एक्स्प्लोर
Advertisement
गडचिरोलीतील ‘त्या’ चार मतदान केंद्रांवर उद्या मतदान, सुरक्षेचा चोख बंदोबस्त
नक्षलवादी संबंधित घडामोडी सुरु असल्याने पोहचू शकले नव्हते त्यामुळे चार केंद्रांवरील मतदान पुढे ढकलण्यात आलं होतं. नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीच मतदानापूर्वीच नक्षलवाद्यांचा हैदोस पाहायला मिळाला होता. न
गडचिरोली : गडचिरोलीमध्ये 4 मतदान केंद्रांवर निवडणूक कर्मचारी नक्षलवादी संबंधित घडामोडी सुरु असल्याने पोहचू शकले नव्हते, त्यामुळे तिथे 11 एप्रिल रोजी मतदान हाऊ शकले नव्हते. या मतदान केंद्रांवर उद्या मतदान आता उद्या, 15 एप्रिल रोजी हे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे .
गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात 110 वाटेली, 112 गारडेवाडा, 113 गारडेवाडा (पुस्कोटी) 114 गारडेवाडा (वांगेतुरी) येथे 15 एप्रिल रोजी सकाळी 7.00 ते 3.00 या वेळेत मतदान प्रक्रिया घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
110 वाटेलीमध्ये रूम नं 1 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गट्टा, 112 गारडेवाडा,-रूम नं 2 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गट्टा, 113 गारडेवाडा (पुस्कोटी) रूम नं 3 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गट्टा तर 114 गारडेवाडा (वांगेतुरी) रुम नं 4 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गट्टा येथे मतदान होणार आहे.
गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात 11 एप्रिल रोजी सायंकाळी 8.00 वाजतापर्यंत मतदान पथकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार अंतिम 72.02 टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेतर्फे देण्यात आली आहे.
नक्षलवादी संबंधित घडामोडी सुरु असल्याने पोहचू शकले नव्हते त्यामुळे चार केंद्रांवरील मतदान पुढे ढकलण्यात आलं होतं. नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीच मतदानापूर्वीच नक्षलवाद्यांचा हैदोस पाहायला मिळाला होता. नक्षलवाद्यांनी मतदानाच्या आदल्या भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. मतदानाच्या दिवशीही पोलिसांसोबत चकमक, सी 60 कमांडो पथकावर हल्ला अशा त्यांच्या कुरापती सुरुच होत्या. स्फोटानंतर सुरु असलेले ऑपरेशन आणि सततच्या गोळीबारामुळे निवडणूक अधिकारी संबंधित चार केंद्रांवर वेळेत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे इथलं मतदान पुढे ढकलण्यात आलं होतं
VIDEO | मतदान संपताच नक्षलवाद्यांचा जवानांवर हल्ला, तीन कमांडो जखमी | गडचिरोली | एबीपी माझा
संबंधित बातम्या :
विदर्भातील मतदारसंघनिहाय आढावा
राज्यात 3 लाखांहून अधिक दिव्यांग मतदार, दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा
माओवाद्यांच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याच्या इशाऱ्यानंतर गडचिरोली-चिमुर मतदार संघात अतिरिक्त पोलीस बल तैनात
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात जिथे मतदान होणार आहे, त्या सात जागांवर 2014 सालची आकडेवारी कशी होती?
'या' कारणामुळे मतदानाची वेळ दीड तासाने वाढवली
पहिल्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावणार, विदर्भातील सात मतदारसंघांमध्ये मतदान
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सांगली
Advertisement