एक्स्प्लोर

Loksabha Election 2019 : गडचिरोलीतील चार केंद्रांवरील मतदान पुढे ढकललं

पहिल्या टप्प्यात विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशिम, रामटेक, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या सात मतदारसंघांचा समावेश आहे.

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर मतदारसंघातील चार केंद्रांवरील मतदान पुढे ढकलण्यात आलं आहे. कोणत्या केंद्रावर मतदान होऊ शकलं नाही आणि ते कधी करणार हे लवकरच सांगण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज संपन्न झालं. महाराष्ट्रात विदर्भातल्या सात मतदारसंघांसह देशभरातील 91 जागांसाठी आज झालं. पहिल्या टप्प्यात विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशिम, रामटेक, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या सात मतदारसंघांचा समावेश आहे. सकाळी सातपासून सुरु झालेलं मतदान संध्याकाळी सात वाजता संपलं. यंदा मतदानाची वेळ दीड तासांनी वाढवली होती. Loksabha Election 2019 : पहिल्या टप्प्यातलं मतदान संपलं, विदर्भातील मतदानाचा सखोल आढावा मात्र नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीच मतदानापूर्वीच नक्षलवाद्यांचा हैदोस पाहायला मिळाला. नक्षलवाद्यांनी काल भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. आज मतदानाच्या दिवशीही पोलिसांसोबत चकमक, सी60 कमांडो पथकावर हल्ला अशा त्यांच्या कुरापती सुरुच होत्या. कालच्या स्फोटानंतर सुरु असलेले ऑपरेशन आणि सततच्या गोळीबारामुळे निवडणूक अधिकारी संबंधित चार केंद्रांवर वेळेत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे इथलं मतदान पुढे ढकलण्यात आलं आहे. VIDEO | मतदान संपताच नक्षलवाद्यांचा जवानांवर हल्ला, तीन कमांडो जखमी | गडचिरोली | एबीपी माझा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 55.78 टक्के मतदान राज्यातल्या सात मतदारसंघात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 55.78 टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं. वर्ध्यात 55.36 टक्के मतदान झालं, रामटेक इथे 51.72 टक्के, नागपूर इथे 53 टक्के, भंडारा गोंदिया इथे 60.50 टक्के, गडचिरोली-चिमूरमध्ये 61 .33 टक्के, चंद्रपूर 55.97 टक्के, तर यवतमाळ-वाशिम येथे 53.97 टक्के मतदान झालं. भर उन्हातही मतदार उत्साहाने घराबाहेर पडले आणि मतदानाचा हक्क बजवला. तर नक्षलवाद्यांच्या हैदोसानंतरही गडचिरोलीत सर्वाधिक मतदान झाल्याचं पाहायलं मिळतं. संबंधित बातम्या : विदर्भातील मतदारसंघनिहाय आढावा

Lok Sabha Election LIVE UPDATE | विदर्भातील सात जागांसह देशभरात 91 मतदारसंघांमध्ये मतदान

राज्यात 3 लाखांहून अधिक दिव्यांग मतदार, दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा माओवाद्यांच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याच्या इशाऱ्यानंतर गडचिरोली-चिमुर मतदार संघात अतिरिक्त पोलीस बल तैनात महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात जिथे मतदान होणार आहे, त्या सात जागांवर 2014 सालची आकडेवारी कशी होती? 'या' कारणामुळे मतदानाची वेळ दीड तासाने वाढवली पहिल्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावणार, विदर्भातील सात मतदारसंघांमध्ये मतदान
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gauri Palave Death : लेकींच्या गळ्यात फास, किती सोसायचा त्रास Special Report
KDMC Mahayuti : 'लक्षात ठेवा कमळ', केडीएमसीत स्वबळ? डोंबिवलीमध्ये नेमकं कुणाचं 'कल्याण'?
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरावर फडकणार धर्मध्वजा! थेट अयोध्येतून ज्ञानदा कदम यांचा Special Report
Gen Z In Election : 'जेन झी'ची भाषा, राजकारणाची दिशा; फडणवीसांचा हुकार, GEN Z ला संधी Special Report
Dharmendra Demise : रोमॅन्टिक हीरो ते बॉलिवूडचा सुपरस्टार..धर्मेंद्र! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
IND vs SA  : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
Team India : वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गंभीरवर भडकले ; भारतावर दुसऱ्या कसोटीत पराभवाचं संकट
वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गौतम गंभीरवर भडकले
Embed widget