एक्स्प्लोर
अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज वैध, उमेदवारी अर्जावरील सर्व आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळले
काँग्रेसचे नांदेडमधील लोकसभेचे उमेदवार अशोक चव्हाण यांना निवडणूक आयोगाने दिलासा दिला आहे. अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे.
नांदेड : काँग्रेसचे नांदेडमधील लोकसभेचे उमेदवार अशोक चव्हाण यांना निवडणूक आयोगाने दिलासा दिला आहे. अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी चव्हाण यांच्या उमेदवारी अर्जावरील सर्व आक्षेप फेटाळले आहेत.
दोन उमेदवारांनी अशोक चव्हाणांच्या उमेदवारी अर्जाबाबात आक्षेप घेतले होते. ठरावीक नमुन्यात निवडणूक अर्ज न भरणे, मालमत्तेबाबतची माहिती लपवणे, प्रतिज्ञा पत्रात आर्थिक व्यवहारांची माहिती नमूद न करणे असे आक्षेप नोंदवण्यात आले होते. परंतु निवडणूक आयोगाने हे आक्षेप फेटाळले आहेत.
लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत राज्यातील पहिल्या टप्प्याअंतर्गत सात मतदारसंघांमधील नामनिर्देशन पत्रांची काल (मंगळवारी) छाननी करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 184 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल झाली होती. त्यापैकी 147 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement