'आम्हाला कोणाची ताकद मिळाली नाही, हे सर्वांना माहितीय'; पराभवानंतर हेमंत गोडसेंचा रोख नेमका कुणाकडे?
Nashik Lok Sabha Election Result 2024 : आम्हाला कोणाची ताकद मिळाली नाही, हे सर्वांना माहितीय, असे वक्तव्य हेमंत गोडसे यांनी केले आहे. गोडसेंच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Nashik Lok Sabha Election Result 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी बाजी मारली. शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांची यांना पराभवाचा सामना करावा लागला. दोन वेळा खासदारकी मिळविलेल्या हेमंत गोडसे हे तब्बल एक लाख साठ हजारांच्या फरकाने पराभूत झाले. यानंतर माजी खासदार हेमंत गोडसे यांनी आम्हाला कोणाची ताकद मिळाली नाही, हे सर्वांना माहितीय, असे वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
हेमंत गोडसे यांनी आज एबीपी माझाशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मला उमेदवारी उशिरा जाहीर झाल्यामुळे हा निकाल आला आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या धोरणामुळे ही अनुभूती आली. भाजपने उमेदवार घोषित केले. तेव्हाच पक्षाने उमेदवार देणे गरजेचे होते. विरोधातील उमेदवाराला जास्त दिवस मिळाले त्यामुळे आम्ही डेमेज झालो. लोकांना गोडसे उमेदवार असणार की, नाही हा संभ्रम निर्माण झाला त्याचा मला फटका बसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
हेमंत गोडसेंचा रोख नेमका कुणाकडे?
ते पुढे म्हणाले की, माझा रोष कोणावर नाही. सर्वांनी काही चांगले काम झाले. कोणी काम केले नाही ते सर्वांना माहिती आहे. कोणाची ताकद मिळाली नाही ते सर्वांना माहिती आहे, अशी टीका त्यांनी यावेळी मंत्री छगन भुजबळांवर नाव न घेता केली आहे. तसेच राजकीय काम सुरू ठेवणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले की, खचून जाऊ नका काम सुरू ठेवा, असेही त्यांनी म्हटले.
नाशिक लोकसभा मतदारसंघात ग्रामीण मतदान ठरले निर्णायक
सिन्नर हे राजाभाऊ वाजे यांचे होमपीच आहे, या मतदारसंघात राजाभाऊ वाजे यांना 1 लाख 28 हजार 238 मतांची निर्णयाक आघाडी मिळाली. अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे इथले आमदार आहे सिन्नरचा लीड वाढत असतानाच हेमंत गोडसे यांच्या समोर इगतपुरी मतदार संघातील लीड तोडण्याचे आव्हान उभे राहिले इगतपुरी मतदारसंघात 43 हजारांची आघाडी उभी राहिली. काँग्रेस हिरामण खोसकर इथले आमदार आहेत. सिन्नरला लागून असणाऱ्या देवळाली मतदारसंघातही हेमंत गोडसेंना पीछेहाट बघायला मिळाली. 27 हजार 136 मतांची आघाडी राजाभाऊ वाजेंना मिळाली. अजित पवार गटाच्या सरोज अहिरे इथल्या आमदार आहेत. तर शहरी भागात भाजपच्या तीनही आमदाराच्या मतदार संघात हेमंत गोडसे यांना बऱ्यापैकी मते मिळाली असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँगेसच्या ताब्यात असणाऱ्या मतदारसंघात हेमंत गोडसेंना फटका बसला आणि सरतेशेवटी त्यांना पराभवाला समोरे जावे लागले.
लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागांवर विजय मिळाला?
देशपातळीवरील समीकरणं
एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17
महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल
महाविकास आघाडी- 29
महायुती- 18
अपक्ष- 1
महायुतीमधील पक्षीय बलाबल
भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1
महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?
काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8
आणखी वाचा