एक्स्प्लोर

Punjab Election Result 2022 : 'पॅड वूमन' जीवनज्योत कौर ठरल्या 'जायंट किलर'; नवज्योतसिंह सिद्धू आणि विक्रम माजिठिया यांना चारली धूळ

Punjab Election Result 2022 : आपच्या जीवनज्योत कौर यांनी काँग्रेसच्या नवज्योतसिंह सिद्धू आणि अकाली दलाच्या विक्रम माजिठिया यांचा पराभव केला आहे. 

Punjab Election Result 2022 : काँग्रेसला यशाची मोठी आशा असलेला पंजाब आता त्यांच्या हातातून निसटल्याचं स्पष्ट झालंय. या ठिकाणी आपने मोठी धडक मारली असून अनेकांना पराभवाची धूळ चारली आहे. त्यामध्ये पंजाब काँग्रेसच्या नवज्योत सिंह सिद्धू यांचाही समावेश आहे. आपच्या जीवनज्योत कौर या जायंट किलर ठरल्या असून त्यांनी नवज्योत सिंह सिद्धू यांचा पराभव  केला आहे. 

दोघांच्या वादात 'पॅड वूमन' जीवनज्योत कौर यांची बाजी
आपच्या जीवनज्योत कौर यांनी काँग्रेसच्या नवज्योत सिंह सिद्धू यांच्यासोबतच अकाली दलाच्या विक्रम माजिठिया यांचाही पराभव केला आहे. अमृतसर पूर्व या मतदारसंघामध्ये प्रमुख लढत ही  नवज्योत सिंह सिद्धू आणि विक्रम माजिठिया यांच्यामध्येच आहे असंच चित्र सुरुवातीला होतं. पण 'पॅड वूमन' अशी ख्याती असलेल्या जीवनज्योत कौर यांनी या दोघांनाही मात दिली. जीवनज्योती कौर या पंजाबमधील तुरुंगातील महिला कैद्यांना सॅनिटरी नॅपकिन देतात. तसेच त्या गरिबांच्या कल्याणासाठी काम करतात. 

पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा झालेला पराभव प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धूंनी मान्य केला आहे. सिद्धू यांनी आम आदमी पक्षाचे विजयाबद्दल अभिनंदन देखील केले आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्वीट करत म्हटले की, ''लोकांचा आवाज हा देवाचा आवाज आहे. आम्ही आमचा पराभव मान्य करतो. पंजाबच्या जनतेचा निर्णय आम्ही स्वीकार करतो. विजयाबद्दल आम आदमी पक्षाचे अभिनंदन.'

पंजाबमध्ये आतापर्यंत सर्व म्हणजे 117 जागांचे कल हाती आले असून त्यामध्ये आप 91 जागांवर आघाडीवर आहे तर सत्ताधारी कॉंग्रेसचा चांगलाच धुव्वा उडाल्याचं स्पष्ट झालं आहे. काँग्रेसला केवळ 17 जागांवर आघाडी मिळाली असून भाजप 2 जागांवर पुढे आहे. मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांनी मोठा विजय मिळवला आहे. 

काँग्रेसच्या हातून पंजाब का गेलं? 
काँग्रेसच्या हातात असलेले हे राज्य हातातून जाण्याची अनेक कारणं आहेत. यामध्ये महत्वाचं म्हणजे क्रिकेटर आणि मूळचे भाजपवासी नवज्योतसिंह सिद्धू यांना प्रदेश अध्यक्ष बनवले आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यापुढे आव्हान उभे केले. या दोघांमधून विस्तवही जात नसल्याने अमरिंदर सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसने लगेचच चन्नी यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. अमरिंदर सिंह यांनी स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला असून भाजपसोबत युती करून निवडणुक लढवली. दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधन कमिटीचे मनजिंदर सिंह सिरसाही भाजपमध्ये सामिल झाले.

संबंधित बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमदAavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझाHingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
Embed widget