा गोंधळ ते मुख्यमंत्रीपद..एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखत!TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Amit Thackeray: राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?
शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?
×
Embed widget