माढा, सोलापूरमध्ये मतदानाची टक्केवारी घसरली, कौल कुणाला? 4 जूनला फैसला
Lok Sabha Election 2024 : माढ्यामध्ये 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा 7.56 टक्के आकडा घसरला आहे, तर सोलापूरमध्ये मतदानाची टक्केवारी 1.03 टक्क्यांनी घसरली आहे.
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी पार पडलं आहे. महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 11 मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं. महाराष्ट्रात यंदा मतदानाकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात यंदा मतदानाची टक्केवारी घसरली आहे. माढा (Madha Loksabha) आणि सोलापूर (Solapur Loksabha) मतदारसंघातही (Constituency) यंदा मतदारांनी मतदानाकडे काहीशी पाठ फिरवल्याचं चित्र आहे. माढ्यामध्ये 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा 7.56 टक्के आकडा घसरला आहे, तर सोलापूरमध्ये मतदानाची टक्केवारी 1.03 टक्क्यांनी घसरली आहे.
माढ्यात मतदानाचा टक्का घसरला
2024 च्या लोकसभा निवडणुकीत माढ्यात मतदानाची टक्केवारी घसरली आहे. माढ्याच यंदा 56.02 टक्के मतदान झालं आहे. माढा लोकसभा मतदारसंघात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 63.58 टक्के मतदानाची नोंद झाली होती. यंदा हा टक्का 7.56 टक्क्यांनी घसरला आहे. 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 1.5 टक्क्यांनी वाढला होता. पण, यंदाच्या लोकसभेत मतदानाची टक्केवाकी घसरली आहे.
सोलापूरमध्ये मागील निवडणुकीपेक्षा कमी मतदान
सोलापूर मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीत म्हणतेच 2019 च्या निवडणुकीत 58.67 टक्के मतदान झालं होतं. मात्र, यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरली आहे. 2024 लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघात 57.64 टक्के मतदान झालं आहे. गतवर्षाच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी 1.03 टक्क्यांनी घसरली आहे.
लोकसभा निवडणूक 2024 माढा लोकसभेचे उमेदवार
उमेदवार | पक्ष |
धैर्यशील मोहिते पाटील | राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष |
रणजितसिंह निंबाळकर | भाजप |
लोकसभा निवडणूक 2024 सोलापूर लोकसभेचे उमेदवार
उमेदवार | पक्ष |
राम सातपुते | भाजप |
प्रणिती शिंदे | काँग्रेस |
बबलू सिद्राम गायकवाड | बसपा |
2014 निवडणुकीची सोलापूरची आकडेवारी
2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत सुशीलकुमार शिंदे यांचा 1,49,674 मतांनी पराभव झाला होता.
उमेदवार | पक्ष | मतदान |
शरद बनसोडे | भाजप | 517879 |
सुशीलकुमार शिंदे | काँग्रेस | 368205 |
संजीव सदाफुले | बसपा | 19041 |
नोटा | नोटा | 13778 |
ललीत बाबर | आप | 9261 |
सोलापूरमध्ये दोन गावांचा निवडणुकीवर बहिष्कार
सोलापूरमधील दोन गावांमधील नागरिकांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील मनगोळी आणि भैरववाडी या गावांमध्ये नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. वीज, पाणी आणि रस्ता नसल्याने या दोन गावांतील ग्रामस्थांनी मतदान न करण्याची भूमिका घेतली.
लोकसभा निवडणूक 2024 : महाराष्ट्रातील प्रमुख लढती
बारामती : सुप्रिया सुळे (शरद पवार गट) विरुद्ध सुनेत्रा पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
माढा : धैर्यशील मोहिते पाटील (शरद पवार गट) विरुद्ध रणजीतसिंह नाईक निंबाळकर (भाजप)
सोलापूर : प्रणिती शिंदे (काँग्रेस) विरुद्ध राम सातपुते (भाजप)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग : नारायण राणे (भाजप) विरुद्ध विनायक राऊत (ठाकरे गट)
सातारा : उदयनराजे भोसले (भाजप) विरुद्ध शशिकांत शिंदे (शरद पवार गट)
रायगड : सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध अनंत गीते (ठाकरे गट)
कोल्हापूर : संजय मंडलिक (शिवसेना) विरुद्ध शाहू महाराज (काँग्रेस)
सांगली : चंद्रहार पाटील (ठाकरे गट) विरुद्ध संजयकाका पाटील (भाजप) विरुद्ध विशाल पाटील (अपक्ष)
धाराशिव : ओमराजे निंबाळकर (ठाकरे गट) विरुद्ध अर्चना पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
लातूर : सुधाकर श्रुगांरे (भाजप) विरुद्ध डॉ. शिवाजी काळगे (काँग्रेस)
हातकणंगले : धैर्यशील माने (शिवसेना) विरुद्ध राजू शेट्टी (स्वाभिमानी) विरुद्ध सत्यजित पाटील (ठाकरे गट)