Exit Poll 2024 : महाराष्ट्रात भाजप मोठा पक्ष, दुसऱ्या नंबरवर ठाकरे गट; एक्झिट पोल काय सांगतो, पाहा
Lok Sabha Election Result Exit Poll 2024 : महाराष्ट्रात भाजप सर्वात मोठा पक्ष असून दुसऱ्या क्रमांकावर ठाकरेंची शिवसेना असल्याचं एक्झिट पोलमध्ये समोर आलं आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीचं (Lok Sabha Election 2024) शेवटच्या टप्प्यात मतदान संपल्यावर एक्झिट पोलचे (Result 2024 Exit Poll) आकडे समोर आले आहेत. महाराष्ट्रात (Maharashtra) भाजप (BJP) सर्वात मोठा पक्ष असल्याचं एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलमध्ये समोर आलं आहे. एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीला यांच्यात अटीतटीची लढाई असल्याचं दिसत आहे.
महाराष्ट्रात भाजप मोठा पक्ष, दुसऱ्या नंबरवर ठाकरे गट
एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला 17 जागा मिळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे ठाकरे गटाला 9 जागा मिळतील, अशी शक्यता आहे. याशिवाय शिंदे गटाला सहा जागा आणि अजित पवार गटाला एक जागा मिळू शकते. शरद पवार गटाला सहा जागा आणि काँग्रेस पक्षाला 8 जागा मिळू शकतात, असं एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलमध्ये समोर आलं आहे.
एबीपी सी वोटर एक्झिट पोल
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 23 ते 25 जागा मिळणार असल्याचा अंदाज एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलमध्ये व्यक्त केला जात आहे. तर, महायुतीला 22 ते 26 जागा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात मविआ आणि महायुतीत 50-50 संधी असल्याचं एक्झिट पोलमध्ये दिसतंय. महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा या शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ठाकरे गटाला 9 जागा, काँग्रेसला 8 जागा तर शरद पवार गटाला 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे महायुतीत भाजपला 17 जागा, शिंदे गटाला 6 जागा आणि अजित पवार गटाला एक जागा मिळण्याची शक्यता आहे.
एबीपी सी वोटर एक्झिट पोल
महायुती
- भाजप : 17
- शिंदे गट : 6
- अजित पवार गट : 1
महाविकास आघाडी
- ठाकरे गट : 9
- काँग्रेस : 8
- शरद पवार गट : 6
- इतर : 1
एनडीए (NDA) : 353-383
इंडिया आघाडी (INDIA Alliance) : 152-182
इतर : 4 -12
TV9 एक्झिट पोल
दरम्यान, टीव्ही9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार, ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रात दुसऱ्या नंबरचा पक्ष आहे. या एक्झिट पोलनुसार, भाजपला महाराष्ट्रात 18 जागा मिळू शकतात, तर ठाकरेंच्या शिवसेनेला 14 जागा मिळण्याचा अंदाज आहे. निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे, त्याआधी सर्व एक्झिट पोल समोर आले आहेत.
- भाजप : 19
- शिंदे गट : 4
- अजित पवार गट : 0
- ठाकरे गट : 14
- काँग्रेस : 5
- शरद पवार गट : 6
एक्झिट पोलनुसार, उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर आघाडीवर तर रविंद्र वायकर पिछाडीवर आहेत. शरद पवार गटाचे निलेश लंके आघाडी तर भाजपचे सुजय विखे पिछाडीवर आहेत. कोल्हापुरात काँग्रेसचे शाहू महाराज आघाडीवर तर शिंदे गटाचे संजय मंडलिक पिछाडीवर आहेत. चंद्रपूरमधून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर तर, भाजपचे सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे आघाडीवर तर ठाकरे गटाचे विनायक राऊत पिछाडीवर असल्याचं दिसत आहे.
Disclaimer : सर्वेक्षणातून समोर आलेले निकष पूर्णपणे लोकांकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित आहेत, त्यामुळे यातून एबीपी न्यूज अथवा एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी हे सर्वेक्षण केले आहे. यासाठी देशभरातील विविध राज्यातील लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. सर्वेक्षणातील त्रुटींचं मार्जिन ऑफ एरर प्लस - मायनस 3 ते प्लस - मायनस 5 टक्के इतके आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :