एक्स्प्लोर

Lok Sabha Maharashtra Election Result 2024: सुनेत्रा पवार यांचा पराभव म्हणजे कार्यकर्त्यांसाठी आपल्या आईचा पराभव; विधानसभेत बदला घेणार, अमोल मिटकरी यांची प्रतिज्ञा

Lok Sabha Maharashtra Election Result 2024: लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार गटाचे काही आमदार शरद पवार आणि भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला होता.

Lok Sabha Maharashtra Election Result 2024 Amol Mitkari: राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची मत मिळाली नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मोठी खळबळ उडून दिली होती. लोकसभेच्या निकालानंतरही आपण आपल्या आरोपांवर आजही ठाम असल्याचं अमोल मिटकरींनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितलं आहे. या संदर्भातील आपल्याकडील काही गोष्टी आणि पुरावे पुढच्या दोन दिवसात पक्षश्रेष्ठींना भेटून देणार असल्याचं अमोल मिटकरी म्हणाले. अमोल मिटकरींनी आज अकोल्याचे भाजपचे नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे यांची त्यांच्या घरी भेट घेऊन त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार गटाचे काही आमदार शरद पवार आणि भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला होता. यावरुन देखील अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं. लोकसभेतील विजयाची हवा रोहित पवारांच्या डोक्यात शिरल्यानेच ते अशी विधानं करत आहेत, असं अमोल मिटकरी म्हणाले. दरम्यान बारामतीतील सुनेत्रा पवार यांचा पराभव हा राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आपल्या आईचा पराभवासारखा आहेत. राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता या पराभवाचा बदला विधानसभेत घेणार असल्याची प्रतिज्ञाही यावेळी अमोल मिटकरींनी केली. 

सुनेत्रा पवारांचा पराभव-

 बारामतीत (Baramati Lok Sabha Election) नंणद सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) भावजय सुनेत्रा पवारला (Sunetra Pawar)  जोरदार धक्का दिला आहे.   बारामती राखण्यात सुप्रिया सुळेंना यश मिळाले आहे. तर अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवारांचा पराभव झाला आहे. सध्या बारामतीत  जल्लोष समोर आला आहे. बारामतीचा पराभव हा अजित पवारांसाठी मोठा धक्का  मानला जात आहे.

अनेक लोकांच्या झोपा आता उडाल्या : रोहित पवार

आम्हाला नेता बनण्याची घाई झाली नाही. भाजपने खाली राजकारण नेलं होतं. ते पुन्हा व्यवस्थित करायचं आहे.  जेव्हा अनेक नेते धमक्या देत होतें त्यावेळी आम्ही म्हणत होतो की जनता हे सर्व काही बघत आहे. अनेक लोकांच्या झोपा आता उडाल्या आहेत. महाराष्ट्राला पुन्हा एक नंबरच राज्य करायचे आहे. वंचित आमच्यासोबत आले असते तर नक्की आणखी वेगळं चित्रं पाहिला मिळालं असतं. 

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरस-

लोकसभा 2024 च्या निवडणूकीत (Lok Sabha Election Result 2024) महाराष्ट्रात महाविकास आघाडीने 48 पैकी 30 जागा मिळवत दमदार यश मिळवले. तर महायुतीला 17 जागांवर समाधान मानवे लागले. राज्यात काँग्रेसला सर्वाधिका 13 जागा मिळाल्या. तर उद्धव ठाकरेंना 9 आणि शरद पवार यांच्या पक्षाला 8 जागा मिळाल्या. भाजपला 9, शिंदेंच्या शिवसेनेला 7 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एक जागा जिंकली. सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले.

लोकसभा निवडणुकीत कोणाला किती  जागांवर विजय मिळाला?

देशपातळीवरील समीकरणं

एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17

महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल

महाविकास आघाडी- 29
महायुती- 18
अपक्ष- 1

महायुतीमधील पक्षीय बलाबल

भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1

महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?

काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget