एक्स्प्लोर
Loksabha Election 2019 : चौथ्या टप्प्यामधील लढतींचे चित्र स्पष्ट, अनेक ठिकाणी चुरस
चौथ्या टप्प्यासाठी राज्यात 29 एप्रिल रोजी मतदान होणार असून 17 लोकसभा मतदारसंघातील शेकडो उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. मुंबई आणि उपनगरातून 116 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

मुंबई : लोकसभा निवडणूक 2019 साठी राज्यातील चौथ्या टप्प्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. अनेकी उमेदवारांनी काल अर्ज वापस घेण्याच्या शेवटच्या दिवशी अर्जवापसी केली आहे. यामध्ये काही ठिकाणी बंड शमविण्यात पक्षांना यश आले आहे तर काही ठिकाणी मात्र बंडखोरांचा एल्गार कायम आहे. चौथ्या टप्प्यासाठी राज्यात 29 एप्रिल रोजी मतदान होणार असून 17 लोकसभा मतदारसंघातील शेकडो उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. मुंबई आणि उपनगरातून 116 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. - अशा असतील चौथ्या टप्प्यातील प्रमुख लढती
- धुळे - सुभाष भामरे (BJP) विरुद्ध कुणाल रोहिदास पाटील (CONG)
- नंदुरबार - हीना गावित (BJP) विरुद्ध के. सी. पडवी (CONG)
- मावळ- पार्थ पवार(NCP) विरुद्ध श्रीरंग बारणे( SENA)
- शिरुर- अमोल कोल्हे (NCP) विरुद्ध शिवाजीराव आढळराव (SENA)
- शिर्डी- भाऊसाहेब कांबळे (CONG) विरुद्ध सदाशिव लोखंडे (SENA)
- दिंडोरी - डॉ भारती पवार (BJP) विरुद्ध धनराज महाले (NCP) विरुद्ध जे पी गावीत (माकप)
- नाशिक- हेमंत गोडसे (SENA) विरुद्ध समीर भुजबळ (NCP)
- पालघर - राजेंद्र गावित (SENA) विरुद्ध बळीराम जाधव (BVA)
- भिवंडी - कपिल पाटील (BJP) विरुद्ध सुरेश टावरे (CONG)
- कल्याण - बाबाजी पाटील (NCP) विरुद्ध डॉ. श्रीकांत शिंदे (SENA)
- ठाणे- आनंद परांजपे (NCP) विरुद्ध राजन विचारे (SENA)
- मुंबई उत्तर - उर्मिला मातोंडकर (CONG) विरुद्ध गोपाळ शेट्टी (BJP)
- मुंबई उत्तर पश्चिम- गजानन कीर्तिकर (SENA) विरुद्ध संजय निरुपम (CONG)
- मुंबई उत्तर-पूर्व - संजय दिना पाटील (NCP विरुद्ध मनोज कोटक (BJP)
- मुंबई उत्तर मध्य - पूनम महाजन (BJP) विरुद्ध प्रिया दत्त (BJP)
- मुंबई दक्षिण मध्य - राहुल शेवाळे (SENA) विरुद्ध एकनाथराव गायकवाड (CONG)
- मुंबई दक्षिण - अरविंद सावंत (SENA) विरुद्ध मिलिंद देवरा (CONG)
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
महाराष्ट्र



















