एक्स्प्लोर

Kudal Assembly Constituency 2024 : कुडाळ मालवण मतदारसंघात निलेश राणेंचा विजय, वैभव नाईक यांचा पराभव

Kudal Assembly Constituency 2024 : कुडाळ मालवण मतदारसंघात विद्यमान आमदार वैभव नाईक हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. तर माजी खासदार निलेश राणे हे महायुतीचे उमेदवार यांच्यात सामना रंगणार आहे.

Kudal Assembly Constituency 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आज (23 नोव्हेंबर) 288 विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये कुडाळ (Kudal) मालवण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार निलेश राणे यांचा विजय झाला आहे. निलेश राणे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक उभे होते. कुडाळ मालवण मतदारसंघात (Kudal Assembly Constituency) डिज्नीलँड, सी वर्ड असे पर्यटन पूरक प्रकल्प रखडले आहेत. मालवणला पर्यटनाची राजधानी देखील म्हटलं जातं, त्यामुळेच असे पर्यटन पूरक प्रकल्प होणं गरजेचे आहे. दुसरीकडे टांळाबा सारखा धरण प्रकल्प गेली कित्येक वर्ष लालफीतीत अडकून पडला आहे. तर कुडाळ शहराच्या नजदीक असलेली औद्योगिक क्षेत्रात कोणतेही मोठे प्रकल्प नसल्याने रोजगाराचा मोठा प्रश्न या मतदारसंघात उद्भवत होते. 

कुडाळ मालवण मतदारसंघात विद्यमान आमदार वैभव नाईक हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. तर माजी खासदार निलेश राणे हे महायुतीचे उमेदवार असतील. निलेश राणे हे धनुष्यबाण या चिन्हावरून लढतील. मात्र गेले तीन ते चार वर्ष माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळ मालवण मतदारसंघात काम सुरू केलं आहे. 

मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना झाली हाच मुद्दा यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत अग्रस्थानी राहणार आहे. भ्रष्टाचारामुळे हा पुतळा कोसळल्याचा आरोप विरोधकांकडून आतापासूनच रान पेटवायला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे या मतदारसंघात विकासाच्या बाबतीत कोणतेही नवे प्रकल्प आलेले नसून मच्छीमार पर्यटन व्यवसायिक शेतकरी युवा वर्ग यांच्यासाठी देखील भरीव काम झालेली पाहायला मिळत नाही.

माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पारंपरिक मतदारसंघ असलेला हा मतदारसंघ 2014 ला नारायण राणे यांचा पराभूत करून वैभव नाईक जॉईंट किलर ठरले होते. त्यानंतर 2019 ला वैभव नाईक यांनी कट्टर राणे समर्थक असलेले रणजीत देसाई यांचा पराभव करून दुसऱ्यांदा आमदार झाले. आता वैभव नाईक तिसऱ्यांदा विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी माजी खासदार नारायण राणे यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे राणे विरुद्ध नाईक असा जुनाच संघर्ष पुन्हा एकदा कुडाळ मालवण या मतदारसंघात पहायला मिळणार आहे.

माजी खासदार निलेश राणे हे 2009 ला पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झाले. त्यानंतर 2014 आणि 2019 ला दोन वेळा पराभूत झाले. आता कुडाळ मालवण विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. निलेश राणेंना लोकसभेला दोन वेळा पराभूत करणाऱ्या विनायक राऊतांचा वडील नारायण राणे यांनी पराभव केला. त्यामुळे मुलाच्या पराभवाचा वचपा वडिलांनी घेतला आता वडिलांच्या पराभवाचा वचपा मुलगा काढणार का हेही पाहावं लागणार आहे. 

2009 मध्ये जिल्ह्यातील मतदारसंघांची पुर्नरचना झाली. या पुनर्रचनेत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ तयार झाला. या निवडणुकीत नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक याचा पराभव करत सहजरित्या विजय मिळवला. मात्र 2014 च्या निवडणुकीत याच मतदार संघातून नारायण राणे यांना वैभव नाईक यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला. वैभव नाईक जायंट किलर म्हणून समोर आले. मात्र 2014 चा पराभव नारायण राणे यांच्या जिव्हारी लागला. याबाबतची सल नारायण राणे यांनी वारंवार बोलून दाखवली. त्यानंतर वैभव नाईक 2019 मध्ये सुध्दा नारायण राणे यांचे शिलेदार रणजित देसाई यांना पराजित करून दुसऱ्यांदा विधानसभेत गेले. आता मात्र राजकीय स्थित्यंतरात अनेक घडामोडी घडल्या आहेत. एकसंघ असलेल्या शिवसेनेत उभी फूट पडली, राष्ट्रवादीमध्ये सुद्धा विभागली. 

