एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाजपचे अब्जाधीश उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर 89 कोटींचं कर्ज
रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सातारा जिल्ह्यातील निंभोरेचे रहिवासी आहेत. त्यांनी सोमवारी (1 एप्रिल) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीचं विवरण दिलं.
पंढरपूर : माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर कुटुंबाच्या नावावर तब्बल 120 कोटी 32 लाखांची मालमत्ता आहे. मात्र, त्याच अब्जाधीश रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर वेगवेगळ्या कारणांसाठी बँकांकडून घेतलेलं 89 कोटींचं कर्जही आहे. तसंच आयकर विभागाची तब्बल 56 लाख 78 हजाराची थकबाकी देखील आहे.
रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सातारा जिल्ह्यातील निंभोरेचे रहिवासी आहेत. त्यांनी सोमवारी (1 एप्रिल) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीचं विवरण दिलं. 2014 मध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं उत्पन्न 61 लाख 53 हजार होतं, तर 2019 त्यांची संपत्ती 3 कोटी 64 लाखांवर पोहोचलं. म्हणजेच त्यांच्या संपत्तीत सुमारे तीन कोटी वाढ झाली आहे.
VIDEO | माढ्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपचे उमेदवार | एबीपी माझा
लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रातील सध्याचं पक्षीय बलाबल आणि खासदारांची संपूर्ण यादी
शेतजमीन, राहतं घर, व्यायसायिक इमारती, कारखाने अशी एकूण 64 कोटी 60 लाखांची स्थावर मालमत्त आहे. तर पत्नीच्या नावावर 10 कोटी 12 लाख, मुलगा ताराराजेंच्या नावे 3 कोटी 26 लाख आणि इंद्रराजेंच्या नावे 3 कोटी 24 लाख रुपयांची संपत्ती आहे.
याशिवाय निंबाळकरांच्या संपत्तीत मर्सिडीज बेंज, फॉर्च्युनर कारसह दहा वाहनांचा समावेश आहे. निंबाळकर यांच्याकडे एक किलोहून अधिक सोन्याचे दागिने आहेत.
VIDEO | राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा | बातम्या सुपरफास्ट | एबीपी माझा
संबंधित बातम्या
माढ्यातील भाजपचा उमेदवार ठरला, उमेदवारांची बारावी यादी जाहीर
माढ्यात भाजपकडून विजयसिंह मोहिते पाटील यांची घोषणा होणार?
विजयसिंह मोहिते-पाटलांच्या आशीर्वादने रणजितसिंह भाजपमध्ये, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
माढ्यातून भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर फायनल, संजय शिंदेंशी मुकाबला होणार
काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपच्या संपर्कात
विजयसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादी सोडणार नाही, सुनील तटकरेंचा विश्वास
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement