एक्स्प्लोर

महाराष्ट्रात पावणे नऊ कोटी मतदार, सर्वात जास्त मतदार ठाण्यात तर रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये सर्वाधिक महिला मतदार

राज्यात 11, 18, 23 आणि 29 एप्रिल या चार टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा तयारीला लागली आहे. सुमारे सहा लाख कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने ही प्रक्रिया पार पाडली जात आहे.

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदार संघ ठाणे जिल्हा ठरणार आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात राज्याच्या तुलनेत महिला मतदारांची सर्वाधिक आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात पुरूषांपेक्षा महिला मतदार सर्वाधिक असून 14 लाख 40 हजार एकूण मतदारांमध्ये सात लाख 35 हजार 597 एवढ्या महिला मतदारांची संख्या आहे. ठाणे मतदार संघात राज्यात सर्वाधिक सुमारे 23 लाखांहून अधिक मतदारांची संख्या असून 12 लाख 60 हजारांहून अधिक पुरूष मतदारांची संख्या आहे. राज्यात  11, 18, 23 आणि 29 एप्रिल या चार टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा तयारीला लागली आहे. सुमारे सहा लाख कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने ही प्रक्रिया पार पाडली जात आहे. राज्यात चार कोटी 57 लाखांहून अधिक पुरूष मतदार असून चार कोटी सोळा लाखाहून अधिक महिला मतदार आहेत. नऊ मतदारसंघ राखीव नंदूरबार, गडचिरोली-चिमूर, दिंडोरी, पालघर हे चार मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव असून अमरावती, रामटेक, शिर्डी, लातूर आणि सोलापूर हे पाच मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. नागपूर, शिरूर,पुणे, बारामतीत 20 लाखांहून अधिक मतदार मावळ मतदारसंघात सुमारे 22 लाखांहून अधिक, शिरूर 21 लाखांहून अधिक, नागपूर 21 लाखांहून अधिक, पुणे आणि बारामती प्रत्येकी 20 लाखांहून अधिक मतदार आहेत. मुंबईतील मुंबई-उत्तर मतदारसंघात 16 लाखांहून अधिक मतदार असून मुंबई-उत्तर दक्षिण मतदारसंघात 16 लाख 98 हजार मतदार आहेत. तर मुंबई-उत्तर पूर्व मतदारसंघात 15 लाख 58 हजार मतदार आहेत. मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात 16 लाख 48 हजार आणि मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघात 14 लाख 15 हजार एवढे मतदार आहेत. मतदारसंघनिहाय एकूण मतदारांची संख्या (सुमारे) : नंदूरबार-18 लाख 50 हजार धुळे-18 लाख 74 हजार जळगाव-19 लाख 10 हजार रावेर-17 लाख 60 हजार बुलढाणा-17 लाख 46 हजार अकोला-18 लाख 54 हजार अमरावती-18 लाख 12 हजार वर्धा-17 लाख 23 हजार रामटेक-18 लाख 97 हजार भंडारा-गोंदिया-17 लाख 91 हजार गडचिरोली-चिमूर-15 लाख 68 हजार चंद्रपूर-18 लाख 90 हजार यवतमाळ-वाशिम-18 लाख 90 हजार हिंगोली-17 लाख 16 हजार नांदेड-17 लाख परभणी-19 लाख 70 हजार जालना-18 लाख 43 हजार औरंगाबाद-18 लाख 57 हजार दिंडोरी-17 लाख नाशिक-18 लाख 51 हजार पालघर-18 लाख 13 हजार भिवंडी-18 लाख 58 हजार कल्याण-19 लाख 27 हजार रायगड-16 लाख 37 हजार अहमदनगर-18 लाख 31 हजार शिर्डी-15 लाख 61 हजार बीड-20 लाख 28 हजार उस्मानाबाद-18 लाख 71 हजार लातूर-18 लाख 60 हजार सोलापूर-18 लाख 20 हजार माढा-18 लाख 86 हजार सांगली-17 लाख 92 हजार सातारा-18 लाख 23 हजार रत्नागिरी-सिंधुदुर्ग-14 लाख 40 हजार कोल्हापूर-18 लाख 68 हजार हातकणंगले-17 लाख 65 हजार

महत्त्वाच्या बातम्या

IND W vs AUS W : चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
Tukaram Mundhe: आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
Ketan Agrawal Death Case : सिया गोयलनं फूड कोर्टवरच केतनचा पासपोर्ट काढून घेतला,पुणे- मुंबई प्रवासात काय घडलं? साक्षीदारानं कॅमेऱ्यासमोर येत सगळं सांगितलं  
सिया गोयल आणखी गोत्यात,  तिनेच केतन अग्रवालचा पासपोर्ट फूड कोर्टवर काढून घेतला, साक्षीदार थेट कॅमेऱ्यासमोर
France Plane Crash : फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांनी जागेवरच जीव सोडला
फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांचा जागीच अंत

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? | ABP Majha Special Report
Baramati Ujni Flemingo | फ्लेमिंगो रुसले, पर्यटक आटले | ABP Majha Special Report
Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली
Rajabhau Waje Majha Katta : निष्ठेचा नवा झेंडा रोवणारा खासदार, राजाभाऊ वाजे 'माझा कट्टा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND W vs AUS W : चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
Tukaram Mundhe: आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
Ketan Agrawal Death Case : सिया गोयलनं फूड कोर्टवरच केतनचा पासपोर्ट काढून घेतला,पुणे- मुंबई प्रवासात काय घडलं? साक्षीदारानं कॅमेऱ्यासमोर येत सगळं सांगितलं  
सिया गोयल आणखी गोत्यात,  तिनेच केतन अग्रवालचा पासपोर्ट फूड कोर्टवर काढून घेतला, साक्षीदार थेट कॅमेऱ्यासमोर
France Plane Crash : फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांनी जागेवरच जीव सोडला
फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांचा जागीच अंत
धक्कादायक! तुरुंगातील लाचखोर अधिकाऱ्याच्या बंद घरातून मध्यरात्री दोघांना अटक; पुरावे नष्ट करण्यासाठी पाठवल्याचा संशय
धक्कादायक! तुरुंगातील लाचखोर अधिकाऱ्याच्या बंद घरातून मध्यरात्री दोघांना अटक; पुरावे नष्ट करण्यासाठी पाठवल्याचा संशय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात कवड्याची माळ, हाती भवानी तलवार; धाराशिवमधून ठाकरेंचा ओमराजेंना म्हणाले, हा 'गद्दार'
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात कवड्याची माळ, हाती भवानी तलवार; धाराशिवमधून ठाकरेंचा ओमराजेंना म्हणाले, हा 'गद्दार'
Rain Update: मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
Embed widget