2009 विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून 71,921 मिळवत वैभव नाईक यांचा पराभव केला. 2014 ला नारायण राणेंचा पराभव करणार वैभव नाईक यांनी 70,582 मत घेत जायंट किलर म्हणून समोर आले. 2019 ला वैभव नाईक यांनी राणेंचे शिलेदार रणजित देसाई यांचा पराभव करत 69.168 मत मिळवली. आता राणे विरुद्ध नाईक अशी थेट लढत पुन्हा कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात हाय हाय हॉलटेज ड्रामा होणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shirish Maharaj Death: शिरीष महाराज मोरेंनी सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलेलं 32 लाखांचं कर्ज एकनाथ शिंदेंनी फेडलं
एकनाथ शिंदेंनी शिरीष महाराज मोरेंचं 32 लाखांचं कर्ज झटक्यात फेडून टाकलं
CM Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर
CM Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर
Pune: तिकडे देवाभाऊंशी राज ठाकरेंची भेट, पुण्यात राज- उद्धव भावांनी एकत्र येण्यासाठी बॅनरबाजी, चर्चेला उधाण
तिकडे देवाभाऊंशी राज ठाकरेंची भेट, पुण्यात राज- उद्धव भावांनी एकत्र येण्यासाठी बॅनरबाजी, चर्चेला उधाण
Shrikant Shinde : मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंचं 78 नव्या आमदारांना जेवणाचं निमंत्रण, ठाकरेंचे 10, पवारांचे 4 आमदार उपस्थित राहणार?
श्रीकांत शिंदेंचं 78 नव्या आमदारांना जेवणाचं निमंत्रण, ठाकरेंचे 10, पवारांचे 4 आमदार उपस्थित राहणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Thackeray भाजपच्या कोट्यातून आमदार? Devendra Fadanvis - Raj Thackeray भेटीत काय-काय ठरलं?CM Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवरABP Majha Headlines | 10 AM | एबीपी माझा हेडलाईन्स | 10 Feb 2025 | Maharashtra NewsCM Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : मुख्यमंत्री फडणवीस 'शिवतीर्थ'वर राज ठाकरे यांच्या भेटीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirish Maharaj Death: शिरीष महाराज मोरेंनी सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलेलं 32 लाखांचं कर्ज एकनाथ शिंदेंनी फेडलं
एकनाथ शिंदेंनी शिरीष महाराज मोरेंचं 32 लाखांचं कर्ज झटक्यात फेडून टाकलं
CM Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर
CM Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर
Pune: तिकडे देवाभाऊंशी राज ठाकरेंची भेट, पुण्यात राज- उद्धव भावांनी एकत्र येण्यासाठी बॅनरबाजी, चर्चेला उधाण
तिकडे देवाभाऊंशी राज ठाकरेंची भेट, पुण्यात राज- उद्धव भावांनी एकत्र येण्यासाठी बॅनरबाजी, चर्चेला उधाण
Shrikant Shinde : मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंचं 78 नव्या आमदारांना जेवणाचं निमंत्रण, ठाकरेंचे 10, पवारांचे 4 आमदार उपस्थित राहणार?
श्रीकांत शिंदेंचं 78 नव्या आमदारांना जेवणाचं निमंत्रण, ठाकरेंचे 10, पवारांचे 4 आमदार उपस्थित राहणार?
Pune Temperature: देशात सर्वाधिक तापलेल्या शहरांच्या यादीत पुण्याचा समावेश;  शहराच सरासरी तापमान 35 अंशावर
देशात सर्वाधिक तापलेल्या शहरांच्या यादीत पुण्याचा समावेश; शहराच सरासरी तापमान 35 अंशावर
Pankaja Munde: गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम असणारे एकत्र गोळा झाले तर वेगळा पक्ष उभा राहील; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
मुंडे साहेबांवर प्रेम असणारे एकत्र गोळा झाले तर वेगळा पक्ष उभा राहील; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
नवी दिल्लीत 25 आमदारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला, भाजपचा 100 टक्के स्ट्राईक रेट, 6 आमदार पुन्हा विधानसभेत
आम आदमी पार्टीनं 36 आमदारांना विधानसभेला उतरवलं, 22 जणांना मतदारांनी नाकारलं, नवी दिल्लीत काय काय घडलं?
शोएब अख्तर अंगावर धावून आला, हरभजन सिंगनेही उचलली बॅट अन्...; मैदानात काय घडलं?, VIDEO आला समोर
शोएब अख्तर अंगावर धावून आला, हरभजन सिंगनेही उचलली बॅट अन्...; मैदानात काय घडलं?, VIDEO आला समोर
Embed widget