एक्स्प्लोर
निवडणूक जिंकल्यानंतर किंवा हरल्यानंतर मोदी आणि राहुल गांधींच्या राजकारणावर काय परिणाम होतील?
देशातल्या 17 व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. या निकालाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींच्या राजकारणावर या निकालाचे काय परिणाम होणार? याबाबत सर्वांनाच कुतूहल आहे.

नवी दिल्ली : देशातल्या 17 व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. या निकालाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. देशात पुन्हा एकदा एनडीएची सत्ता येणार की भाजपचा उधळलेला वारु काँग्रेस रोखणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींच्या राजकारणावर या निकालाचे काय परिणाम होणार? हा त्याहून मोठा प्रश्न आहे. भाजपने निवडणूक जिंकली तर... एनडीएला पूर्ण बहुमत मिळाले तर मोदींचा राष्ट्रवादाचा फॉर्म्युला हिट होईल. भाजपला विजय मिळाला तर त्याचं श्रेय गेल्या वर्षात सरकारने लागू केलेल्या विविध योजनांना दिलं जाईल. नरेंद्र मोदी हे भाजपचा चेहरा आहेत, भारतीय जनता पक्ष जिंकला तर देशात आणि जगात मोदी हे एक मोठा ब्रॅण्ड म्हणून अधिक मोठे होतील. भाजपने निवडणूक गमावली तर... भाजप हरला तर मोदींच्या नावावर निवडणूक लढणं भाजपला भारी पडलं असं म्हटलं जाईल. मोदींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाईल, पक्षातील मोदींच्या विरोधकांना मोदींविरोधात बोलण्याची संधी मिळेल मोदी आणि शाहांना हटवण्यासाठी पक्षात हालचाली सुरु होतील काँग्रेस जिंकली तर... काँग्रेस विजयी झाली तर राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतरचा पक्षाचा सर्वात मोठा विजय मानला जाईल. राहुल गांधी हेदेखील मोदींप्रमाणे मोठा ब्रॅण्ड म्हणून नावारुपाला येतील. काँग्रेस हरली तर... काँग्रेसने ही निवडणूक गमावली तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाईल. राहुल गांधींनी राफेल करारावरुन, शेतकरी आणि बेरोजगारीवरुन उपस्थित केलेले मुद्दे फेल होतील. प्रियांका गांधी यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातील. आज 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशांमधील 542 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले आहे. 39 दिवसात सात टप्प्यांमध्ये ही निवडणूक पार पडली आहे. तब्बल 91 कोटी 1 लाख मतदारांनी आठ हजार 40 उमेदवारांचे नशीब ईव्हीएम मशीनमध्ये कैद केले आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत




















