एक्स्प्लोर
Advertisement
अहमदनगरमधील राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? 'ही' दोन नावं चर्चेत!
सुजय विखे पाटील भाजपच्या तिकीटावर अहमदनगरची जागा लढणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे त्यांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी आता कंबर कसली आहे.
मुंबई : अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेसला सोडण्यास नकार दिल्यानंतर आता तिथला राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असेल याबाबत उत्सुकता लागली आहे. यासंदर्भात आज संध्याकाळी मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे.
अहमदनगरच्या जागेसाठी अरुणकाका जगताप आणि प्रशांत गडाख यांची नावं चर्चेत आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत या दोघांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाईल. सध्या भाजपचे दिलीप गांधी हे अहमदनगरचे खासदार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचा तो खटला आठवत असेल, शरद पवारांकडून 50 वर्ष जुन्या पवार-विखे संघर्षाची आठवण
विखेंचे प्रयत्न, पवारांचा नकार
अहमदनगरची जागा मुलाला मिळावी यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार प्रयत्न केले होते. राष्ट्रवादीने सुजयसाठी जागा सोडावी यासाठी विखे पाटील यांनी शरद पवारांकडे विनंती केली होती. परंतु "या ठिकाणी राष्ट्रवादीचाच उमेदवार उभा राहिल आणि निवडून येईल यात वादच नाही," असं म्हणत शरद पवारांनी ही जागा सोडण्यास नकार दिला होता.
सुजय विखे पाटील भाजपमध्ये
यानंतर नाराज झालेल्या सुजय विखे पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करत काल (12 मार्च) भाजपमध्ये प्रवेश केला. सुजय विखे पाटील भाजपच्या तिकीटावर अहमदनगरची जागा लढणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे त्यांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी आता कंबर कसली आहे.
दुसऱ्याच्या मुलाचा हट्ट मी का पुरवू? : शरद पवार
कोण आहेत अरुण जगताप?
अरुण जगताप सध्या विधानपरिषदेचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत.
जगताप हे राष्ट्रवादीचे निष्ठावंत घराणं असून त्यांचा नगरमध्ये दबदबा आहे.
अरुण जगताप हे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे व्याही आहेत.
तर त्यांचे पुत्र संग्राम जगताप विधानसभेचे राष्ट्रवादी आमदार आहेत.
कोण आहेत प्रशांत गडाख?
प्रशांत गडाख हे माजी खासदार आणि लेखक यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव आहेत.
गडाख कुटुंब हे शरद पवारांच्या अतिशय जवळचं आहे.
यशवंतराव गडाख यांनी बाळासाहेब विखे पाटील यांचा पराभव केला होता.
त्यामुळे प्रशांत गडाख यांना उमेदवारी मिळाली तर पुन्हा एकदा विखे विरुद्ध गडाख यांची पुनरावृत्ती पाहायला मिळेल.
संबंधित बातम्या
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा?
माझ्या घरातल्या मुलांचा हट्ट मी पुरवेन, दुसऱ्याच्या मुलाचा हट्ट मी का पुरवू, त्यांना काय वाटेल? : शरद पवार
काँग्रेसला धक्का, सुजय विखे पाटील यांचा भाजपात प्रवेश
अंतर्मनाचा आवाज ऐकून पुढची भूमिका ठरवावी लागेल, विखे पाटलांचा गर्भित इशारा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement